तैपईने अमेरिकन गुंतवणुकीसाठी ‘तैवान मॉडेल’चा पर्याय सुचवला

0

तैवान आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्या, उच्च-तंत्रज्ञानावर आधारित धोरणात्मक भागीदारीविषयी चर्चा सुरू आहेत. अमेरिकेला तैवानकडून अधिक गुंतवणूक अपेक्षित असून, याच पार्श्वभूमीवर प्रयत्न केले जात असल्याचे, तैवानच्या प्रमुख शुल्क वाटाघाटी करणाऱ्या प्रतिनिधींनी गुरुवारी सांगितले.

जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट चीप उत्पादक कंपनी TSMC (तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी) चे मुख्य तळ आहे तैवान, जो देश अतिरिक्त व्यापार फायद्यावर अमेरिकेसोबत मोठा व्यापार चालवतो आहे. सध्या तैवानमधून अमेरिकेला होणाऱ्या चीप्सच्या निर्यातींवर 20% आयात शुल्क आकारण्यात आले असून, हे शुल्क कमी करण्यासाठी तैपेई सरकार प्रयत्नशील आहे.

‘तैवान मॉडेल’ नक्की काय आहे?

तैवानच्या उप-पंतप्रधान चेंग ली-चिउन, या सध्या अतिरिक्त शुल्क कमी करण्याच्या वॉशिंग्टनसोबतच्या वाटाघाटींचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी सांगितले की, “दोन्ही देश ‘तैवान मॉडेल’च्या आधारे अमेरिकेत गुंतवणूक वाढवण्याचा एकसमान विचार करतील, अशी त्यांना आशा आहे.”

तैवानमधून पुरवठा साखळीचे स्थलांतर करण्याऐवजी, अमेरिकेतील स्थानिक उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे, तैवान मॉडेलमध्ये नमूद केले आहे. “या मॉडेलमध्ये उद्योग गुंतवणुकीची व्यवस्थित आखणी केली जाईल, सोबतच निर्यातावरील क्रेडिटची हमी दिली जाईल आणि तैवान-अमेरिका यांच्यामध्ये संयुक्त औद्योगिक क्लस्टर निर्माण करण्यासाठी सरकारी पाठबळ दिले जाईल,” असे चेंग यांनी सांगितले.

“अमेरिकेने तैवानने अधिक गुंतवणूक करावी आणि पुरवठा साखळीच्या सुधारणेत सहकार्य करण्याची तयारी दाखवावी, हा सध्याच्या द्विपक्षीय वाटाघाटींचा मुख्य मुद्दा आहे,” असे चेंग म्हणाल्या.

अमेरिकेचे वाणिज्य मंत्रालय आणि व्यापार प्रतिनिधी कार्यालय यांच्याकडून, अद्याप या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, बुधवारी अमेरिकन सरकारचे कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले होते.

जगातील सर्वात मोठी चीप उत्पादक कंपनी ‘TSMC’ च्या उत्पादनात, सध्या AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या मागणीमुळे, लक्षणीय वाढ अनुभवायला मिळते आहे. अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यात, TSMC कंपनी तब्बल 165 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत असून, तिथे चीप उत्पादनाचे कारखाने उभारत आहे. मात्र, कंपनीच्या उत्पादनाचे मुख्य केंद्र हे तैवानमध्येच राहील.

मुख्यालय हलवण्याचा कोणताही विचार नाही

“अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी, अमेरिकन प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडलेली- “50-50 टक्के चीप उत्पादन वाटपाची” कल्पना तैवानला मान्य नाही आणि त्याबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही उल्लेखही झालेला नाही,” असे चेंग यांनी सांगितले.

“देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याची अमेरिकेची प्रबळ इच्छा आम्ही समजू शकतो, जेणेकरून त्यांना स्थानिक मागणी वेळेत पूर्ण करता येईल. मात्र तैवानचे उद्दिष्ट उघड आहे की, चीप उत्पादनाचा त्यांचा मूळ उद्योग तैवानमध्येच भक्कमपणे कार्यरत राहावा आणि जागतिक स्तरावार त्याचा विस्तार केला जावा, ज्यामध्ये अमेरिका आणि इतर देशांशी धोरणात्मक भागीदारी केली जाईल,” असेही चेंग यांनी स्पष्ट केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleRajnath Singh Performs Shastra Puja in Bhuj, Warns Pakistan Against Sir Creek Misadventure
Next articleसंरक्षणमंत्र्यांचे भुजमध्ये शस्त्रपूजन, क्रीकच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला खडसावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here