शेख हसीना यांनी युद्धगुन्ह्यांच्या आरोपांबाबत केला मोठा खुलासा

0

‘हसीना यांच्या तीन मुलाखती: योगायोग की सत्तेचा खेळ?’ असे शीर्षक, ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रात शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका लेखाला देण्यात आले होते. हा लेख, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘द इंडिपेंडेंट’, ‘रॉयटर्स’ आणि ‘एएफपी’ या जागतिक वृत्तसंस्थाना दिलेल्या लिखित उत्तरांच्या संदर्भात होता.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तात नमूद केले होते की, हसीना यांनी दिलेल्या या सर्व मुलाखती एकाच दिवशी प्रकाशित झाल्या, ज्याचा उद्देश जास्तीत जास्त राजकीय परिणाम साधणे हा असू शकतो. पुढील महिन्यात येणाऱ्या बांगलादेश युद्ध गुन्हे न्यायाधिकरणाच्या निकालामुळे, हसीना यांच्यावरील सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप सिद्ध होऊ शकतो, ज्यामध्ये काही व्यक्तींचा आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांचा छळ आणि मृत्यू यांसारखे गंभीर आरोपांचा समावेश आहे, ज्याविषयी या मुलाखतींद्वारे चिंता व्यक्त केली गेली असण्याची शक्यता आहे.

मुख्य सरकारी वकील ताजुअल इस्लाम यांचा असा आरोप आहे की, “घडलेल्या सर्व गुन्ह्यांमागे हसीना यांचा हात होता.”

त्यांच्या कार्यकाळात सदर गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या 15 लष्करी अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यात आली होती, त्यापैकी 14 सध्या खटल्याच्या प्रतीक्षेत कोठडीत आहेत.

एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, हसीना यांनी स्पष्ट केले की: सुरक्षा दलांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा जो आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे, तो ‘बोगस’ आहे आणि त्या तो फेटाळून लावतात.

रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत, हसीना यांनी न्यायाधिकरणाच्या कार्यवाहीचे वर्णन ‘राजकीय हेतूने रचलेले ढोंग’ असे केले. “कंगारू कोर्टांनी (नियमांशिवाय चालणारे न्यायालय) हे आरोप लावले आहेत, ज्यात मला दोषी करार देण्याचे आधीच निश्चित केले आहे,” असे त्या म्हणाल्या.

त्यांनी असेही म्हटले की, “त्यांच्या ‘अवामी लीग‘ पक्षाला निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखणे, हे केवळ अन्यायकारकच नाही, तर ते त्यांच्या स्वतःच्या पराभवाला आमंत्रण देणारे आहे. लाखो लोक अवामी लीगला पाठिंबा देतात, त्यामुळे सद्यस्थितीत ते मतदान करणार नाहीत. जर तुम्हाला राजकीय व्यवस्था कार्यरत ठेवायची असेल, तर तुम्ही लाखो लोकांना मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही.”

त्या म्हणाल्या की, “आम्ही आमच्या बांगलादेशातील समर्थकांना इतर पक्षांना मतदान करण्यास सांगत नाहीयोत, उलट आम्हाला आशा आहे की अखेर सर्वसामान्यांच्या शक्तीचा विजय होईल आणि आम्हाला निवडणुक लढवण्याची परवानगी मिळेल.”

ढाका ट्रिब्यूनच्या लेखात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे की, ‘अंतर्गत चर्चेनंतर भारतानेही हिरवा कंदील दाखवला आहे.’ 

हसीना यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित होण्यासाठी नवी दिल्लीची संमती आवश्यक होती, असे मानले जाते. या लेखाने आठवण करून दिली की, काही काळापूर्वी बांगलादेशचे अंतरिम सल्लागार मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली होती की, हसीना यांना कोणतीही प्रसिद्धी मिळू देऊ नये, कारण यामुळे त्यांच्या देशातील परिस्थिती अस्थिर होऊ शकते.

यावर पंतप्रधान मोदींनी दिलेवे उत्तरही या लेखात नमूद करण्यात आले आहे, ज्यात ते म्हणाले होते की: “सोशल मीडियाच्या युगात, कोणालाही गप्प बसवणे अशक्य आहे.”

मूळ लेखक- सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleYouth Call for a ‘Battle of Minds’ at Chanakya Defence Dialogue: Young Leaders Forum 2025
Next articleभारत आणि अमेरिकेकडून 10 वर्षांच्या संरक्षण आराखड्यावर स्वाक्षरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here