युक्रेनच्या अपार्टमेंटवरील रशियन ड्रोन हल्ल्यात नऊ ठार

0
युक्रेनच्या
30 जानेवारी 2025 रोजी युक्रेनच्या सुमी येथे रशियन ड्रोन हल्ल्यात नुकसान झालेल्या अपार्टमेंटमधून रशियन ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह बचावकर्ते बाहेर काढत आहेत. (सुमी प्रदेशातील युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेची प्रेस सेवा/रॉयटर्सद्वारे हँडआउट)

 

ईशान्य युक्रेनच्या सुमी येथील बहुमजली अपार्टमेंटवर गुरुवारी पहाटे झालेल्या रशियन ड्रोन हल्ल्यात नऊ जण ठार झाले तर एका मुलासह 13 जण जखमी झाले, असे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले.

“तासागणिक आम्हाला सुमीमधील परिस्थितीची अद्ययावत माहिती मिळत आहे. रशियन ‘शाहेद’ चा (ड्रोन) स्फोट झालेल्या ठिकाणी काम सुरू आहे,” असे झेलेन्स्की यांनी त्यांच्या रात्रीच्या व्हिडिओ भाषणात सांगितले.

“संपूर्ण इमारतीमधील अनेक कुटुंबांचे जीवन नष्ट करणे हे रशियन लष्कराचे एक वैशिष्ट्य बनले आहे. अशा प्रत्येक हल्ल्याला जगाकडून उत्तर देण्याची गरज असते,” असे ते म्हणाले. “दहशतवादाला शिक्षा न देता असचं सोडू शकत नाही.”

81 ड्रोन्सचा हल्ला

युक्रेनच्या सैन्याने गुरूवारी सांगितले की रशियाने युक्रेनवर रात्रभर 81 ड्रोन सोडले असून यामुळे व्यवसायिक ठिकाणे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे,
याशिवाय हवाई दलाने यापैकी 37 ड्रोन्स नष्ट केले तर 39 ड्रोन्स त्यांच्या लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरले. उर्वरित पाच ड्रोनचे काय झाले हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

टेलिग्रामवरील एका व्हिडिओमध्ये सुमीचे राज्यपाल व्होलोदिमिर आर्त्युख रात्री क्रेन आणि ढिगाऱ्यापुढे पुढे राहून बोलताना   म्हणाले की, आपत्कालीन सेवा पडझड झालेल्या इमारतीच्या काही भागातून रहिवाशांना बाहेर काढत आहेत.

पाच अपार्टमेंट्स नष्ट

या हल्ल्यात पाच सदनिका उद्ध्वस्त झाल्या असून 20 हून अधिक गाड्यांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाईन छायाचित्रांमध्ये आपत्कालीन कर्मचारी ढिगाऱ्याखाली तपासणी करताना दिसून आले.

हा प्रदेश रशियाच्या कुर्स्क प्रदेशाच्या सीमेवर आहे, जिथे युक्रेनने ऑगस्ट 2024 मध्ये घुसखोरी केली होती. याशिवाय रशियन ड्रोनद्वारे नियमितपणे या भागावर हल्ला करण्यात येत आहे.

राज्यपालांच्या म्हणण्यानुसार, ओडेसाच्या दक्षिणेकडील भागावर रात्रभर झालेल्या हल्ल्यात धान्याचे गोदाम, एक रुग्णालय आणि दोन खाजगी निवासस्थानांचे नुकसान झाले असले तरी  कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रशियाचा अणुऊर्जा प्रकल्प लक्ष्य

रशियन अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी युक्रेनच्या मोठ्या ड्रोन हल्ल्यात अणुऊर्जा प्रकल्पासह रशियन तेल आणि ऊर्जा सुविधांना लक्ष्य करण्यात आले.

रशियन हवाई संरक्षण प्रणालीने बेलारूसच्या सीमेवरील स्मोलेन्स्कच्या पश्चिम भागातील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे ड्रोन नष्ट केले, असे गव्हर्नर व्हॅसिली अनोखिन यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले.

रशियाच्या वायव्येकडील सर्वात मोठा ऊर्जा निर्मिती प्रकल्प स्मोलेन्स्क अणुऊर्जा प्रकल्प सामान्यपणे काम करत होता, असे आरआयएच्या राज्य वृत्तसंस्थेने प्रकल्पाच्या प्रेस सेवेचा हवाला देत सांगितले.

रशियाने जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य केल्याचे नाकारले आहे, परंतु फेब्रुवारी 2022 मध्ये मॉस्कोच्या सैन्याने युक्रेनवर पूर्ण प्रमाणात आक्रमण केल्यानंतर हजारो लोक मृत्यूमुखी पडले असून तितकेच जखमी झाले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleहमासने थायलंडच्या 5 नागरिकांसह, 8 बंधकांना मुक्त केले
Next articleTri-Service Commanders Witness Nighttime Joint Operations at Sea

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here