रण संवाद 2025 मध्ये, ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील धड्यांची उजळणी

0

मंगळवारी, आर्मी वॉर कॉलेज’मध्ये, देशाच्या काही उच्च लष्करी कमांडर्सनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कठीण धड्यांची उजळणी केली आणि त्यावर विचारमंथन केले. ‘रण संवाद 2025‘ या त्रि-सेवा चर्चासत्रात, त्यांनी भविष्यातील युद्धाचे स्वरूप कसे असेल यावरही चर्चा केली. हे चर्चासत्र- युद्धामधील तंत्रज्ञान, तिन्ही सेवांमधील समन्वय (jointness) आणि परिवर्तनावर केंद्रित होते.

‘नौदल उपप्रमुख’ व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, यांनी महू (Mhow) येथे सुरू असलेल्या या कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना, “ऑपरेशन सिंदूरमध्ये, नौदलाची तयारी आणि जलद हालचालींमुळे वेग, अचूकता आणि प्रतिबंधक क्षमता (deterrence) कशाप्रकारे साधता आली,” याविषयी सविस्तरपणे सांगितले.

“ऑप. सिंदूरमधून, केवळ नौदलालाच नाही, तर सर्व सशस्त्र दलांना अनेक धडे मिळाले आहेत, ज्यानंतर तिन्ही दलांत अनेक सुधारणा आधीच लागू करण्यात आल्या आहेत, आणि काही वेगाने सुरू आहेत,” असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “आता या चर्चा केवळ ऑपरेशनपुरत्या मर्यादित नसून, त्यापुढील विचारांवर आधारित आहेत. आम्ही अलीकडील संघर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा युद्धावर कसा व्यापक परिणाम झाला, याचा अभ्यास करत आहोत आणि भविष्यातील युद्धासाठी आपण कशी कल्पना आणि तयारी करायला हवी, याचा विचार करत आहोत.”

‘दक्षिण पश्चिम वायुसेनेचे प्रमुख’- एअर मार्शल नागेश कपूर यांनी, ‘आत्मनिर्भरता’ हा एक महत्त्वाचा धडा असल्याचे सांगितले, कारण त्यांच्या कमांडने या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

“सर्वात मोठा धडा स्वदेशीकरणाचा (indigenisation) आहे. आपण पुरवठा साखळीतील कमकुवतपणा परवडू शकत नाही. यावेळी आम्ही स्वदेशी शस्त्रास्त्रांचा वापर दाखवून दिला आणि भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आपल्याला देशातच नवनवीन शोध लावून उत्पादन करावे लागेल,” असे ते म्हणाले.

‘मध्य कमांड’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. सेनगुप्ता यांनी, ड्रोनमुळे निर्माण झालेल्या नवीन धोक्यावर प्रकाश टाकला.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आम्हाला मोठ्या संख्येने शत्रूच्या ड्रोनचा सामना करावा लागला. आपण ड्रोनविरोधी उपाययोजना मजबूत केल्या पाहिजेत आणि त्याच वेळी शत्रूच्या नेटवर्कला लक्ष्य करण्यासाठी आपल्या स्वतःच्या हवाई आणि स्वायत्त (autonomous) क्षमता विकसित केल्या पाहिजेत,” यावर त्यांनी भर दिला. ‘रण संवाद’ अशा चर्चांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.

माहितीच्या क्षेत्राबद्दल बोलताना, ‘एकात्मिक संरक्षण दलाचे उपप्रमुख’ लेफ्टनंट जनरल विपुल शिंगाल (जे या चर्चासत्राचे आयोजकही आहेत), त्यांनी ‘मानसिक युद्धात’ (cognitive warfare) माध्यमांची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित केली.

“सशस्त्र दले कथा तयार करू शकतात, पण ती योग्य दृष्टीकोनातून सांगितली गेली पाहिजे. तिथे माध्यमांची भागीदारी महत्त्वाची ठरते. मोठ्या संख्येने माध्यमांना ‘रण संवाद’मध्ये आमंत्रित करून, आम्ही त्या दिशेने योग्य पाऊल उचलत आहोत,” असे ते म्हणाले.

पुढील प्रतिबंधक भूमिका: नौदलाची ताकद

व्हाइस ॲडमिरल सोबती यांनी सांगितले की, “शांततेच्या काळात केलेली तयारी युद्धकाळातील तयारीसाठी थेट कशी उपयोगी पडली. या वर्षाच्या सुरुवातीला नौदलाचा ‘ट्रॉपेक्स’ (TROPEX) हा द्विवार्षिक थिएटर-स्तरीय सराव पूर्ण झाला होता, ज्यामुळे पहलगाम हल्ल्यामुळे संकट उद्भवले तेव्हा नौदल आधीच उच्च तयारीत होते.”

“96 तासांच्या आत, प्रत्येक कार्यरत जहाजावर दारूगोळा भरण्यात आला, पाणबुड्या सज्ज झाल्या, आणि आम्ही समुद्रात निघालो,” त्यांनी आठवण करून दिली.

यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे, भारताच्या सर्वात नवीन विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’वर 15 ‘मिग-29के’ लढाऊ विमाने दाखल झाली. यातून समुद्रातून होणाऱ्या शक्तिशाली प्रतिबंधाचे (deterrence) दर्शन घडले.

“आमचे उद्दिष्ट स्पष्ट होते, एक अशी पुढील प्रतिबंधक भूमिका राखणे जेणेकरून शत्रू नौदल आमच्या किनारपट्टीला, आमच्या व्यापारी मार्गांना किंवा आमच्या आर्थिक जीवनरेखांना धोका देऊ शकणार नाही,” ते म्हणाले. “ही भूमिका निर्णायक ठरली. आम्ही पाकिस्तानी नौदलाला त्यांच्या किनारपट्टीजवळ रोखून धरले, त्यांना हालचाल करण्याचे स्वातंत्र्य नाकारले आणि समुद्रावर नियंत्रण राखले.”

भविष्यातील युद्धासाठी तयारी

दोन दिवसांच्या ‘रण संवाद’ सत्रामध्ये, संयुक्त सिद्धांतांवर, तांत्रिक अनुकूलनावर आणि क्षमतांच्या रोडमॅपवर विचारमंथन केले जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अंतिम दिवशी मुख्य भाषण देणार आहेत, तर संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

‘रण संवाद’मध्ये मिळालेले प्रत्यक्ष ऑपरेशनल अनुभव आणि तंत्रज्ञान व ‘तिन्ही सेवांमध्ये समन्वय’ (jointness) यावरील भविष्याभिमुख चर्चा यांचा मिलाफ करून, ‘रण संवाद’ला ‘शांग्री-ला डायलॉग’ (आशियातील सर्वात महत्त्वाचा संरक्षण आणि सुरक्षा शिखर) च्या धर्तीवर भारताच्या पुढील पिढीच्या युद्धनीतींना आकार देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनवले जात आहे.

– रवी शंकर, महू

+ posts
Previous articleमोदींच्या जपान भेटीमुळे, धोरणात्मक संरक्षण संबंधांना मिळणार चालना…
Next articleIndia, US Advance Major Defence Partnership at 2+2 Intersessional Dialogue

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here