
रशियाने युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी आणि वॉशिंग्टनशी असलेल्या हितसंबंधांना पुन्हा सुरळीत करण्यासाठी, अमेरिकेसोबतच्या चर्चेसाठी, काही महत्वाच्या मागण्या मांडल्या आहेत, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले.
मॉस्कोने आपल्या मागण्यांच्या यादीत नेमके काय काय समाविष्ट केले आहे किंवा ते स्विकारण्यापूर्वी मॉस्को कीवशी शांतता चर्चेत सहभागी होण्यास इच्छुक आहे की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. गेल्या तीन आठवड्यांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या झालेल्या संभाषणादरम्यान, रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी या अटींवर चर्चा केली असल्याचे काही संबंधित व्यक्तींनी सांगितले.
क्रेमलिनच्या अटी व्यापक आणि युक्रेन, अमेरिका आणि नाटो (NATO) यांनी यापूर्वी सादर केलेल्या मागण्यांसारख्याच असल्याचे वर्णन केले. या मागण्यांचा थोडक्यात आढावा…
NATO सदस्यत्व नाही
पूर्वीच्या अटींमध्ये कीवसाठी नाटो सदस्यत्व न देण्याची अट, युक्रेनमध्ये परदेशी सैनिक तैनात न करण्याचा करार आणि क्रेमियासह चार प्रांत रशियाचे असल्याचे अध्यक्ष व्ह्लादिमीर पुतिन यांचे दावे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्याची अट समाविष्ट होती.
अलीकडील वर्षांत, रशियाने अमेरिकe आणि नाटोकडून युद्धाची “मूळ कारणे” समजून घेण्याची मागणी केली आहे, ज्यात नाटोचा पूर्वेकडील विस्तार या मुद्द्याचाही समावेश आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, 30 दिवसांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर, राष्ट्राध्यक्ष पुतिन कशाप्रकारे प्रतिसाद देतील हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत, जे शांती चर्चेच्या पहिले पाऊल असू शकते.
पुतिन यांची संभाव्य युद्धविराम कराराबद्दलची प्रतिबद्धता अद्याप अनिश्चित आहे, आणि त्याचे तपशील अजून अंतिम केले गेलेले नाहीत.
काही अमेरिकन अधिकाऱ्यांना आणि कायदेतज्ञांना भीती आहे की, केजीबीचे (KGB) माजी अधिकारी असलेले पुतिन, युद्धविरामाचा वापर अमेरिका, युक्रेन आणि युरोपमध्ये फूट पाडण्यासाठी आणि कोणत्याही चर्चेला कमकुवत करण्यासाठी करू शकतात.
वॉशिंग्टनमधील रशियाचे दूतावास आणि व्हाइट हाऊस यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
‘अर्थपूर्ण’ सौदी बैठक
कीवमध्ये, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, या आठवड्यात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमधील झालेल्या बैठकीचे कौतुक केले आणि रशियासोबतच्या संभाव्य 30 दिवसांच्या युद्धबंदीचा वापर, व्यापक शांतता कराराचा मसुदा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे म्हटले.
गेल्या दोन दशकांत मॉस्कोने अशाच अनेक मागण्या मांडल्या आहेत, ज्यातील काही मागण्या अमेरिका आणि युरोपसोबत औपचारिक वाटाघाटींच्या टप्प्यात पोहचल्या आहेत.
अगदी अलिकडेच, 2021 च्या अखेरीस आणि 2022 च्या सुरुवातीला मॉस्कोने बायडन प्रशासनाशी अनेक बैठकांमध्ये चर्चा केली होती, जेव्हा हजारो रशियन सैनिक युक्रेनच्या सीमेवर आक्रमणाच्या आदेशाची वाट पाहत होते.
त्यांच्या चर्चेमध्ये, पूर्व युरोप ते मध्य आशियापर्यंत अमेरिका आणि नाटोच्या लष्करी कारवायांना अडथळा आणणाऱ्या मागण्यांचा समावेश होता.
रॉयटर्स आणि अनेक माजी अमेरिकन अधिकाऱ्यांनी पुनरावलोकन केलेल्या अमेरिकन सरकारी कागदपत्रांनुसार, काही अटी नाकारताना, बायडन प्रशासनाने त्यापैकी अनेकांवर रशियाशी संवाद साधून आक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला केला.
अमेरिका-रशिया चर्चासत्रे
मागील काही आठवड्यांमध्ये, अमेरिका आणि रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वॉशिंग्टन, कीव आणि मॉस्को यांनी 2022 मध्ये इस्तंबूलमधील बैठकीत चर्चा केलेला मसुदा करार, शांती चर्चांसाठी प्रारंभ बिंदू ठरू शकतो. हा करार आजवर कधीच लागू झालेला नाही.
या चर्चांमध्ये, रशियाने युक्रेनकडे त्याच्या नाटो ध्येयांसाठी पोषक असलेल्या मुद्द्याला सोडण्याची आणि कायमचे आण्विक मुक्त स्थिती स्वीकारण्याची मागणी केली. तसेच युद्धाच्या वेळी युक्रेनला मदत करणाऱ्या देशांच्या कारवाईवर रशियाला व्हेटो अधिकार असावा, अशीही मागणी केली.
ट्रम्प प्रशासनाने मॉस्कोसोबतच्या चर्चांसाठी कोणत्या प्रकारे रणनीती राबवायची, हे अजून स्पष्ट केलेले नाही. सध्या दोन्ही बाजू, दोन वेगवेगळ्या चर्चांमध्ये गुंतलेल्या आहेत. एकीकडे अमेरिकी-रशिया संबंध पुनरस्थापित करण्याबद्दल आणि दुसरीकडे युक्रेन शांती कराराबद्दल.
दरम्यान, या चर्चांमध्ये कसे पुढे जावे याबाबत प्रशासनाची विभाजीत भूमिका दिसून येत आहे.
इस्तांबूल करार
मॉस्कोसोबत चर्चेचे नेतृत्व करण्यास मदत करणारे अमेरिकेचे मध्य पूर्व राजदूत- स्टीव्ह विटकॉफ, यांनी गेल्या महिन्यात सीएनएनवर इस्तांबूल चर्चेचे वर्णन “मजबूत आणि ठोस वाटाघाटी” असे केले होते आणि ते म्हणाले होते की, “शांतता करार पूर्ण करण्यासाठी ही चर्चा मार्गदर्शक ठरू शकते.”
परंतु ट्रम्प यांचे युक्रेन आणि रशियाचे सर्वोच्च राजदूत- निवृत्त जनरल कीथ केलॉग, यांनी गेल्या आठवड्यात परराष्ट्र संबंध परिषदेच्या प्रेक्षकांना सांगितले की, त्यांना इस्तांबूल करार हा एक प्रारंभ बिंदू म्हणून दिसत नाही.
“माझ्या मते, आपल्याला पूर्णपणे काहीतरी नवीन विकसीत करण्याची आवश्यक आहे,” असे केलॉग यावेळी म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)