तैवानच्या तटरक्षक दलाने, चिनी मालवाहू जहाज घेतले ताब्यात

0

बुधवारी तैवानच्या तटरक्षक दलाने, तैवान समुद्रातील पेंगू बेटांजवळील सी-केबल कापली गेल्याच्या प्रकारानंतर, चीनशी संबंधित एक मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली.

‘ग्रे झोन’ मधील चीनी कारवाया

चीन ज्याला आपला प्रदेश मानतो, त्या तैवानने वारंवार होणाऱ्या ‘ग्रे झोन’ मधील चिनी कारवायांविषयी तक्रार केली आहे. चीन बलून ओव्हरफ्लाइट्स किंवा वाळू उपसणे, यासारख्या आपल्या कारवायांद्वारे थेट संघर्ष न करता तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात.

चीनशी संबंधित एका जहाजाने, या वर्षाच्या सुरुवातीला समुद्राखालील आणखी एका केबलला हानी पोहचवली शंका असल्यामुळे तैवान सतर्क झाला, ज्यामुळे नौदल आणि इतर संस्थांनी- अंडर वॉटर कम्युनिकेशन लिंकची सुरक्षा वाढवण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले. ही केबल लिंक बेटाला इतर देशांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

दरम्यान तटरक्षक दलाने सांगितले की, त्यांनी टोगोमध्ये नोंदणीकृत चिनी-क्रूड जहाज- ‘हाँगताई 58’ ला ताब्यात घेण्यासाठी तीन जहाजे पाठवली होती. ज्यावेळी सी-केबल डिस्कनेक्ट झाली त्यावेळी, या जहाजांनी तैवानच्या नैऋत्य किनारपट्टीत केबलजवळ नांगर टाकला होता.

FoC जहाज

“हे जहाज चिनशी संबंधित जहाज असून त्यावर कन्व्हिनिएन्स फ्लॅग लावला आहे, याचाच अर्थ असा की ते त्याच्या मालकाच्या परवानगीशिवाय इतर प्रदेशात फिरते आहे,” असे तटरक्षकांनी सांगितले.

“या जहाजावरील आठही क्रू मेंबर्स चिनी नागरिक आहेत आणि त्यामुळे (आम्ही) ही ग्रे-झोन मधील एक चिनी कारवाई असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे तटरक्षक दलाने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच याचा सखोल तपास करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेखही त्यांनी यात केला आहे.

चीनच्या तैवान अफेयर्स ऑफिसने, यावरील टिप्पणीच्या विनंतीला कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, रॉयटर्सला जहाजाच्या मालकाशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे.

सी-केबल कापली गेल्यामुळे खंडित झालेल्या सर्व सेवा इतर केबल्सवर पुनर्निर्देशित केल्यामुळे, तैवान आणि पेंगूसह इतर ऑफशोअर बेटांमधील संप्रेषण प्रभावित झाले नसल्याचे, डिजिटल मंत्रालयाने म्हटले आहे.

‘सामान्य श्रेणीच्या पलीकडे’

तैवानच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने, या समस्येबाबत बोलताना रॉयटर्सला सांगितले की, ‘सरकार हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा प्रकरण म्हणून हाताळत आहे.’

“हे प्रकरण सामान्य श्रेणीच्या पलीकडे अर्थात त्यापेक्षा अधिक गंभीर आहे,” असे एका अधिकाऱ्याने, जहाजाच्या मार्गाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत सांगितले, जे जहाज शनिवारीपासून तैवानच्या दक्षिण-पश्चिम पाण्यात स्थिर होते आणि किनाऱ्याच्या रक्षक दलाच्या वारंवार कॉल्सला प्रतिसाद देत नव्हते.

डिजिटल मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तैवानमध्ये 2024 आणि 2023 मध्ये, प्रत्येकी तीन केबलच्या बिघाडाची प्रकरणे नोंदवली गेली होती, मात्र यावर्षी समुद्री केबल खराब झाल्याची किंवा कापली गेल्याची अशी एकूण पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

2023 मध्ये, मात्सू बेटांना जोडणाऱ्या समुद्राखालील दोन केबल्स कापल्या गेल्या होत्या, ज्यामुळे इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झाले होते. तैवानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘त्यावेळी देखील दोन चिनी जहाजांमुळे हा प्रकार घडला होता, मात्र बीजिंगने जाणूनबुजून केबल्समध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा त्यांच्या हाती लागला नाही.’

(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleChinese Navy Drill In Tasman Sea Forced 49 Flights Change Path
Next articleDGMO Visits Manipur To Assess Security, Border Management

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here