गाझामधील इस्रायलच्या लष्करी हल्ल्याबद्दल काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या निंदेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी टीका केली आहे.
नेतान्याहू म्हणाले की बहुसंख्य इस्रायली लोकांचे त्यांना समर्थन आहे त्यामुळे “जर ते (बायडेन) असा अर्थ काढत असतील की, मी बहुसंख्यांच्या विरोधात, बहुसंख्य इस्रायली लोकांच्या इच्छेविरुद्ध खासगी धोरणे राबवत आहे आणि त्यामुळे इस्रायलच्या हितसंबंधांना हानी पोहोचत आहे, तर ते दोन्ही बाबतीत चुकत आहेत.”
त्यांनी दक्षिण गाझातील रफाह या शहरात जमिनीवरून हल्ला करण्याच्या योजनांचा संदर्भ देताना नेतान्याहू म्हणाले की, हमासच्या उरलेल्या दहशतवादी दलाचा नाश करण्यासाठी आम्ही करत असलेल्या कारवाईचे ते समर्थनच करतात.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एमएसएनबीसीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रशासनाने पॅलेस्टिनींना दिलेल्या वागणुकीमुळे इस्रायल दुखावला गेल्याचा आरोप केला होता. यावर नेत्यानाहू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
याच मुलाखतीत बायडेन पुढे म्हणाले की, नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न न करणे ही नेतान्याहू यांची “मोठी चूक” ठरली आहे.
पण त्यांनी केलेल्या कारवाईमुळे निष्पाप नागरिकांचा जीव जातोय याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. ते अधिकाधिक दुखावले जात आहे . माझ्या मते, इस्रायलला मदत करण्यापेक्षा ते इस्रायलला जास्त दुखावत आहे आणि मला वाटते की ही एक मोठी चूक आहे,” असेही बायडेन पुढे म्हणाले.
नागरी घातपात प्रचंड घडून येत असल्याच्या भीतीने इस्रायलकडून होणाऱ्या आक्रमणांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
रमजान काळात शस्रसंधी?
इस्रायलने जर रफावर आक्रमण करण्याची योजना आखली तर वॉशिंग्टन आणि इस्रायलमधील संबंध आणखी ताणले जातील,असा इशारा बायडेन यांनी नेतान्याहू यांना दिला आहे.
ओलिसांची सुटका करणाऱ्या कराराचा भाग म्हणून किमान सहा आठवड्यांसाठी तात्काळ आणि नंतर कायमस्वरूपी युद्धविराम स्थापित करण्यासाठी अमेरिका अविरतपणे काम करत राहील, असा पुनरुच्चार बायडेन यांनी केला.
दरम्यान, इस्रायली पंतप्रधानांच्या मतदानाचे रेटिंग घसरले आहे; कारण नागरिकांची जी कत्तल ती रोखण्यात सुरक्षा दले अपयशी ठरली आहेत आणि त्याची जबाबदारी घेण्यास नेत्यानाहू तयार नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या हल्ल्यात 1,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या युद्धात 30,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि किमान 67,000 जखमी झाले आहेत.
रामानंद सेनगुप्ता