गेल्या वर्षी अमेरिकेने आपले सैन्य माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबान पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि 15 ऑगस्ट 2021मध्ये लोकनियुक्त हमीद करझाई सरकार पदच्युत करून तालिबान्यांनी सत्तेवर कब्जा केला. आता त्याला वर्ष होत आले असले तरी, कोणत्याही देशांनी त्यांच्या सरकारला मान्यता दिलेली नाही.
तालिबानी राजवटीच्या उदयानंतर भारताने या देशाबरोबर असलेले आपले राजनैतिक संबंध पूर्णपणे संपवले होते. भारताने तेथील दूतावास बंद करून दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने सुखरूप मायदेशी परत आणले. इतर देशांनी देखील आपापले दूतावास बंद केले. त्यानंतर जवळपास आठ महिने भारत हा अफगाणिस्तानपासून अलिप्तच राहिला. मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तालिबान्यांनी केलेल्या आवाहनानुसार भारताने अफगाण जनतेसाठी अन्नधान्य, औषधे यांचा पुरवठा सुरू केला. त्यानंतर या मदतीचा आढावा घेण्यासाठी जून महिन्याच्या सुरुवातीला भारतीय शिष्टमंडळ अफगाणिस्तान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांची तालिबान सरकारनेही भेट घेतली.
शेजारधर्म पाळत भारताने मानवतेच्या दृष्टीने अफगाणी जनतेला मदत देण्याचे कायम ठेवले आहे. या मदतीच्या नियोजन व देखरेखीसाठी तिथे भारतीय यंत्रणा असणे गरजेचे आहे, असे लक्षात आल्यानंतर अफगाणिस्तानमधील दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, 1996मध्ये तालिबानी राजवट अफगाणिस्तानात आल्यावर भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तेथून तातडीने मायदेशी परत यावे लागले. ही राजवट अत्याचारी होती. पण आताच्या तालिबान्यांनी मवाळ भूमिका घेतली आहे, असे सध्या तरी चित्र आहे. त्यामुळे तिथे दूतावास पुन्हा सुरू केल्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. कारण तालिबानने आपले हिंसक रूप बदलले असले तरी, इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हिंस (ISKP) या संघटनेच्या अतिरेकी कारवाया सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर तालिबान सरकारकडून जूनमध्ये भारताच्या शिष्टमंडळाला बैठकीचे आमंत्रण दिले गेले होते. या बैठकीत भारतीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी तालिबान सरकारने दिली आणि म्हणूनच सध्या भारतीय दूतावास अंशतः सुरू करण्यात आले.
अफगाणी जनतेसाठी असलेली भारताची मानवतावादी भूमिका तालिबानी राज्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी भारताशी सहकार्याचे धोरण ठेवले आहे. तर दुसरीकडे, भारताशी कायम शत्रूत्व ठेवणारा पाकिस्तान मात्र यामुळे अस्वस्थ झाला आहे. मागील वर्षी अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्याने पाकिस्तान उत्साही होता. पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाकिस्तानशी फारशी जवळीक केलेली नाही. म्हणूनच ISKPच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये कारवाया करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान आहे. त्यामुळे भारताला त्यापासून धोका आहे का? तालिबानची भूमिका यात काय असेल? भारतीय दूतावास सुरू करण्याचे आणखी काय फायदे आहेत? भारताच्या मदतीच्या धोरणाबाबत अमेरिकेची भूमिका काय आहे?
या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलवर पाहा –