चीनचा सर्वाधिक पाकिस्तानवर प्रभाव तर भारताचे अवलंबित्व सर्वात कमी

0
प्रभाव
30 मे 2022 रोजी घेतलेल्या या चित्रात चिनी ध्वज दिसत आहे. (रॉयटर्स/डॅडो रूविक/चित्रण/फाईल फोटो) 
पीपल्स रिपब्लिकचा जागतिक प्रभाव नेमका किती आहे याबाबतचा पहिला अभ्यास नुकताच पूर्ण झाला. या अहवालानुसार चीनकडून सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 देशांच्या यादीत पाकिस्तान आघाडीवर आहे. तर चीनच्या प्रभावाच्या बाबतीत भारताचा क्रमांक सर्वात खाली आहे.

चायना इन द वर्ल्ड नेटवर्कद्वारे (CITW)  प्रकाशित आणि तैवान-आधारित CSO डबलथिंक लॅबच्या भागीदारीत, चीनच्या जागतिक प्रभावाचा डेटा  गोळा करून तुलनात्मक भौगोलिक विश्लेषण तयार केले जाते.

“चायना इंडेक्स समाजांना त्यांच्या देशाचे चीनशी असलेले संबंध तपासण्यासाठी, त्याचा प्रभाव उघड करण्यासाठी आणि जबाबदार द्विपक्षीय संबंधांसाठी समर्थन देण्यासाठी एक साधन म्हणून काम करतो,” असे अभ्यासात म्हटले आहे.

डबलथिंक लॅब्स ही एक स्वतंत्र ना-नफा संस्था आहे जी प्रशासन, डिजिटल इंटेलिजेंस, ग्लोबल रिसर्च आणि सोशल एंगेजमेंटमध्ये संरचित 20 व्यावसायिकांच्या टीममध्ये कर्मचारी म्हणून काम करते. ते इंडो-पॅसिफिकमधील नागरी समाज संघटनांसोबत काम करतात आणि CITW नेटवर्कद्वारे 100 हून अधिक देशांमधील भागीदारांशी जोडलेले आहेत.

चायना इंडेक्स अभ्यासात 101 देश आणि शैक्षणिक संस्था, देशांतर्गत राजकारण, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, कायदा अंमलबजावणी, मीडिया, लष्कर, समाज आणि तंत्रज्ञान अशा नऊ विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

चीनच्या प्रभावाचे मोजमाप करण्यासाठी ते एक्सपोजर, प्रेशर आणि अलाइनमेंट देखील पाहते. आर्थिक अवलंबित्व प्रभावात कसे रूपांतरित होते, चीनबद्दल विशिष्ट संदेश आणि प्रतिमा देणाऱ्या मीडिया भागीदारींबद्दल काय? यामागे त्यांचे आर्थिक किंवा राजकीय फायदे देखील आहेत का? याचाही अभ्यासात विचार केला जातो.

या आधारे, चीन इंडेक्स पाकिस्तानला चीनसोबतची दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी, बीआरआयमध्ये त्याची सखोल असणारी एकात्मता, जवळच्या लष्करी आणि सुरक्षा भागीदारी तसेच चिनी डिजिटल आणि टेलिकॉम पायाभूत सुविधांवर जास्त अवलंबून राहणे या मुद्द्यांच्या आधारे 10 देशांच्या यादीत पाकिस्तानचा पहिला क्रमांक लागतो.

तंत्रज्ञान, लष्करी आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात पाकिस्तान चीनपासून सर्वाधिक प्रभावित आहे असे त्यात म्हटले आहे.

बीजिंगकडून मिळणारा थेट पाठिंबा, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील मोठ्या गुंतवणूकी तसेच दोन्ही देशांच्या कायदा अंमलबजावणी संस्थांमधील संबंध मजबूत करणाऱ्या सुरक्षा उपक्रमांमुळे यादीत दुसऱ्या क्रमांकावर कंबोडिया आहे.

चिनी भाषेतील माध्यमांची उपस्थिती, चिनी कंपन्यांशी तंत्रज्ञान आणि व्यापार एकात्मता तसेच चिनी शैक्षणिक संस्थांसोबत मजबूत शैक्षणिक भागीदारी यामुळे सिंगापूर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने सिंगापूरच्या समाजात आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही खोलवर हातपाय पसरले आहेत.

संयुक्त सरावांसह मजबूत लष्करी सहकार्य यामुळे चीन हा इंडोनेशियातील एक प्रमुख गुंतवणूकदार आहे. डिजिटल आणि पायाभूत सुविधांच्या विकासात बीजिंगची भूमिका महत्त्वाची असल्याने उभय देशांमधील मजबूत आर्थिक संबंध यामुळे इंडोनेशिया या यादीत 7 व्या स्थानावर आहे.

चीन निर्देशांकात सर्वेक्षण केलेल्या 101 देशांपैकी, भारत अवलंबित्वाच्या यादीत 100 व्या स्थानावर आहे आणि एल साल्वाडोर अगदी तळाशी आहे. भारत-चीन संबंधांमधील तणाव निवळण्याचे संकेत दिसत असले तरी, गेल्या दशकापासून वाढत असलेला अविश्वास कमी व्हावा हे सूचित करणारा एकही मुद्दा नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

याउलट, भारताने अजूनही चिनी गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याबाबत आश्वासने देऊनही चीन मागे हटत आहे. पाकिस्तानी लष्कराशी असलेले त्यांचे जवळचे संबंध आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादी गटांच्या यादीला असलेला विरोध यावरून असे दिसून येते की चीन भारताला आशियामध्ये एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. म्हणूनच चीनचा उदय थांबवला पाहिजे, तसं करता येत नसेल तर तो उदय विलंबाने कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे किंवा त्याला दुसरे वळण दिले  पाहिजे.

सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleचीनची J-10C लढाऊ विमाने ढाक्याकडे: पूर्वेकडून भारतावर नवा दबाव
Next articleट्रम्प यांच्या गाझा युद्धविराम करारावर, इस्रायल आणि हमासची सहमती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here