रशियन हल्ल्यात युक्रेनच्या झापोरीझ्झिया शहरात एकाचा मृत्यू, 24 जखमी

0
झापोरीझ्झिया

रशियाने युक्रेनच्या झापोरीझ्झिया शहरावर केलेल्या तीव्र हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर किमान 24 जण जखमी झाले, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. या हल्ल्यात शहरातील अनेक निवासी आणि औद्योगिक इमारतींचेही नुकसान झाले.

झापोरीझ्झिया, या युक्रेनच्या दक्षिणपूर्वेकडील शहरावर झालेल्या रशियन हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये, 3 लहान मुलांचा समावेश असल्याचे, प्रादेशिक राज्यपाल इव्हान फेडोरोव यांनी सांगितले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, “हल्ल्यामध्ये 500 पेक्षा अधिक ड्रोन्स आणि 45 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे एकूण 14 प्रांतांचे नुकसान झाले.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी युक्रेन आणि रशियाच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे भेट घेतल्यानंतरही रशियाच्या आक्रमणाला थांबवण्यासाठी सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत.

शुक्रवारी झेलेन्स्की यांनी, ट्रम्प यांनी स्वत: जाहीर केलेल्या (self-imposed) अंतिम मुदतीची आठवण करून दिली. जर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या नेत्यांशी भेट घेण्यास सहमती दर्शविली नाही, तर रशियावर नवीन उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्याची ही अंतिम मुदत आहे.

“सोमवारी, याला दोन आठवडे पूर्ण होतील आणि आपण सर्वांना त्याची आठवण करून देऊ,” असे झेलेन्स्की म्हणाले.

दरम्यान, रशियाने स्पष्ट केले आहे की- पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील संभाव्य चर्चेसाठीचा कोणताही अजेंडा अद्याप ठरलेला नाही.

शनिवारी झेलेन्स्की म्हणाले की, “नेत्यांच्या बैठकीची तयारी करण्यासाठी मिळालेल्या वेळेचा मॉस्कोने नवीन मोठे हल्ले आयोजित करण्यासाठी उपयोग केला, हे पूर्णपणे स्पष्ट आहे.” त्यांनी रशियन बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रावर निर्बंध घालण्याचे आवाहन केले.

टेलिग्राम मेसेजिंग ॲपवरील निवेदनानुसार, हवाई दलाने 7 ठिकाणी 5 क्षेपणास्त्रे आणि 24 ड्रोन हल्ल्यांची नोंद केली असून, 21 ठिकाणी त्याचा ढिगारा पडला आहे.

फेडोरोव्ह यांनी सांगितले की, “झॅपोरिझ्झियावरील हल्ल्यामुळे 25,000 रहिवाशांचा वीजपुरवठा खंडित झाला. स्थानिक ऊर्जा सुविधेने सांगितले की या हल्ल्यामुळे त्यांच्या उपकरणांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे.”

शनिवारी सकाळपर्यंत, युक्रेनियन सरकारी रेल्वे उक्रझालिझ्न्यायसियाने सांगितले की, “त्यांनी कीव प्रदेशातील त्यांच्या पायाभूत सुविधांचे नुकसान दुरुस्त केले आहे.”

झेलेन्स्की यांचा सुरक्षा हमीसाठी आग्रह

शुक्रवारी झेलेन्स्की यांनी, युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना सुरक्षा हमीवरील चर्चा- राष्ट्रीय नेत्यांमधील थेट चर्चेकडे लवकरात लवकर हलवण्याचे आवाहन केले. त्यांनी हे आवाहन अशावेळी केले आहे, जेव्हा युरोपीय संघाच्या संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केले की, “जर युद्धविराम झाला तर ते युक्रेनच्या आत युक्रेनियन सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी तयार असतील.”

युक्रेन रशियासोबतचे युद्ध (जे आता चौथ्या वर्षात आहे) संपवण्यासाठी आणि भविष्यातील कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी, आपल्या भागीदारांकडून महत्त्वपूर्ण वचनबद्धता मिळवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करत आहे.

युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, “त्यांना पुढच्या आठवड्यात युरोपीय नेत्यांसोबत ‘NATO-सारख्या’ वचनबद्धतांबद्दल चर्चा सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे, आणि यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश असावा, अशी त्यांची इच्छा आहे.”

“ही व्यवस्था सर्वांसाठी स्पष्ट असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

याचवेळी, झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ अँड्री येरमाक यांनी- मॉस्कोवरील दबाव वाढवण्याच्या गरजेवर चर्चा करण्यासाठी, न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांची भेट घेतली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia, China & The BRICS Factor: What The West Won’t Tell You
Next articleModi, Putin Gear Up for Crucial Tianjin Talks on Defence and Security

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here