भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी ‘तंत्रज्ञान’ आणि ‘समन्वयाची’ गरज: CDS चौहान

0

ऑपरेशन सिंदूरच्या तीन महिन्यांनंतर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, यांनी स्पष्ट संदेश दिला की: भविष्यातील युद्धे ही प्रगत ‘तंत्रज्ञान’ आणि सैन्यदलातील योग्य ‘समन्वय’ या दोन्हीच्या मदतीने जिंकली जातील.

गुरुवारी, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन (VIF) मध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी CDS Gen चौहान यांनी, ‘Ready, Relevant and Resurgent: A Blueprint for the Transformation of India’s Military’ या त्यांच्या पुस्तकावर आणि अलीकडील लष्करी मोहिमांमधून भारताने घेतलेल्या शिकवणीवर प्रकाश टाकला.

“आजच्या तंत्रज्ञानप्रधान युद्धभूमीत शास्त्र (ज्ञान) शस्त्रांइतकेच महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. भारताचे सशस्त्र दल अंतर्गत (intra-service) आणि परस्पर (inter-service) समन्वय अधिक बळकट करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याचे एक उदाहरण म्हणजे, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) मधील सुधारित अभ्यासक्रम. सीडीएस चौहान यांनी सांगितले की, “आता DSSC मधील विद्यार्थ्यांना इतर तिन्ही सेवा (सेना, नौदल, वायूदल) अधिक बारकाईने समजून घेण्याची गरज आहे, त्यामुळे हे नवे बदल सायलो (स्वतःपुरते विचार) मोडीत काढत, नव्या विचारांना चालना देत आहेत आणि प्रत्येक सेवेच्या क्षमतेबाबत विद्यार्थ्यांना अधिक सखोल आणि स्पष्ट माहिती देत आहेत.”

“याआधी भारतीय सैन्यदल दर 2 वर्षांनी एकत्रित लष्करी सिद्धांत (joint doctrine) तयार करत होते; मात्र आता ते दरवर्षी 9 सिद्धांत तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी हे करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे चौहान म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमधील यशाचे श्रेय, त्यांनी 2019 मधील बालाकोट हवाई हल्ल्यातून (ऑपरेशन बंदर) घेतलेल्या धड्यांना दिले, विशेषतः स्टँड-ऑफ प्रिसिजन शस्त्रांच्या वापरात. या शस्त्रांचा प्रभावीपणे वापर सिंदूरच्या गतिशील (kinetic) टप्प्यात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आपण नेहमीच अचूक स्ट्राईक क्षमतेत एक पाऊल पुढे असले पाहिजे आणि शत्रूच्या प्रतिबंधक उपायांवर मात करण्यासाठी सज्ज असले पाहिजे,” असा आग्रह त्यांनी धरला.

या मोहिमेतील सर्वात उल्लेखनीय टप्पा म्हणजे, लढाई सुरू होण्यापूर्वीच थोड्याच अंतरावर सेना, नौदल आणि वायूदलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमचे जवळपास पूर्णपणे एकत्रीकरण झाले होते. याआधी, प्रत्येक सेवा स्वतंत्र आर्किटेक्चरवर काम करत होती. “आता आपण जवळपास 100% एकत्रीकरण साध्य केले आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे हवाई क्षेत्र व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अधिकाऱ्यांची शिक्षण पद्धती नव्याने विचारात घेण्यापासून ते महत्त्वाच्या संरक्षण नेटवर्कचे एकत्रीकरण करण्यापर्यंत, सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या वक्तव्यात कोणतीही शंका उरत नाही: भारताचा युद्धभूमीवरील वर्चस्वाचा मार्ग हा तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता, मारकशक्ती आणि सैन्यदलातील समन्वय यावर अवलंबून आहे.

– ध्रुव यादव

+ posts
Previous articleExplainer: How India’s New Autonomous Boats Will Boost Anti-Submarine Warfare Capabilities
Next articleभारताने अमेरिकेशी शस्त्रास्त्र वाटाघाटी थांबवल्याचे दावे खोटे: संरक्षण मंत्रालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here