Monday, March 2, 2026
Solar
MQ-9B
Home Bharat Shakti Marathi अमेरिकेतील चर्चमध्ये गोळीबार; 2 महिलांचा मृत्यू, पोलीस कर्मचारीही जखमी

अमेरिकेतील चर्चमध्ये गोळीबार; 2 महिलांचा मृत्यू, पोलीस कर्मचारीही जखमी

0

रविवारी, अमेरिकेतील केंटकी राज्यात एका धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात बंदूकधाऱ्याने तिथल्या चर्चमध्ये गोळीबार केला, ज्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने विमानतळाजवळ एका स्थानिक पोलिसावर गोळी झाडून त्याला जखमी केले आणि अखेर या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घालत ठार केले.

लेक्सिंग्टन येथील रिचमंड रोड बॅपटिस्ट चर्चमध्ये हे हत्याकांड घडले. त्या ठिकाणी आणखी दोन पुरुष जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती लेक्सिंग्टनचे पोलीसप्रमुख लॉरेन्स वेदर्स. यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

संशयित आरोपीचे नाव किंवा वय पोलिसांनी अद्याप जाहीर न केल्यामुळे, त्याची स्पष्ट ओळख पटलेली नाही.

‘अत्यंत कठीण’ दिवस – पोलिसप्रमुख

“आजचा दिवस अत्यंत कठीण आहे,” असे वेदर्स म्हणाले. “कधी कधी काही गोष्टी अशा घडतात, ज्यामागचे कारण समजत नाही,” असेही त्यांनी जोडले.

सकाळी सुमारे 11.30 वाजता, फेयेट काउंटीतील ब्लू ग्रास विमानतळाजवळ पोलिसांनी गाडी थांबवली असता, आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक राज्य पोलिस अधिकारी जखमी झाला. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

गोळीबारानंतर आरोपीने विमानतळापासून सुमारे 10 मैल (16 किमी) दूर, एका वाहनाचे अपहरण केले आणि त्या वाहनाने तो रिचमंड रोड बॅपटिस्ट चर्चच्या दिशेने निघाला. तेथे पोहोचताच त्याने चर्चच्या परिसरात लोकांवर गोळीबार सुरू केला.

पोलिसांनी त्या अपहरण केलेल्या वाहनाचा माग काढून आरोपीला चर्चमध्ये घेरले.

गोळीबारामागचे कारण अस्पष्ट

या हल्ल्यामागचे कोणतेही स्पष्ट कारण पोलिसांनी दिलेले नाही. मात्र, आरोपी चर्चमधील काही लोकांना ओळखत असावा अशी शक्यता असल्याचे, पोलीसप्रमुखांनी सांगितले.

वेदर्स यांनी स्पष्ट केले की, ‘गोळीबाराच्या या घटनेची पोलीस विभागाच्या धोरणांनुसार अंतर्गत चौकशी केली जाईल.’

ब्लू ग्रास विमानतळ प्रशासनाने, दुपारी 1 वाजता (ET), सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वरुन जनतेला सूचित केले की, ‘या घटनेचा कायदेशीर तपास चालू आहे आणि त्यामुळे विमानतळाच्या एका रस्त्यावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, सर्व उड्डाणे आणि नियमित सेवा सुरळीत सुरू आहेत,’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपंतप्रधान मोदी यांचा आगामी UK दौरा; प्रमुख अजेंड्यावर जेट इंजिनची चर्चा
Next articleट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर, EU ने प्रत्युत्तर देण्यास नकार दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here