भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक कत्तल योजनेमुळे तुर्कीत संतापाची लाट

0
भटक्या

भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक कत्तलीच्या सरकारच्या योजनेचा निषेध म्हणून शुक्रवारी राजधानी अंकारामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी तुर्की पोलिसांची निदर्शकांशी झटापट झाली. या भटक्या कुत्र्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन यांच्या सत्ताधारी ए. के. पक्षाने संसदेत सादर केलेल्या एका योजनेमुळे प्राणीप्रेमी सतर्क झाले. कुत्र्यांना निवाऱ्यांमध्ये बंद करण्यापेक्षा त्यांची सामूहिक नसबंदी करण्याची मोहीम हा एक चांगला उपाय असेल असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.


आंदोलकांनी शहराच्या मध्यभागी जमण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना मागे ढकलले. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

आंदोलकांनी, “तुम्ही त्यांना घेरू शकत नाही, तुम्ही त्यांना तुरुंगात टाकू शकत नाही, तुम्ही त्यांना मारू शकत नाही” आणि “कायदा मागे घ्या” असे लिहिलेले फलक यावेळी हातात धरले होते.

इथले जमलेले लोक अनेक प्राण्यांची काळजी घेतात. हा काय त्यांचा राग आहे का? रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरी मारल्या जाव्यात अशी तुमची इच्छा आहे का?” असा प्रश्न एका आंदोलनकर्त्याने मेगाफोनद्वारे विचारला.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांना सुमारे 30 दिवस आश्रय देणे आणि या काळात कुत्र्यांना कोणीही दत्तक न घेतल्यास त्यांना इच्छामरण देणे ही कायद्याने नगरपालिकांची जबाबदारी असते. आक्रमक कुत्रे किंवा उपचार करता न येण्याजोगे आजार असलेल्यांनाही पकडून ॲनिमल शेल्टर्समध्ये ठेवले जाते.


विधेयकातील मसुद्यानुसार, तुर्कीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 40 लाख असल्याचा अंदाज आहे. गेल्या 20 वर्षांत नगरपालिकांनी 25 लाख कुत्र्यांची नसबंदी केली आहे.


सध्या एकूण 1लाख 05 हजार कुत्र्यांना सामावून घेण्याची क्षमता असलेली 322 ॲनिमल शेल्टर्स आहेत, असे विधेयकात नमूद करण्यात आले आहे.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleदहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केलेल्या इसिसच्या सदस्यांना बेल्जियममध्ये अटक
Next articlePre-Olympic Attacks On France’s Railways Exposes Chinks In Armour

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here