सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि जटिल होत असल्याने, त्यामध्ये प्रगत देखरेखेची आणि स्वायत्त प्लॅटफॉर्म्सच्या निर्मितीची पूर्वीपेक्षा अधिक आवश्यकता आहे. ‘ऑन द शॉप फ्लोअर’ च्या या भागांत, टीम भारतशक्तीने सागर डिफेन्स इंजिनिअरिंगला भेट दिली. ‘Sagar Defence Engineering’ हा एक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप आहे, जो भारतीय नौदलासाठी कल्पनेपलीकडील अत्याधुनिक अशी मानवरहित सागरी प्रणाली आणि ड्रोन विकसित करत आहे.
निकुंज पराशर यांनी स्थापन केलेल्या, ‘सागर डिफेन्स’ने 2013 मध्ये आपल्या प्रवासाची सुरूवात केली, ज्याचे मुख्य उद्दीष्ट नौदलाच्या ISR (गुप्तचर, देखरेख ठेवणे आणि शोध मोहिमांची माहिती घेणे) क्षमतांमधील अंतर भरून काढणे आहे.
तर हे सर्व कसे सुरू झाले? याचा आढावा घेण्यात आला. निकुंज पराशर जेव्हा काही काळ डेनमार्कमध्ये काम केल्यानंतर, भारतात परतले, तेव्हा त्यांना भारतीय नौदलाच्या क्षमतांमध्ये एक गंभीर अंतर दिसले, ते म्हणजे- देखरेख ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी, सागरी पृष्ठभागावरील मानवरहित जहाजांची (USVs) कमतरता. हे अंतर भरून काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी 2013 मध्ये रेडिओ-नियंत्रित टार्गेट बोटचा पहिला प्रोटोटाइप तयार केला आणि 2015 पर्यंत त्याच्या यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या. आज, त्यांची ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग’ ही कंपनी, स्वायत्त समुद्री प्रणाली आणि ड्रोन विकसित करण्यामध्ये अग्रेसर असून, फक्त भारतीय नौदलालाच नाही, तर ONGC सारख्या प्रथितयश संस्थांनाही समर्थन देत आहे.
48 तासांपेक्षा अधिक काळ कार्य करणाऱ्या, स्वायत्त जहाजांपासून ते एडनच्या आखाती देशांमधील ड्रग इंटरसेप्शन सारख्या उच्च-जोखमीच्या नौदल ऑपरेशन्समध्ये तैनात केलेल्या स्पॉटर्स ड्रोनपर्यंत, ही कंपनी समुद्रातील ISR (गुप्तचर, देखरेख
ठेवणे आणि शोध मोहिमांची घेणे) ची पुनर्रचना करत आहे आणि स्वायत्त प्लॅटफॉर्म तयार करण्यापासून ते संपूर्ण प्रणाली एकत्रीकरणापर्यंत वेगाने विकास साधत आहे.
भारतीय नौदलाशी असलेले मजबूत संबंध आणि iDEX सारख्या कार्यक्रमांसह, सागर डिफेन्स ही कंपनी- भारतीय नौदलाच्या भविष्यातील नवनिर्मितीला आकार देत आहे.
आम्ही या संवादात, निकुंज पराशर यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाचा सखोल आढावा घेतला आहे. समुद्रकर्मचारी ते एक यशस्वी उद्योजक होण्याची त्यांची यशोगाथा, कंपनीच्या प्रवासातील त्यांचे दृष्टिकोन, भारतात स्वायत्त प्लॅटफॉर्म्स तयार करण्याच्या आव्हानांविषयी आणि भारताच्या जलक्षेत्राची सुरक्षा सुनिश्चित करण्यामध्ये स्वायत्त तंत्रज्ञाना रुजवण्याविषयीची त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.