रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या आठवड्यात हनोईला भेट देणार आहेत, ज्यामुळे व्हिएतनामचे रशियाशी असलेले संबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. या नियोजित भेटीवर अमेरिकेकडून तीव्र टीका करण्यात आली आहे.
मुत्सद्दीदृष्ट्या असणारे महत्त्व
स्वित्झर्लंडमधील युक्रेन शांतता शिखर परिषदेमध्ये व्हिएतनामची अनुपस्थित तर रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स बैठकीतील सहभागानंतर पुतीन यांचा हा दौरा होणार आहे. अलीकडेच पाचव्यांदा शपथ घेतलेल्या पुतीन आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात व्हिएतनामचे नवे अध्यक्ष तो लॅम आणि इतर नेत्यांना भेटणार आहेत.
व्हिएतनामचा सर्वोच्च व्यापारी भागीदार असलेल्या अमेरिकेने या दौऱ्यावर कठोर टीका केली आहे. हनोई येथील अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोणत्याही देशाने पुतीन यांना त्यांच्या आक्रमक युद्धाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ देऊ नये किंवा त्यांनी सुरू केलेल्या अत्याचारांचे सामान्यीकरण करण्याची परवानगी देऊ नये. फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या युक्रेन आक्रमणाचा संदर्भ देत, पुतीन यांना मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी दिल्याने रशियाचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होऊ शकते यावर प्रवक्त्याने भर दिला.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) युक्रेनमधील कथित युद्धविषयक गुन्ह्यांसाठी मार्च 2023 मध्ये पुतीन यांच्या नावे अटक वॉरंट जारी केले आहे. व्हिएतनाम, रशिया आणि अमेरिका हे आयसीसीचे सदस्य नाहीत.
व्हिएतनामचा आणखी एक प्रमुख आर्थिक भागीदार असलेल्या युरोपियन युनियनने या भेटीबाबत भाष्य केलेले नाही. मात्र रशियन निर्बंधांबाबत युरोपियन युनियनच्या दूताशी ठरलेली बैठक लांबणीवर टाकण्याच्या व्हिएतनामच्या निर्णयावर त्यांनी गेल्या महिन्यात नाराजी व्यक्त केली होती. बैठक लांबणीवर टाकण्याचा संबंध अधिकाऱ्यांनी पुतीन यांच्या भेटीच्या तयारीशी जोडला आहे.
सिंगापूरस्थित आयएसईएएस – युसूफ इशाक इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी इयान स्टोरी यांनी नमूद केले की व्हिएतनामच्या दृष्टीकोनातून या भेटीचा उद्देश संतुलित परराष्ट्र धोरण दर्शविणे हा आहे. व्हिएतनामला अलीकडेच जो बायडेन आणि शी जिनपिंग या दोघांनीही भेट दिली आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये या प्रमुख जागतिक शक्तींमध्ये आपली तटस्थताही दर्शविली आहे.
आर्थिक, सुरक्षाविषयक संबंधांवर लक्ष केंद्रित
2017 नंतरच्या आपल्या पहिल्याच व्हिएतनाम दौऱ्यात पुतीन व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील करारांबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. अर्थात व्हिएतनामचा सर्वोच्च शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून रशियाची असणारी ऐतिहासिक भूमिका, व्हिएतनामी वायू आणि तेल क्षेत्रांमधील त्याचा सहभाग लक्षात घेता, शस्त्रास्त्रे, ऊर्जा आणि देयके यासह अधिक संवेदनशील मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
रशियन बँकांवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यवहार करण्याच्या आव्हानांवरही यावेळी चर्चा होईल. व्हिएतनाम सुरक्षेचे वरिष्ठ तज्ज्ञ कार्ल थायर यांनी सांगितल्याप्रमाणे, पुतीन आणि व्हिएतनामी नेते आर्थिक व्यवहार आणि बिलांची पेमेंट सुलभ करण्यासाठी रुबल-डोंग चलन व्यवहारांवर सहमत दर्शवू शकतात
रेशम
(रॉयटर्सच्या इनपुटसह)