ऑपरेशन सिंदूरने आधुनिक युद्धात नवा मापदंड प्रस्थापित केला: CDS चौहान

0
ऑपरेशन सिंदूरने
एमपी-आयडीएसए कार्यक्रमात संबोधित करताना, सीडीएस जनरल अनिल चौहान

ऑपरेशन सिंदूरने आधुनिक युद्धनीतीचा नवा मापदंड प्रस्थापित केला असून, तंत्रज्ञानावार आधारित युद्धाचे बदलते स्वरूप अधोरेखित केले आहे. यातून भारताच्या जलद, समन्वित आणि अचूक लष्करी मोहिमा राबविण्याच्या क्षमतेचे दर्शन घडते.

‘दिल्ली डिफेन्स डायलॉग 2025’ दरम्यान, अधोरेखित करण्यात आलेल्या या ऑपरेशनमधील- अचूक हल्ले, नेटवर्क-केंद्रित समन्वय, डिजिटल बुद्धिमत्ता आणि बहु-क्षेत्रीय तंत्रांचा प्रभावी वापर यावर प्रकाश टाकण्यात आला, ज्याआधारे अत्यंत मर्यादित वेळेत यशस्वीरीत्या हे ऑपरेशन पार पडले.

या प्रसंगी बोलताना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरचे यश हे आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक आहे, जिथे नवोन्मेष आणि वेग हे ताकदीइतकेच महत्त्वाचे घटक झाले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “तांत्रिक वर्चस्व हे आता रणांगणावरच्या यशाचे निर्णायक घटक बनले आहे.” त्यांनी सशस्त्र दलांना सतत विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान आणि सिद्धांतांशी जुळवून घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

जनरल चौहान यांनी नमूद केले की, ‘युद्धाचे अंतिम उद्दिष्ट विजय हेच असले, तरी आता तो विजय तांत्रिक नवोन्मेष, रणनीतिक भागीदारी आणि संरक्षण संस्थांची झपाट्याने विकास करण्याची क्षमता यांवर अवलंबून आहे.’

दोन दिवस चाललेल्या दिल्ली डिफेन्स डायलॉगचे आयोजन, मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसेस (MP-IDSA) द्वारे करण्यात आले होते, तर याचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. “संरक्षण क्षमतावृद्धीसाठी नव्या युगातील तंत्रज्ञानाचा वापर” हा यावर्षीच्या चर्चासत्राचा विषय होता. 

MP-IDSA चे मुख्य-संचालक राजदूत सुजन चिनॉय, यांनी आपल्या भाषणात या परिषदेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले, जी संस्थेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती.

चिनॉय म्हणाले की, “जगभरातील लष्करे आता औद्योगिक युगातून- माहिती आणि सायबर युगात संक्रमण करत आहेत, जिथे डेटा आणि तंत्रज्ञान भविष्यातील युद्धनीतीचे स्वरूप ठरवतात. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या तंत्रज्ञानांचा संरक्षण तयारीत वाढता सहभाग अत्यावश्यक ठरत आहे.” याशिवाय त्यांनी “आत्मनिर्भर भारत” उपक्रमाअंतर्गत परदेशी सहकार्य आणि स्वदेशी नवोन्मेष यांच्यात संतुलन साधण्याची गरजही अधोरेखित केली.

या संवाद सत्रात संरक्षण धोरणकर्ते, उद्योग नेते, संशोधक आणि तज्ज्ञ एकत्र आले होते, जे भारताच्या तांत्रिक आघाडीला अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करत होते. या चर्चांमुळे डेटा-आधारित संरक्षण प्रणाली आणि भविष्यासाठी सज्ज अशी सुरक्षा क्षमता निर्माण करण्यात, महत्त्वपूर्ण योगदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleपुतिन यांच्या भेटीपूर्वी भारत-रशिया संरक्षण भागीदारीसाठी सज्ज
Next articleकल्याणी समूहाला पाण्याखालील संरक्षण प्रणालींसाठी ₹250 कोटींची ऑर्डर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here