पूर्व युक्रेनमधील पेन्शन केंद्रावर रशियाचा हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू

0

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व युक्रेनमधील एका गावातील पेन्शन वितरण केंद्रावर, मंगळवारी रशियन हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात 23 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, यांनी यावर प्रतिक्रिया देत, कीवच्या मित्र राष्ट्रांना- युद्ध थांबवण्यासाठी मॉस्कोवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले.

साडेतीन वर्ष सुरु असलेल्या, युक्रेन-रशिया युद्धातील शांततेसाठीचे राजकीय प्रयत्न थांबले असल्यामुळे, रशियन सैन्याने पूर्वेकडील डोनेत्स्क प्रदेशात मोठ्या प्रमाणात आक्रमक मोहीम सुरू ठेवली आहे.

झेलेन्स्की म्हणाले की, “स्लोव्हियांस्क शहरापासून सुमारे 15 मैल (24 किमी) अंतरावर असलेल्या यारोवा गावात, एक मार्गदर्शित बॉम्ब (guided bomb) डागण्यात आला. हे गाव युक्रेनियन सैन्याचा बालेकिल्ला असून ते आघाडीच्या रेषेपासून काही किलोमीटर मागे आहे.”

“सर्वसामान्य नागरिक पेन्शन घेण्यासाठी आलेले असाता, त्यांच्यावर हे हल्ले झाले,” असे झेलेन्स्की यांनी X द्वारे सांगितले.

त्यांनी एक व्हिडिओ फुटेज पोस्ट केले आहे, ज्यात जमिनीवर मातीचे ढिगारे आणि मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी सांगितले की, “यात 23 लोकांचा मृत्यू झाला असून, 18 लोक जखमी झाले आहेत. काही पीडितांची ओळख DNA चाचणीवरुन केली जात आहे.”

“या हल्ल्यांबाबत जग शांत, निष्क्रिय राहता कामा नये. युनायटेड स्टेट्सकडून प्रतिसाद येणे आवश्यक आहे. युरोपमधून आणि G20 मधूनही प्रतिसाद येणे आवश्यक आहे,” असे मत झेलेन्स्की यांनी व्यक्त केले.

झेलेन्स्की यांच्या या टिप्पणीवर, रशियाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मॉस्कोने सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचे नाकारले आहे, परंतु फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्ण-प्रमाणात केलेल्या आक्रमणापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या आठवड्यात, उत्तर युक्रेनमधील चेर्निहिव्ह शहराजवळ झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात डेन्मार्क-प्रायोजित मानवतावादी बॉम्बशोधक मोहिमेतील दोन लोकांचा मृत्यू झाला होता.

“शांततेबद्दल बोलताना रशियाचा हाच अर्थ असतो का? रशिया सामान्य नागरिकांची हत्या कधी थांबवणार?” असा प्रश्न युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी X द्वारे उपस्थित केला.

युद्धासाठी आर्थिक मदतीची मागणी

पंतप्रधानांनी मंगळवारी सांगितले की, “रशियासोबतचे युद्ध सुरू असल्याने आणि लष्करी खर्च जास्त असल्याने, युक्रेनने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) एका नवीन आर्थिक कार्यक्रमाची मागणी केली आहे.”

युक्रेन आपल्या एकूण बजेटच्या सुमारे 60% खर्च युद्धासाठी करत आहे आणि पेन्शन, सार्वजनिक क्षेत्रातील वेतन आणि मानवतावादी खर्चाची पूर्तता करण्यासाठी, आपल्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांच्या आर्थिक मदतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

“सक्रिय युद्ध अजूनही सुरू आहे, त्यामुळे 2026 साठीचा आमचा मसुदा राज्य अर्थसंकल्प (draft state budget) हे लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे की, युद्ध अजून संपलेले नाही,” असे पंतप्रधान युलिया स्व्हिरीडेन्को यांनी X वर पोस्ट केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअमेरिका ठरला युक्रेन युद्धाचा सर्वात मोठा लाभार्थी: ORF अहवाल
Next articleभारतविरोधी वक्तव्यासाठी राईट-वींगच्या खासदाराने माफी मागावी: अल्बानीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here