चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान, परदेशी लोकांच्या अपहरणाचा कट उघड

0
चॅम्पियन्स
पाकिस्तानमधील कराची स्टेडियम हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठिकाणांपैकी एक आहे. (इमेज क्रेडिट: विकिमीडिया कॉमन्स)

पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ब्युरोने, सध्या देशात सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांना हजेरी लावणाऱ्या परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याचा दहशतवादी गटांचा संभाव्य कट उघडकीस आणला आहे. ज्यात मुख्यत्वे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतासह (ISKP), अन्य दहशतवादी संघटनांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत CNN-न्यूज18 च्या स्त्रोतांनी सांगितले की, ‘तहरीक-ए-तलिबान पाकिस्तान (TTP), ISIS आणि इतर बलुचिस्तानमधील दहशतवादी गटांसह, इतर अनेक गटांविरोधात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.’

ब्यूरोने जारी केलेल्या चेतावनीच्या अनुषंगाने, पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी खेळाडू आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा पथके तैनात केली आहे.

इंडिया टुडे चॅनेलनेच्या रिपोर्टनुसार, ‘दहशतवादी गट विशेषत: चीनी आणि अरब नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गट बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि इतर निवास क्षेत्रांमध्ये सातत्याने पाळत ठेवून आहेत.’

गुप्तचर अहवालानुसार, ISKP ऑपरेटर्स शहरांच्या बाहेरील भागात सुरक्षित घरे म्हणून मालमत्ता भाड्याने देण्याची योजना आखत आहेत, कॅमेऱ्याच्या देखरेखीशिवाय आणि केवळ रिक्षा किंवा मोटारसायकलने प्रवेश करण्यायोग्य ठिकाणे जाणूनबुजून निवडतात.

सुरक्षा दलांपासून दूर राहण्यासाठी अपहरण केलेल्या व्यक्तींना रात्रीच्या वेळी सुरक्षित घरांमध्ये हलवण्याची योजना गटाने आखली आहे. 2024 मध्ये शांगला येथे दहशतवाद्यांनी चिनी अभियंत्यांवर हल्ला केला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीने पाकिस्तानमध्ये 29 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे पुनरागमन केले आहे. दक्षिण आशियाई देशाने 1996 मध्ये, शेवटचे भारत आणि श्रीलंकेसोबत आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते.

पाकिस्तानमध्ये अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही आणि 2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना घेऊन जाणाऱ्या बसवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर परदेशी संघांनी देशात जाण्यास नकार दिला.

भारताचे दुबईत सामने

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होतेवेळी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांचे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी, यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईत खेळवण्याच्या भारताच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

“हा निर्णय फक्त PCB (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) साठीच नाही तर, जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी, ICC साठी, त्यांच्या व्यावसायिक भागीदारांसाठी आणि भारत ज्या देशांत खेळत नाही अशा इतर सहभागी देशांसाठी अत्यंत निराशाजनक आहे,” असे मत त्यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुटसह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here