डिसेंबरच्या अखेरीस, रशियन सैन्याने युक्रेनवर डागलेल्या उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची अचूकता, गेल्या वर्षभरात डागलेल्या अन्य क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अधिक प्रभावी होती, असे दोन वरिष्ठ युक्रेनी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले.
अचूकतेत वाढ – नियोजित लक्ष्यापासून ५० मीटरच्या आत- हे क्षेपणास्त्र दर्शवते की युक्रेनमधील युद्धभूमीवरून मिळालेले ज्ञान उत्तर कोरियाला त्याचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करत आहे, असे एका सूत्रांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्याने, संवेदनशील माहितीबाबत गुप्तता बाळगण्याच्या अटीवर असे सांगितले की, अलीकडील काही आठवड्यांत उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या अचूकतेत अधिक सुधारणा झाली आहे.
दुसरा स्त्रोत, युक्रेनियन सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सने विचारले असता निष्कर्षांची पुष्टी केली.
सिओलच्या ‘असान इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीज’चे शस्त्रास्त्र तज्ञ- यांग उक यांनी सांगितले की, ”उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र क्षमतांमधील या सुधारणांमुळे दक्षिण कोरिया, जपान आणि युनायटेड स्टेट्ससाठी चिंता निर्माण करणारे परिणाम होऊ शकतात किंवा ते “विफल” राष्ट्रांना किंवा सशस्त्र गटांना सुधारीत शस्त्रास्त्र विकू शकतात.
दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. युक्रेन सामान्यतः रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या सैन्य लक्ष्यांवरील परिणाम जाहीर करत नाही.
“उत्तर कोरियाच्या लष्करी कार्यक्रमांमध्ये, गेल्या काही वर्षांत वेगवान प्रगती झाली आहे, ज्यात लघु आणि मध्यम-श्रेणीतील क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, ज्यांना प्योंगयांगच्या म्हणण्यानुसार, आण्विक वॉरहेडसह अपडेट केले जाऊ शकते.
तथापि, युक्रेनमधील हस्तक्षेपापर्यंत दीर्घकाळ आयसोलेटेड असलेल्या या देशाने, लढाईत या नवीन शस्त्रास्त्रांची कधीच चाचणी केली नव्हती.
रशिया आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयांसह, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवा संस्थेने- रॉयटर्सच्या प्रश्नांना कुठलाच प्रतिसाद दिला नाही.
स्रोत आणि शस्त्रास्त्र तज्ञ- यांग यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने यामध्ये नक्की कोणते बदल केले, हे स्पष्ट नाही.
नोव्हेंबर 2024 मध्ये, यू.एस.-आधारित थिंक टॅंक्समधील संशोधकांनी निष्कर्ष काढला की, उत्तर कोरिया एक मुख्य शस्त्रास्त्र उत्पादन प्रकल्प विस्तारित करत आहे, जो रशियाने युक्रेनमधील लढाईत वापरलेले लघु-श्रेणीचे क्षेपणास्त्र तयार करतो, असे उपग्रहांनी पाठवलेल्या चित्रांवरून दिसून आले.
लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘मलब्याजे जे फॉरेन्सिक विश्लेषण केले गेले, त्यात क्षेपणास्त्रांच्या डिझाइनमध्ये कोणतेही बदल आढळून आले नाहीत, जरी विश्लेषणीसाठी खूप कमी मलबा शिल्लक राहिला होता.’
दुसऱ्या शक्यतेनुसार, ‘क्षेपणास्त्रांमध्ये अधिक चांगल्या नेव्हिगेशन सिस्टीम्स किंवा मदतीसाठी स्टीयरिंग मेकॅनिझम फिट केले जाऊ शकतात, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.’
अनेक महिन्यांच्या चुकीच्या प्रक्षेपणानंतर, शस्त्रास्त्रांच्या अचूकतेतील प्रगती अचानक दिसून आल्याचे, लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘हे नवीन मूल्यांकन त्या क्षेपणास्त्राचा जिथे स्फोट झाला, त्या साइट्सच्या तपासणीद्वारे केले गेले, जे आसपासच्या अनुमानित लक्ष्याच्या संबंधात कुठे पडले यावर आधारित होते.’
(रॉयटर्सच्या इनपुटसह)