दुबई एअर शो 2025: JF-17 फायटर निर्यात करारावर पाकिस्तानचे शिक्कामोर्तब

0
दुबई एअर शो 2025 मध्ये पाकिस्तानने एक मोठी विक्री केली आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (ISPR) या गोष्टीला दुजोरा दिला की पुढील पिढीच्या JF-17 थंडर ब्लॉक III लढाऊ विमानासाठी एका अज्ञात “मैत्रीपूर्ण” देशासोबत निर्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली आहे. ही घोषणा त्याच दिवशी करण्यात आली जेव्हा भारतीय हवाई दलाचे (IAF) तेजस विमान या कार्यक्रमात एरोबॅटिक प्रात्यक्षिकादरम्यान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला, आणि भारताच्या एरोस्पेस महत्त्वाकांक्षेवर अनपेक्षितपणे नकारात्मकतेची सावली पडली.

ISPR ने हा खरेदीदार नेमका कोण आहे याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, मात्र संरक्षण अधिकारी आणि विश्लेषक या सामंजस्य कराराला पाकिस्तानच्या दृष्टीने हे एक धोरणात्मक यश मानतात. कारण जागतिक लढाऊ बाजारात JF-17 ला स्पर्धात्मक, कमी किमतीचा पर्याय म्हणून स्थान देण्यासाठी ते वर्षानुवर्षे काम करत आहे. हा करार पाश्चात्य प्लॅटफॉर्म संबंधित राजकीय अटी किंवा उच्च अधिग्रहण खर्चाशिवाय आधुनिक लढाऊ विमान शोधणाऱ्या देशांसाठी इस्लामाबादच्या या कथेला बळकटी देतो की ते एक विश्वासार्ह संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास येत आहे.

पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स (PAC) आणि चीनच्या चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (CAC) यांनी संयुक्तपणे निर्माण केलेला ब्लॉक III या प्रकाराने एअर शो दरम्यान आक्रमक युक्त्या आणि अचूक एरोबॅटिक्सचे प्रदर्शन केले, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक याकडे आकर्षित झाले आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आउटलेट्सकडून देखील याला अनुकूल टिप्पणी मिळाली. अनेक संरक्षण पोर्टलने विमानाच्या प्रदर्शनाचे वर्णन “चपळ आणि संतुलित” असे करताना नमूद केले की ते कामगिरीच्या बाबतीत “आधीच प्रस्थापित विमानांना टक्कर देते.”  ही गोष्ट पाकिस्तानने त्याच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी सक्रियपणे वापरली आहे.

स्पर्धात्मक किंमत आणि लक्ष्य बाजार

JF-17 ची विक्रीमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याची किंमत आहे. प्रति विमान अंदाजे 25-30 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी किंमत असल्याने, ते पाश्चात्य स्पर्धकांना मागे टाकते जसे की:

  • F-16 ब्लॉक 70:  60-80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स
  • ग्रिपेन E: अंदाजे 85 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स

या किमतीचा फायदा बजेटची कमतरता असलेल्या, अमेरिका किंवा युरोपवर धोरणात्मक अवलंबित्व टाळू इच्छिणाऱ्या देशांच्या लष्करांना लक्ष्य करतो. पाकिस्तानने आधीच अझरबैजानला ब्लॉक III जेटची डिलिव्हरी सुरू केली आहे आणि ISPR नुसार, अनेक देशांनी एअर शो दरम्यान मोठ्या प्रमाणात रस दाखवल्यामुळे दुबई सामंजस्य करार आणखी गती निर्माण करण्यास मदत करू शकतो.

ब्लॉक III ची क्षमता

JF-17 ब्लॉक III मध्ये उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत:

  • रशियन RD-93 टर्बोफॅन इंजिन जे मॅक 1.6 पर्यंत वेग निर्माण करते
  • सुमारे 1 हजार 200 किमीची लढाऊ त्रिज्या
  • 50 हजार फूटची सेवा मर्यादा
  • अंदाजे 3 हजार 400 किलोग्रॅमची पेलोड क्षमता

200 किमी पेक्षा जास्त पल्ल्यापर्यंत जाऊ शकणारे प्रगत PL-15 लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
या सुधारणांमुळे ब्लॉक III पूर्वीच्या प्रकारांपेक्षा एक पाऊल पुढे आहे, ज्याचा उद्देश रडार श्रेणी, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि लांब पल्ल्याच्या सहभागातील अंतर दूर करणे आहे. टीकाकारांनी पूर्वीच हे मुद्दे मांडले होते.

भारतासाठी मोठा धक्का

निर्यात घोषणेमुळे भारताला मोठा धक्का बसला. आठ मिनिटांच्या एरोबॅटिक प्रोफाइलमध्ये सहभागी असलेले भारतीय हवाई दलाचे हलके लढाऊ विमान (एलसीए) तेजस त्याच्या प्रदर्शनादरम्यान अपघातग्रस्त झाले. पायलटचा मृत्यू आणि विमानाची कामगिरी यामुळे कार्यक्रमात भारताच्या उपस्थितीवर एक धक्का बसला आणि भारतीय बाजूने जागतिक मीडिया कव्हरेजवर अपरिहार्यपणे नकारात्मक पद्धतीने वर्चस्व गाजवले.

अर्थात या  दोन्ही घडामोडींचा एकमेकांशी कोणताही परस्पर संबंध नसला तरी, वेळेने एक विरोधाभासी कथन तयार केले:

  • पाकिस्तान निर्यात करारावर स्वाक्षरी करत आहे, वाढत्या बाजारपेठेतील प्रभावाचा अंदाज लावत आहे
  • भारत एका अनुभवी पायलट आणि आघाडीच्या लढाऊ प्रोटोटाइपच्या झालेल्या नुकसानाचा सामना करत आहे
  • जागतिक धारणांच्या लढाईत – आधुनिक संरक्षण उद्योग स्पर्धेतील  तो दिवस पाकिस्तानचा होता.

बाजारातील गती, पण प्रश्न कायम आहेत

सकारात्मक दृष्टिकोन असूनही, अनेक तपशीलांबाबत अद्यापही पुरेशी स्पष्टता नाही:

  • खरेदी करणाऱ्या देशाची ओळख
  • ऑर्डरचा आकार
  • वितरण वेळापत्रक
  • सामंजस्य करार हा एका ठोस खरेदी करारात रूपांतरित होईल की नाही

एअरशो सामंजस्य करार बहुतेकदा तात्काळ खरेदी वचनबद्धतेऐवजी सिग्नलिंगचे साधन म्हणून काम करतात. आर्थिक, लॉजिस्टिक आणि राजकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करार टिकतो की नाही याची खरी परीक्षा असेल.

व्यापक परिणामांसह एक प्रतीकात्मक विजय

सध्या, पाकिस्तानने दुबई एअरशोचा वापर खालील गोष्टी दाखवण्यासाठी केला आहे:

  • त्याच्या देशांतर्गत एरोस्पेस उद्योगातला वाढता विश्वास
  • चीनसोबत परिपक्व भागीदारी
  • JF-17  ला आघाडीचा पण परवडणारा लढाऊ पर्याय म्हणून वाढती स्वीकृती

जर सामंजस्य कराराचे रूपांतर निश्चित विक्रीत झाले तर ते जगाच्या मुख्य प्रवाहातील हलक्या लढाऊ विमानांच्या निर्यातीत JF-17 ला स्थान देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नात आणखी एक मैलाचा दगड ठरेल – ज्या क्षेत्रात अद्याप तेजससह भारताने प्रवेश केलेला नाही.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIs Bangladesh the ‘friendly nation’ buying JF-17 Block III jets from Pakistan? Reports point to Dhaka
Next articlePakistan Reacts Strongly to Rajnath Singh’s ‘Sindh May Return to India’ Remark

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here