भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी विकसित सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही प्रणाली स्वार्म ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ‘भार्गवास्त्र’ नावाच्या बहुस्तरीय प्रति-ड्रोन प्रणालीची चाचणी 12 आणि 13 जानेवारी रोजी गोपालपूर सीवार्ड फायरिंग रेंज येथे घेण्यात आली. मोठ्या प्रमाणावरील ड्रोन हल्ल्यांना निष्प्रभ करण्यासाठी किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण अशा या प्रणालीने अडीच किलोमीटरहून अधिक दूर असलेल्या निर्धारित आभासी लक्ष्यांवर यशस्वीरित्या हल्ला केला.
Solar Group ची उपकंपनी असलेल्या Economic Explosives Ltd ने (EEL) विकसित केलेले ‘भार्गवास्त्र’ हे अत्याधुनिक क्षमतांनी सुसज्ज आहे, ज्यात 6 किलोमीटरहून अधिक अंतरावर येणारे अगदी लहान ड्रोन शोधणे समाविष्ट आहे. हे अचूकता आणि परिणामकारकता सुनिश्चित करून मार्गदर्शित सूक्ष्म-शस्त्रांचा वापर करून धोक्यांना निष्प्रभ करते. जलद तैनातीसाठी मोबाइल प्लॅटफॉर्मवर बसवता येणारी ही प्रणाली, भारताच्या सशस्त्र दलांच्या अद्वितीय परिचालन गरजा पूर्ण करण्यासाठी, उंचीच्या क्षेत्रासह विविध भूभागांमध्ये अखंडपणे काम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
UAV च्या धोक्यांसाठी One-Stop Solution
एका निवेदनात, कंपनीने भार्गवास्त्रची अष्टपैलू क्षमता अधोरेखित करत म्हटले आहे की, “EELने परवडणाऱ्या किंमतीत शत्रूच्या UAVs विरुद्ध कठोर प्रहार करण्यासाठी बहुस्तरीय प्रति-ड्रोन प्रणाली भार्गवास्त्रसाठी सूक्ष्म क्षेपणास्त्राची स्वदेशी रचना आणि विकास केला आहे. सर्व UAV धोक्यांसाठी प्रणालीचा एक सर्वसमावेशक उपाय म्हणून उपयोग करवून घेण्यासाठी अतिरिक्त सॉफ्ट-किल थर एकत्रित केला जात आहे. नेटवर्क-केंद्रित युद्धासाठी ही प्रणाली सशस्त्र दलांच्या सध्याच्या नेटवर्कमध्येही समाविष्ट केली जाऊ शकते.
या प्रणालीमध्ये आधुनिक C4I (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर्स आणि इंटेलिजेंस) तंत्रज्ञानाने सुसज्ज कमांड-अँड-कंट्रोल सेंटर आहे. त्याचा रडार 10 किलोमीटर अंतरावर मध्यम ते मोठ्या UAVs आणि 6 किलोमीटरच्या अंतरावर लहान ड्रोन शोधू शकतो. Electro-Optical/Infrared (EO/IRI प्रणाली देखील low Radar Cross-Section (RCS) लक्ष्यांचा अचूक शोध निश्चित करते. भार्गवास्त्र परिस्थितीनुरूप जागरूकता विहंगावलोकन प्रदान करते. याशिवाय शत्रू पक्षाच्या एकल किंवा टोळीने येणाऱ्या ड्रोन्सना निष्प्रभ करायचे की नाही याचे मूल्यांकन करू शकते.
याच्या developersनी दिलेल्या माहितीनुसार, वाळवंटापासून ते डोंगराळ प्रदेशांपर्यंत, समुद्रसपाटीपासून 5 हजार मीटर उंचीपर्यंत, भारतातील विविध भूप्रदेशांमध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी भार्गवास्त्राची रचना करण्यात आली आहे. ही प्रणाली स्वायत्त ड्रोनच्या गटांविरुद्ध काम करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. पारंपारिक जामिंग किंवा स्पूफिंग तंत्रांना प्रतिरोधक आहेत.
विशेष म्हणजे, भार्गवास्त्र प्रणाली counter drone तंत्रज्ञानातील एक प्रगती दर्शवते. स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीवरून असे सूचित होते की काही प्रगत देश समान सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत असताना, भार्गवास्त्रसारख्या स्वार्म न्यूट्रलायझेशन क्षमतांसह बहुस्तरीय counter drone प्लॅटफॉर्म जगात कुठेही तैनात करण्यात आलेला नाही.
समावेशाच्या दिशेने पुढील पावले
अलीकडे घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या वेळी लष्करायील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि तो या प्रणालीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या यशस्वी चाचण्यांमुळे, भार्गवास्त्रची या वर्षाच्या अखेरीस अधिक व्यापक चाचणी होण्याची तयारी सुरू झाली आहे. या मूल्यांकनांमुळे, ड्रोनच्या वाढत्या धोक्यांविरुद्ध भारताच्या संरक्षण क्षमतांना बळकटी देत, सशस्त्र दलांमध्ये त्याच्या समावेशाचा मार्ग मोकळा होईल.