सोलार डिफेन्स आणि CSIR–NALची लोईटरिंग UAV प्रकल्पासाठी भागीदारी

0

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) ने, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद– राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेसोबत मिळून, स्वदेशी बनावटीच्या 150 किलो वजनाच्या ‘लोईटरिंग म्युनिशन‘ मानवरहित हवाई वाहनाचा (LM-UAV) संयुक्त आराखडा तयार करण्यासाठी आणि ते विकसित करण्यासाठी एका सहयोगी करारावर स्वाक्षरी केली आहे. CSIR–NAL येथे झालेल्या समारंभात, या कराराला अंतिम रूप देण्यात आले. एका स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे, SDAL ची उद्योग भागीदार म्हणून निवड झाली.

या कराराच्या स्वाक्षरी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या संरक्षण कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीपासूनच खासगी क्षेत्राला समाविष्ट करण्याच्या CSIR च्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची प्रशंसा केली. त्यांनी या सहकार्याचे वर्णन ‘भारताच्या अत्याधुनिक एरोस्पेस क्षमतांकडील वाटचाल, वेगवान करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल’ असे केले.

29 नोव्हेंबर रोजी, मंत्र्यांनी ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये या कार्यक्रमाच्या तांत्रिक महत्त्वाकांक्षा अधोरेखित केल्या. त्यांनी यात नमूद केले की, “LM-UAV मध्ये सौर-ऊर्जेवर आधारित सहाय्यक पायाभूत सुविधा आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे ‘वँकेल इंजिन’ बसवले जाईल, जे 900 किमीची रेंज प्राप्त करुन देईल. “जीपीएस-विरहित नेव्हिगेशन, कमी रडार क्रॉस सेक्शन आणि AI-सक्षम DRI क्षमतांनी सुसज्ज असलेले हे पुढील पिढीचे UAV भारताच्या धोरणात्मक एरोस्पेस क्षेत्रातील उभरत्या तांत्रिक क्षमतेला अधोरेखित करते.”

SDAL ने सांगितले की, मोठ्या प्रमाणावर प्रणालीची निर्मिती आणि उत्पादन प्रक्रिया पूर्ण करण्यात त्याची मध्यवर्ती भूमिका असेल. कंपनीने संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर जोर दिला. “CSIR आणि सोलर ग्रुप स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून, असममित युद्धात आपल्या सशस्त्र दलांना वाढीव क्षमता देण्यासाठी एकत्र काम करतील,” असे कंपनीने सांगितले, आणि सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनशी आपले समन्वय पुन्हा व्यक्त केले.

हे LM-UAV, नॅशनल एरोस्पेस प्रयोगशाळेने विकसित केलेल्या ‘वँकेल रोटरी इंजिन’ द्वारे संचालित असेल, ज्याला विमानाचे समाकलन आणि उड्डाण चाचणीसाठी आधीच CEMILAC प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्लॅटफॉर्म 900 किलोमीटरची रेंज, सहा ते नऊ तासांची सहनक्षमता आणि पाच किलोमीटरची ‘सर्व्हिस सीलिंग’ देईल अशी अपेक्षा आहे. कमी रडार क्रॉस-सेक्शनसह डिझाइन केलेले हे यूएव्ही, जीपीएस नसलेल्या वातावरणातही काम करण्यास सक्षम असेल. ते AI-सक्षम इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड पेलोडने सुसज्ज असेल, जे प्रगत शोध , ओळख आणि निरीक्षण क्षमता प्रदान करेल.

हा कार्यक्रम, आधुनिक युद्धातमहत्त्व वाढत असलेल्या लोइटरिंग म्युनिशन्सच्या स्वदेशी विकासासाठी एक मोठे पाऊल आहे आणि भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण परिसंस्थेतील सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या एका सखोल मॉडेलचा दिशा दर्शक आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleविस्तारित हवाई-भू समन्वयासह, भारत–ब्रिटनमधील लष्करी सराव संपन्न
Next articleहाँगकाँगमधील आग दुर्घटनेनंतर संपूर्ण चीनमध्ये अग्निसुरक्षा तपासणीला वेग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here