भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये भारताने ऑपरेशन ब्रह्मा या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या मानवतावादी प्रयत्नांमुळे केवळ दळणवळणाची तत्परताच दिसून आलेली नाही तर आधुनिक संघर्ष क्षेत्रांमधील उदयोन्मुख धोके देखील प्रकर्षाने बघायला मिळाले आहेत.
भारतीय हवाई दलाने (आयएएफ) या प्रदेशात महत्त्वपूर्ण पुरवठा आणि वैद्यकीय पथके हवाई मार्गाने पाठवणे सुरू ठेवले असताना, या मोहिमेवर पडलेली एक सावली समोर आली आहेः प्रगत, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप आणि मोहिमेला लक्ष्य करणारा सायबर घातपात.
याआधी सांगितल्याप्रमाणे, 29 मार्च रोजी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्रह्माने भारतीय हवाई दलाचे सी-130जे सुपर हर्क्युलस आणि सी-17 ग्लोबमास्टर III विमान मदत साहित्य, वैद्यकीय कर्मचारी आणि अभियांत्रिकी टेहळणी पथक पोहोचवण्यासाठी एकत्रित आणले.
मात्र, मोहिमेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, ही विमाने म्यानमारच्या हवाई हद्दीत प्रवेश करत असताना, त्यांना जीपीएसमध्ये विसंगती, दळणवळणातील व्यत्यय आणि नेव्हिगेशनल त्रुटी आढळल्या, ज्या जीपीएस स्पूफिंग आणि सायबर घुसखोरीची स्पष्ट चिन्हे म्हणून ओळखली जातात, असे भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्पूफिंग हल्ल्यांबद्दल
तज्ज्ञांच्या मते, अशा हल्ल्यांमध्ये विमान यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी बनावट जीपीएस सिग्नल्स प्रसारित करणे समाविष्ट असते. या हल्ल्यांमुळे उंचीतील विसंगती, अनियमित स्थान बदल आणि पूर्व-निर्धारित drop zone तात्पुरते गायब होणे यासारख्या घटना घडतात.
या हल्ल्यांमुळे होणारा डिजिटल हस्तक्षेप, विशेषतः दुर्गम भागात किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भूकंपामुळे नुकसान झालेल्या भागात, मोहिमेच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करू शकतो.
त्याच वेळी, भारतीय सायबर संरक्षण तुकड्यांना मिशन नियोजन प्रणालीचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न आढळून आले. त्यांनी फिशिंग ईमेल, मालवेअर इंजेक्शन आणि डेटामध्ये प्रवेश करण्याच्या अनधिकृत प्रयत्न झाल्याचे प्रकार पाहिले.
हे प्रयत्न भारताच्या मदतकार्याची कार्यक्षमता आणि परिणामकारकतेत व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने केले गेले असावेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतीय हवाई दलाचा प्रतिसाद
या सगळ्या विरोधात तत्काळ पावले उचलली गेली. आयएएफचे वैमानिक इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टीम्स (आयएनएस) आणि टीएसीएएन-आधारित नेव्हिगेशनकडे वळले. कारवाईची अखंडता कायम राहील याची खात्री करण्यासाठी त्यांनी भूप्रदेशाचे अनुसरण करणारे रडार आणि एन्क्रिप्टेड सॅटकॉम वाहिन्यांचा देखील वापर केला.
तसेच, इलेक्ट्रॉनिक एक्सपोजर कमी करण्यासाठी आणि पुढील स्पूफिंगचे प्रयत्न रोखण्यासाठी कठोर एएमसीओएन (उत्सर्जन नियंत्रण) प्रोटोकॉल सक्रिय केले गेले.
खुल्या संघर्षात न गुंतता शत्रूंना त्रास देणे किंवा त्यांना कमकुवत करणे या उद्देशाने युद्धाच्या उंबरठ्याखाली केलेल्या गुप्त आणि नाकारता येण्याजोग्या कृतींचे एक पुस्तकी उदाहरण म्हणून सुरक्षा विश्लेषक या हस्तक्षेपाचे वर्णन करतात.
नाव न सांगण्याची विनंती करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही जे पाहत आहोत ते म्हणजे मानवतावादी मार्गिकांचे शस्त्रीकरण.”
ही बँडविड्थची लढाई आहे, फक्त सीमांची नाही!
ही आव्हाने असूनही ऑपरेशन ब्रह्मा विनाअडथळा सुरूच आहे. मंडाले आणि नायपिडो प्रदेशातील संरचनात्मक नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी 6 एप्रिल रोजी भारतीय लष्कराचे अभियंता पथक म्यानमारमध्ये तैनात करण्यात आले होते. या चमूने सात प्रमुख पूल आणि 350 हून अधिक इमारतींसह अनेक महत्त्वाच्या स्थळांची तपासणी केली. त्यानंतर देखरेखीखाली केली जाणारी पाडापाडी आणि पायाभूत सुविधांच्या जीर्णोद्धारासाठी प्राथमिक शिफारसी दिल्या.
तैनात केल्यापासून अडीच हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करणारे मंडाले येथील भारतीय लष्कराचे फिल्ड रुग्णालय अजूनही कार्यरत आहे. एकट्या 11 एप्रिल रोजी 289 रुग्णांवर उपचार करण्यात आले, दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि 722 प्रयोगशाळेतील तपासण्या करण्यात आल्या.
याव्यतिरिक्त, आव्हानात्मक प्रदेशात शोध आणि बचाव (एसएआर) प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी robotic mules आणि नॅनो ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
म्यानमारमधील संकटाला भारताने दिलेला बहुआयामी प्रतिसाद-ज्यात high-altitude relief drops, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सहाय्य समाविष्ट आहे-एक जबाबदार प्रादेशिक शक्ती म्हणून त्याची प्रतिष्ठा वाढवते. मात्र, अलीकडील जीपीएस स्पूफिंग घटना ही एक स्पष्ट आठवण म्हणून काम करते की भविष्यातील मानवतावादी मोहिमांना सायबर युद्ध आणि इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांसारख्या गैर-गतिशील धोक्यांचा सामना करावा लागू शकतो.
भारत आपले डिजिटल संरक्षण वाढवत असताना, मानवतावादी संदर्भात इलेक्ट्रॉनिक युद्ध रोखण्यासाठी लवचिक नेव्हिगेशन प्रणाली तयार करण्यासाठी, विसंगती शोधण्यात सुधारणा करण्यासाठी आणि जागतिक निकष स्थापित करण्यासाठी निरीक्षक आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहन करतात.
करुणेच्या भावनेतून करण्यात आलेले ऑपरेशन ब्रह्मा हे आता अशा युगातील लवचिकतेसाठी एक testing ground आहे जिथे आपत्ती क्षेत्रे देखील डिजिटल संघर्षाच्या गडद पैलूंमुळे असुरक्षित आहेत.
हुमा सिद्दीकी