युद्धविरामातील मध्यस्थांचा सध्या रशियाच्या दिशेने प्रवास : ट्रम्प

0
ट्रम्प
रशियाबरोबरच्या वाटाघाटीनंतर लवकरच युक्रेनच्या युद्धात युद्धविराम होईल अशी ट्रम्प यांना आशा आहे. )छायाचित्र सौजन्यः एक्स/द व्हाईट हाऊस)

कीव्हने 30 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवल्यानंतर युक्रेनबरोबरच्या संभाव्य युद्धबंदीवरील चर्चेसाठी वाटाघाटी करणारे मध्यस्थ सध्या रशियाला जात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले.

“आपण बोलत असताना मध्यस्त आता रशियाला जात आहेत. आणि आशा आहे की आम्हाला रशियाकडून युद्धविरामाबाबत निर्णय मिळू शकेल,”  असे त्यांनी आयर्लंडच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीदरम्यान ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले.

“आणि जर तसे झाले तर मला वाटते की हा भयानक रक्तपात संपवण्याच्या दृष्टीने आपण  80 टक्के मार्गक्रमण केले असेल.”

बैठकीला उपस्थित असलेले उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणाले की, “पुढील काही दिवसांत आमचे काही प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष संभाषण होईल.”

ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पुढील चर्चा केव्हा होईल हे सांगितले नाही, परंतु ते पुढे म्हणालेः “मला आशा आहे की ते युद्धविरामासाठी तयार आहेत” आणि मॉस्कोकडून तसे “सकारात्मक संदेश” आले आहेत.

“आता हे रशियावर अवलंबून आहे”, असे ट्रम्प म्हणाले.

युद्धविरामाच्या सहमतीसाठी मॉस्कोवर दबाव आणण्याबद्दल ट्रम्प बेफिकीर होते, ते म्हणाले की ते रशियावर “विनाशकारी” निर्बंध लादू शकतात परंतु “मला आशा आहे की त्याची आवश्यकता भासणार नाही.”

युक्रेनची 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमती

युक्रेनने मंगळवारी रशियाबरोबर 30 दिवसांच्या सामान्य शस्त्रसंधीवर अमेरिकेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. या बदल्यात अमेरिकेने लष्करी मदत आणि गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीवरील निर्बंध उठवण्याचे आश्वासन दिले, असे दोन्ही बाजूंच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सौदी अरेबियात झालेल्या चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी युक्रेनियन खनिजांवरील करार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास सहमती दर्शवली.

चर्चेनंतर जारी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “युक्रेनने त्वरित, 30 दिवसांच्या अंतरिम युद्धबंदीचा अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शविली, जी दोन्ही पक्षांच्या परस्पर कराराद्वारे वाढवली जाऊ शकते आणि रशियन फेडरेशनद्वारे स्वीकृती तसेच समवर्ती अंमलबजावणीच्या अधीन आहे.”

“अमेरिका रशियाला कळवणार आहे की रशियासोबतचा परस्परसंवाद ही शांतता साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे,” असे त्यात म्हटले आहे.

“अमेरिका गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीवरील स्थगिती त्वरित उठवेल आणि युक्रेनला सुरक्षा सहाय्य पुन्हा सुरू करेल.”

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रियाधमध्ये रशियन अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर तीन आठवड्यांनी अमेरिका-युक्रेन चर्चा झाली.

28 फेब्रुवारी रोजी व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या वादळी बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनची मदत थांबवली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleतेजस LCA ने केली, ASTRA BVRAAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Next article30 दिवसांची युद्धबंदी ‘युक्रेन शांतता योजनेचा’ प्रारंभ असू शकतो: झेलेन्स्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here