कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे न्यू साउथ वेल्स राज्यातील हजारो ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा शनिवारी खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे पुराचाही इशारा देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे शहर आणि देशाची राजधानी असलेल्या सिडनीमध्ये सुमारे 28 हजार नागरिकांकडे वीजपुरवठ्यात बाधा निर्माण झाली आहे. जवळच्या न्यूकॅसल शहर आणि हंटर प्रदेशात 15 हजार नागरिक वीजेविना असल्याचे विद्युत कंपनी ऑसग्रिडने शनिवारी सकाळी आपल्या संकेतस्थळावर सांगितले.
राज्याच्या आपत्कालीन सेवा संस्थेने शुक्रवारीपासून मदतीसाठी आलेले 2 हजार 825 call out केले. हे मुख्यतः पडलेली झाडे आणि वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या मालमत्तांसाठी असल्याचे संस्थेने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
“ही अजूनही एक आपत्कालीन परिस्थिती आहे आणि मी प्रभावित भागातील लोकांना नव्या आपत्कालीन इशाऱ्यांबद्दल सतर्क राहण्याचे तसेच आपत्कालीन सेवांच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन करतो,” असे फेडरल आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री जेनी मॅकएलिस्टर यांनी आपत्ती सहाय्य निधीची घोषणा करताना एका निवेदनात म्हटले आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर, सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, अल्पाइन भागात ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असे देशाच्या हवामान खात्याने सांगितले.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्यात वादळामुळे झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे न्यू साउथ वेल्समधील 2 लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
हवामान बदलामुळे ऑस्ट्रेलियामध्ये अल्पकालीन मुसळधार पावसाच्या घटना अधिक तीव्र होत आहेत, असे देशाच्या विज्ञान संस्थेने गेल्या वर्षी सांगितले.
एजन्सीने सुमारे 2 कोटी 70 लाख लोकसंख्या असलेल्या देशात अधिक तीव्र उष्मा, किनारपट्टी भागात पूर, दुष्काळ आणि आगी लागणे अशाप्रकारच्या हवामानाचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, अति वेगवान वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडणे आणि विजेच्या तारा कोसळल्याने दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे 20 हजार नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील तास्मानिया बेट राज्यातील हजारो लोक विजेविना होते. तिथे थंड वारे आणि मुसळधार पावसामुळे पुराचा इशारा देण्यात आला होता.
मालमत्ता, वीज वाहिन्या आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे तास्मानियाचे आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री फेलिक्स एलिस यांनी त्यावेळी दूरचित्रवाणीवरील पत्रकार परिषदेत सांगितले.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)