
तुर्कीच्या तुरुंगात असलेला दहशतवादी नेता अब्दुल्ला ओकलान याने कुर्दिस्तान कामगार पक्षाला (पीकेके) गुरुवारी शस्त्रे खाली घेण्याचे आवाहन केले, ज्यामुळे अंकाराबरोबरचा त्यांचा 40 वर्षांचा संघर्ष संपुष्टात येऊ शकेल आणि या प्रदेशावर त्याचे महत्त्वपूर्ण राजकीय आणि सुरक्षा परिणाम होऊ शकतील.
जर पीकेकेच्या नेतृत्वाने त्याच्या संस्थापकाची विनंती मान्य केली – अर्थात तसेच होईल याची हमी नाही – तर अध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांना दक्षिण तुर्कीत शांतता प्रस्थापित आणि विकसित करण्याची ऐतिहासिक संधी मिळेल. या भागात हिंसाचाराने हजारो लोक मारले गेले आहेत आणि प्रादेशिक भागातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.
दरम्यान, आता 75 वर्षीय ओकलानला त्याच्या आयुष्यातील शांततेचे त्याचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
शेजारच्या सीरियासाठी, नवीन प्रशासन त्याच्या कुर्दिश उत्तरेकडील भागावर अधिक नियंत्रण मिळवू शकेल आणि गृहयुद्धामुळे तुटलेल्या राष्ट्राला एकत्र आणू शकेल, तर ते कुर्दिश-संचालित, तेल समृद्ध उत्तर इराकमधील सातत्याने सुरू असणारा फ्लॅशपॉईंट देखील काढून टाकेल जिथे दोन दशकांपूर्वी पीकेकेने आपला तळ उभारला होता.
ऐतिहासिक जबाबदारी
“मी शस्त्रे खाली ठेवण्यासाठी आवाहन करत आहे आणि मी या आवाहनाची ऐतिहासिक जबाबदारी घेत आहे,” असे ओकलन याने तुर्कीच्या प्रो-कुर्दिश डीईएम पक्षाच्या सदस्यांनी सार्वजनिक केलेल्या पत्रात म्हटले आहे.
ओकलन याला त्याच्या पक्षाने कॉंग्रेस आयोजित करावी आणि त्यात आपण शस्रत्याग करत असल्याचे औपचारिकपणे मान्य करावे अशी त्याची इच्छा असल्याचे त्यांनी उद्धृत केले.
डीईएमच्या शिष्टमंडळाने गुरुवारी ओकलनला त्याच्या तुरुंगात भेट दिली आणि नंतर जवळच्या इस्तंबूलमध्ये त्याचे निवेदन प्रसिद्ध केले.
उत्तर इराकच्या पर्वतांमध्ये पीकेके कमांडर्सच्या मुख्यालयाकडून यावर त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.
अध्यक्ष एर्दोगानच्या सत्ताधारी एके पक्षाकडून ओकलनच्या आवाहनावर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत उपसभापती एफकान आला म्हणाले की पीकेकेने खरोखरच शस्त्रे खाली ठेवली आणि गट विसर्जित केला तर तुर्की “त्याच्या बेड्यांपासून मुक्त” होईल.
तुर्की आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी पीकेके ही दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले आहे.
पीकेकेने 1984 मध्ये आग्नेय तुर्कस्तानमधील वांशिक कुर्दिश मातृभूमीसाठी सशस्त्र मोहीम सुरू केल्यापासून 40 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. याशिवाय ते आपल्या फुटीरतावादी उद्दिष्टांपासून दूर गेले आहे आणि आता आग्नेय तुर्कीसाठी अधिक स्वायत्तता आणि मोठ्या कुर्दिश अधिकारांची त्यांनी मागणी केली आहे.
‘शांतताप्रिय आणि लोकशाहीवादी समाज’
पूर्वीची तुर्की-पीकेके शांतता प्रक्रिया कोसळल्यानंतर एक दशकानंतर, चार महिन्यांपूर्वी एर्दोगन यांच्या जवळच्या राजकीय मित्रपक्षाने प्रस्ताव दिला की ओकलानने त्याच्या सैनिकांना त्यांचा सशस्त्र संघर्ष संपवण्याचे आदेश द्यावे.
आपल्या संदेशात, ओकलानने तुर्कीला वांशिक अल्पसंख्याकांबद्दल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आणि लोकशाही स्व-संघटनेच्या अधिकाराचा आदर करण्याचे आवाहन केले.
“शांतता आणि लोकशाही समाजाच्या युगाची भाषा या वास्तविकतेनुसार विकसित करणे आवश्यक आहे”, असे ओकलानने आपल्या पत्रात म्हटले आहे, याचा अर्थ सशस्त्र संघर्षाने “आपला मार्ग चालवला” होता आणि तो संपवणे आवश्यक होते.
डीईएम पक्षाच्या सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मरमारा समुद्रातील इमराली बेटावर ओकलानची भेट घेतली, जिथे तो 1999 पासून जवळजवळ पूर्णपणे एकांतवासात आहे.
आपल्या लढवय्यांना त्यांचा संघर्ष संपवण्यासाठी तो असे आवाहन करेल या वाढत्या आशेदरम्यान, डिसेंबरपासून पक्ष सदस्यांची ओकलानबरोबर ही तिसरी भेट होती.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)