व्हेनेझुएलावरील कारवाई: ट्रम्प यांची आर्थिक स्थिती पुन्हा बळकट करणार?

0

“अमेरिका नेमकी कुठल्या दिशेने चालली आहे?” असा प्रश्न एका वरिष्ठ माजी मुत्सद्यांनी उपस्थित केला. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना ज्या हाय-प्रोफाइल पद्धतीने ‘ताब्यात’ घेतले आहे (काहीजण याला अपहरण म्हणतील) आणि त्या देशाच्या भविष्याबद्दल त्यांनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा आढावा घेताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

फ्लोरिडातील आपल्या मार-अ-लागो रिसॉर्टमधील एका ब्रीफिंगमध्ये ट्रम्प म्हणाले की, “जोपर्यंत सुरक्षित, योग्य आणि न्याय्य पद्धतीने सत्तांतर होत नाही, तोपर्यंत आम्ही हा देश चालवणार आहोत.”

परंतु, “हे वसाहतवादी सत्ता जे करायच्या, त्याची आठवण करून देणारे कृत्य आहे,” असे त्या माजी मुत्सद्यांनी म्हटले. राष्ट्रांचे तुकडे करणे, समाज फोडणे, स्थानिक राज्यकर्त्यांना आपल्या मर्जीनुसार मारणे किंवा पदच्युत करणे, याकडे लक्ष वेधत त्यांनी, “21 वे शतक हे याच गोष्टींसाठी ओळखले जाणार आहे का?” असा सवाल केला.

यामध्ये भारताची भूमिका काय असेल? परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनातून हे स्पष्ट झाले आहे की, राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या समर्थनासाठी दिल्ली सक्रीय पुढाकार घेणार नाही.

या निवेदनात म्हटले आहे की, “व्हेनेझुएलातील अलीकडील घडामोडी हा गंभीर चिंतेचा विषय आहेत. आम्ही बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व संबंधित घटकांना आवाहन करतो की, त्यांनी संवादाच्या माध्यमातून समस्या शांततेने सोडवाव्यात आणि या प्रदेशातील शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करावी.”

 अन्य एका मुत्सद्यांनी निदर्शनास आणून दिले की, “जर भारताने सद्य स्थितीत ट्रम्प यांच्यावर टीका केली, तर ते आपल्यावर उलटतील आणि ते काय करतील हे देवच जाणे.”

 ट्रम्प यांचा हेतू उघड आहे; त्यांना पैसे कमवायचे आहेत आणि व्हेनेझुएलाचे प्रकरण त्या उद्दिष्टानेच सुरू झाले आहे.

 “आम्ही युनायटेड स्टेट्समधील आमच्या खूप मोठ्या तेल कंपन्यांना, ज्या जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना व्हेनेझुएलामध्ये पाठवणार आहोत. त्या तिथे अब्जावधी डॉलर्स खर्च करतील, तिथल्या अत्यंत दुरवस्थेत असलेल्या पायाभूत सुविधा, विशेषतः तेलाच्या पायाभूत सुविधा दुरुस्त करतील आणि देशासाठी पैसे कमवायला सुरूवात करतील,” असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

अमेरिकन तेल कंपन्यांनी ट्रम्प यांच्या योजनांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु अमेरिकेतील रिफायनरी या मुळात व्हेनेझुएलातील जड आणि चिकट तेलावर प्रक्रिया करून डिझेल, डांबर आणि इतर इंधन तयार करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. एकूणच असा अंदाज आहे की, त्यांच्याशी याविषयी प्राथमिक चर्चा झाली असून, त्या यासाठी तयार आहेत.

 त्या कंपन्या पैसे कमवतीलच, मात्र त्यासोबतच ट्रम्प स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या व्यवसायासाठी आणि मित्रपरिवारासाठी देखील देखील पैसे कमावतील. मादुरो यांचे प्रदेशातील मित्र आणि शेजारी देश यावर मौन पाळून आहेत.

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रोंसारख्या व्यक्ती, ज्यांनी अमेरिकेच्या या कारवाईचे वर्णन “सार्वभौमत्वावर हल्ला” असे केले आहे, त्यांना ट्रम्प यांच्याकडून अत्यंत क्रूर भाषेत प्रत्युत्तर मिळाले आहे: “ते कोकेन बनवत आहे आणि अमेरिकेत पाठवत आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःला सांभाळावे (watch his a**),” अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे.

मूळ लेखक- सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleArmy Chief Gen Upendra Dwivedi Embarks on Visit to UAE and Sri Lanka
Next articleपाकिस्तानकडून 600 किमी पल्ल्याच्या ‘तैमूर’ क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here