संरक्षणमंत्र्यांनी HMAS Kuttabul ला भेट देत, उद्योग सहकार्याला दिली चालना

0

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, ‘HMAS Kuttabul‘ या धोरणात्मक नौदल सुविधेला भेट दिली आणि सिडनी येथे झालेल्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग गोलमेज परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले. यावेळी दोन्ही देशांनी, इंडो-पॅसिफिक प्रदेशात सुरक्षा मजबूत करण्यासाठी परस्पर औद्योगिक सहकार्य, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढविण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरूच्चार केला.

सिंह यांनी, सिडनीतील ऐतिहासिक नौदल सुविधा- ‘HMAS कुट्टाबुल’ला दिलेल्या भेटीदरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या वाढत्या सागरी सहकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. सहाय्यक संरक्षणमंत्री पीटर खलील यांच्या उपस्थितीत, सिंह यांना कुट्टाबुल सुविधेच्या ऑपरेशनल क्षमतांबद्दल माहिती देण्यात आली आणि सिडनी हार्बू येथील अत्याधुनिक जहाज अॅडमिरल हडसनवरही नेण्यात आले. या भेटीमुळे, दोन्ही देशांचे सागरी क्षेत्र जागरूकता (MDA) वाढवण्याचे उद्दिष्ट आणि सुरक्षित इंडो-पॅसिफिकला प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता अधोरेखित झाली.

त्यानंतर, सिंग यांनी पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले. 2020 मध्ये सुरू करण्यात आलेल्या, व्यापक द्विपक्षीय सामरिक भागीदारीच्या (CSP) अंतर्गत, सामरिक देवाणघेवाणीपासून ते औद्योगिक सहकार्यापर्यंत. भागीदारीचा विस्तार करण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण मंच ठरली.

परिषदेमध्ये उपस्थित औद्योगिक नेत्यांना संबोधित करताना सिंह यांनी, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे वर्णन “सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकचे सह-निर्माते” असे केले. औद्योगिक सहकार्य- विशेषतः संयुक्त संशोधन आणि विकास, सह-विकास आणि नवोपक्रम, यांच्या वाढीवर भर दिला गेला. सिंह यांनी, ऑस्ट्रेलियन कंपन्यांना प्रोपल्शन सिस्टम (संचलन प्रणाली), स्वयंचलित पाणबुड्या आणि अन्य प्रगत साहित्य यांसारख्या तंत्रज्ञानाच्या विकासात भागीदारी करण्याचे आवाहन केले.

भारताचा ‘एक महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र’ म्हणून झालेला विकास, सिंह यांनी यावेळी आवर्जून अधोरेखित केला. आर्थिक वर्ष 2023–24 मध्ये, भारताचे संरक्षण उत्पादन ₹1.51 लाख कोटी (अंदाजे 18 अब्ज USD) इतके होते, तर संरक्षण निर्यात ₹23,622 कोटी (2.76 अब्ज USD) इतकी होती. त्यांनी या प्रगतीचे श्रेय ‘मेक इन इंडिया’ उपक्रम, उत्पादन प्रोत्साहन योजना आणि FDI अर्थात ‘विदेशी थेट गुंतवणूक’ धोरणातील सवलतींना आणि सुधारणांना दिले.

सिंह यांनी, DRDO आणि ऑस्ट्रेलियाचा Defence Science & Technology Group (DSTG) यांच्या, टोव्ड-अ‍ॅरे सोनार प्रणालींवर’ (towed-array sonar systems) सुरू असलेल्या संयुक्त संशोधनाकडे लक्ष वेधले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान, सायबर संरक्षण आणि माहिती युद्ध या क्षेत्रांतील सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चांचा देखील त्यांनी उल्लेख केला.

त्यांनी, इंडो-MIM आणि थेल्स ऑस्ट्रेलिया, तसेच टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि W&E प्लॅट यांसारख्या महत्वाच्या औद्योगिक भागीदारींचे उदाहरण दिले, ज्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या परस्परपूरक क्षमतांचे दर्शन घडवतात. त्यांनी नमूद केले की: भारतीय शिपयार्ड्स पॅसिफिक मेरीटाइम सिक्युरिटी प्रोग्रॅमअंतर्गत, रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या गरजा पूर्ण करण्यात सहाय्य करण्यास सज्ज आहेत.

कॅनबेराच्या परस्पर संरक्षण लॉजिस्टिक्स आणि सेवा कराराच्या प्रस्तावाचे स्वागत करत, सिंह यांनी हरित जहाजबांधणी (green shipbuilding), स्वायत्त तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स आणि पुरवठा साखळीचे विविधीकरण यासंबंधी संयुक्त उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. “संधीला भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ही गोलमेज परिषद भारताचे संरक्षण मंत्रालय, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण विभाग, न्यूलँड ग्लोबल ग्रुप आणि ऑस्ट्रेलिया–भारत व्यवसाय परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleRolls-Royce Charts Strategic Expansion in India: From Electric Warships to Engine MRO Hubs
Next articleरोल्स-रॉईसची विविध उपक्रमांसह, भारतात धोरणात्मक विस्ताराची योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here