हैदराबादमधील डीआरडीओच्या क्षेपणास्त्र संकुलाला संरक्षणमंत्र्यांची भेट

0
क्षेपणास्त्र

स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींच्या रचना आणि विकासासाठीचा कणा अशी ओळख असलेल्या डीआरडीओच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे भेट दिली.
रिसर्च सेंटर इमारतद्वारे(आरसीआय) क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि संबंधित कार्यक्रमांची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली. डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत आणि आरसीआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते. 

नोव्हेंबर 2024 मध्ये यशस्वी उड्डाण चाचण्या झालेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या चमूचा सिंह यांनी सत्कार केला. या यशस्वी चाचणीने भारताला हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता असलेल्या निवडक देशांच्या गटात स्थान दिले.

या भेटीत शास्त्रज्ञांशी संवाद साधताना संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या संरक्षण क्षमतेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची प्रशंसा केली आणि एकत्रित प्रयत्नांमुळे 2027 पर्यंत भारतला पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये वेगाने विकसित होत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाचा विचार करत राहण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले.

आपल्या भाषणात, डीआरडीओच्या अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि भारत ‘आत्मनिर्भर’ तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील नेता होईल याची खात्री करण्यासाठी संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous article‘मॉडर्न वॉर’चा सामना करण्यासाठी, भारताला आधुनिक तंत्रज्ञानाचीच गरज
Next articleट्रम्प आणि झेलेन्स्की संघर्ष उघड, रशिया युक्रेन युद्ध सुरूच राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here