ब्राऊन युनिव्हर्सिटी गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या

0
ब्राऊन युनिव्हर्सिटी
17 एप्रिल 2025 रोजी, अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील टॅलाहॅसी येथे, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी (FSU) कॅम्पसमध्ये झालेल्या सामूहिक गोळीबारानंतर कायदा अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. सौजन्य: अ‍ॅलिशिया डिव्हाइन / USA TODAY NETWORK इमॅग्न इमेजेस/रॉयटर्सद्वारे

गेल्या आठवड्यात, ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या सामूहिक गोळीबारातील संशयित आरोपीने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली असून, त्यानेच हल्ल्याच्या दोन दिवसानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (MIT) एका प्राध्यापकाची हत्या केल्याची तपासकर्त्यांना खात्री आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 48 वर्षीय पोर्तुगीज नागरिक क्लॉडिनो नेव्हिस व्हॅलेंटे अशी ओळख पटलेल्या या हल्लेखोराचा मृतदेह, गुरुवारी रात्री न्यू हॅम्पशायरमधील सालेम येथील एका भाड्याच्या स्टोरेज फॅसिलिटीमध्ये आढळला, जिथे त्याने गेल्या महिन्यात एक युनिट भाड्याने घेतले होते.

व्हॅलेंटेने सुमारे वीस वर्षांपूर्वी, ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्राच्या PhD चे शिक्षण घेतले होते आणि तो मृत MIT प्राध्यापक नुनो लोरेरो (47), यांचा पोर्तुगालमधील माजी सहपाठी होता. इतके जवळचे संबंध असूनही, त्यांच्या हत्येमागील व्हॅलेंटेनेचा उद्देश अद्याप एक गूढ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“त्याने हे कृत्य आताच का केले, किंवा ब्राऊन युनिव्हर्सिटीवरच का हल्ला का, किंवा हेच विद्यार्थी आणि हाच वर्ग का निवडला, याविषयी आम्हाला कोणतीही कल्पना नाही,” असे रोड आयलंडचे ॲटर्नी जनरल पीटर नेरोन्हा यांनी. प्रोव्हिडन्स येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रोव्हिडन्स पोलिसांच्या अटक वॉरंटसाठीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, व्हॅलेंटेने 13 डिसेंबर रोजी, ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग आणि फिजिक्स प्रोग्रामसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीत प्रवेश केला आणि त्याच्या 9MM पिस्तूलमधून किमान 44 गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि इतर नऊ जण जखमी झाले.

अधिकाऱ्यांच्या मते, त्यानंतर त्याने प्राध्यापक लोरेरो यांच्या घरातच त्यांची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर तो बेपत्ता झाला, ज्यामुळे तपासकर्त्यांना पाच दिवस त्याची शोधमोहीम राबवावी लागली. व्हॅलेंटेच्या मृतदेहाजवळ दोन बंदुका सापडल्या, ज्यामध्ये एक 9MM पिस्तूलचा समावेश आहे, ज्याचा वापर हत्यांसाठी केला गेल्याचा आम्हाला विश्वास आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोस्टनमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या ॲटर्नी लिया फोली यांनी सांगितले की, “तपासकर्त्यांकडे असे काही पुरावे आहेत ज्यामुळे त्यांना खात्री पटली आहे की, मियामीमध्ये राहणाऱ्या आणि अमेरिकेचा कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या व्हॅलेंटेने, लोरेरो यांची मॅसॅच्युसेट्समधील ब्रुकलाइन येथील त्यांच्या घरात घुसून हत्या केली.”

ट्रम्प प्रशासनाने व्हॅलेंटेच्या कायमस्वरूपी रहिवासी दर्जाकडे लक्ष वेधून घेत, ‘डायव्हर्सिटी इमग्रंट व्हिसा’ प्रोग्रामची लॉटरी सिस्टीम थांबवण्याची गरज अधोरेखित केली आहे. हा प्रोग्राम अशा देशांतील लोकांना ग्रीन कार्ड देतो ज्या देशांतून अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या तुलनेने कमी आहे.

“या गुन्हेगाराला कधीच आपल्या देशात प्रवेश दिला जायला नको होता,” असे होमलँड सिक्युरिटी सचिव क्रिस्टी नोएम यांनी गुरुवारी उशिरा ‘X’ वर पोस्ट केले.

“या विनाशकारी व्हिसा प्रोग्राममुळे आणखी कोणत्याही अमेरिकन नागरिकाला हानी पोहोचू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार ग्रीन-कार्ड लॉटरी तात्काळ स्थगित केली जाईल,” असेही त्या म्हणाल्या.

फोली यांनी सांगितले की, “व्हॅलेंटे आणि लोरेरो यांनी 1995 ते 2000 या काळात पोर्तुगालमधील एका विद्यापीठात एकाच शैक्षणिक कार्यक्रमात शिक्षण घेतले होते.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleWhat Makes Pakistan Tick? Resilience Amidst Chronic Fault Lines – And What Should India Do

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here