मोदींच्या युक्रेन भेटीवर चिनी समाजमाध्यमांमध्ये भारतविरोधी पोस्ट

0

चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबोबद्दल (अंदाजे 58 कोटी मासिक वाचकांसह)असे म्हटले जाते की नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा हा त्याच्यासाठी चर्चेचा आणि वादाचा मुख्य विषय बनला. पण या विषयाला आणखी एक बाजू आहे. मोदींचे दौरे सुरू होताच, दिवसातील पहिल्या 50 हॅशटॅगपैकी आठ हॅशटॅग भारताविषयीच्या नकारात्मक आशयाने भरलेले  आणि मोठ्या प्रमाणात नकारात्मक बातम्या पसरवणारे होते.
पण आधी सकारात्मक मुद्द्यांचा विचार करूया. काही चिनी नेटकऱ्यांनी मोदींच्या भेटीवर अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. एका नेटकऱ्याने, “मोदींकडे खरोखरच काहीतरी आहे” अशी टिप्पणी करून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मॉस्कोमध्ये व्लादिमीर पुतीन यांना भेटल्यानंतर महिन्याभरातच मोदींनी युक्रेनला दिलेल्या भेटीसाठी ते मोदींचे कौतुक करत होते. दुसऱ्या एका युझरने मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या एका ट्रेंडिंग पोस्टवर टिप्पणी करताना मोदींना ‘राजकीयदृष्ट्या परिपक्व व्यक्ती’ असे संबोधले आहे.
तर दुसरीकडे, वेइबोचे कर्मचारी भारतविषयक कोणत्याही सकारात्मक बातम्या देण्याचे टाळतात. यावेळीही त्यांनी हाच ट्रेंड फॉलो केला. त्यामुळे अवघ्या काही तासांतच, भारताविषयी नकारात्मक बातम्या झळकायला लागल्या आणि टॉप आठ ट्रेंडिंग हॅशटॅगमुळे भारताच्या प्रतिकूल प्रतिमेबाबत चर्चा सुरू करण्यास फार वेळ लागला नाही.
याची एक झलक – चिनी कम्युनिस्ट पक्षाचे समर्थन करणारे एक खाते, ज्याने वीबोवर खालील टिप्पणी पोस्ट केली: “मोदींची युक्रेन भेट भारतीयांची धूर्तता दर्शवते. त्यांचे कोणीही शाश्वत मित्र नाहीत, फक्त शाश्वत स्वारस्ये आहेत.”
त्यानंतर त्यात अशा टिप्पण्या जोडल्या गेल्या ज्यांचा मोदींच्या युक्रेन किंवा रशियाच्या भेटीशी किंवा सर्वसाधारणपणे भारतीय मुत्सद्देगिरीशी काहीही संबंध नव्हता. त्यात भारतात असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले गेले किंवा तिथे महिला कशा सुरक्षित नाहीत अशा दाव्यांचा समावेश होता.
मोदींच्या भेटीबद्दल चीनमधील नेटकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर जे वाटते ते आणि तिथल्या अधिकृत चॅनेलने भारताची खराब प्रतिमा दाखवण्यासाठी आशयाला दिलेले वळण यात मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित झाला की प्रत्येकाला युक्रेन युद्ध संपावे असे वाटते. त्यात चिनी जनतेचाही समावेश आहे. मात्र चीन रशियावर लगाम घालत युरोपमध्येही आपले स्थान मजबूत करण्याच्या आशेने स्वतःची ओळख शांती निर्माता म्हणून व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरून तो युरेशियातील प्रमुख शक्ती म्हणून प्रस्थापित होईल.
मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना मिठी मारतानाची छायाचित्रे आणि मोदींचा झेलेन्स्कीच्या खांद्यावर हात ठेवणे यातून एक शक्तिशाली संदेश दिला जातो की शांतता प्रस्थापित करणाऱ्या भूमिकेसाठी भारत हा चीनचा एक तगडा प्रतिस्पर्धी आहे. स्वतःच्या नागरिकांनी मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केलेले पाहणे ही चिनी अधिकाऱ्यांना कदाचित अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
गेल्या 30 वर्षांत चीनने बांधलेल्या पायाभूत सुविधांच्या तुलनेत भारताच्या पायाभूत सुविधा नाही, असा मुद्दा चीनने मांडला आहे. पण आता भारतही सीमावर्ती भागात करत असलेल्या सोईसुविधा आणि गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर  हिमालयात अंशतः उंच ठिकाणी भारताच्या रस्ते बांधणीबाबत चीनची असुरक्षितता दिसून येते.
महिलांच्या सुरक्षिततेबद्दल नकारात्मक टिप्पण्या करणाऱ्या,  चिनी समाजाबद्दल, विशेषतः तिथले काही पुरुष स्त्रियांना कसे वागवतात याबद्दल वेइबोवरील चर्चेतून रेखाटलेला एक लेख सुमारे एक वर्षापूर्वी, स्ट्रॅटन्यूजग्लोबलने प्रकाशित केला होता. रेस्टरूममध्ये सलूनच्या कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करणाऱ्या त्या व्हिडिओच्या हॅशटॅगला 27 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. मात्र नंतर तो व्हिडिओ पटकन हटवण्यात आला. सरकारी सेन्सॉरद्वारे तो व्हिडिओ हटवण्यात आला अशी चर्चाही त्यावेळी झाली होती. (जून 22,2023). जर तुम्हाला इंग्रजी भाषेतला तो लेख वाचायचा असेल तर कृपया भेट द्याः
संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी चीनमधील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. दुर्दैवाने घरगुती हिंसाचार ही चीनमधील एक मोठी समस्या आहे.
रेस्ट ऑफ वर्ल्ड या ऑनलाईन नियतकालिकातील एका लेखात चीनमधील स्त्रीवादी चळवळीचा शोध घेण्यात आला असून त्यात केलेली प्रगती आणि सातत्यपूर्ण आव्हाने या दोन्हींची नोंद करण्यात आली आहे. सामाजिक दृष्टीकोन आणि समस्या महिलांच्या सुरक्षिततेवर आणि समानतेवर कसा परिणाम करतात याबाबतची निरीक्षणे नोंदवताना, त्यात लिंगाधारित हिंसा, छळ आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी यासारख्या समस्यांवर चर्चा केली आहे.
चीनमधील महिलांना भेडसावणारी आव्हाने कदाचित राजकीय वातावरणामुळे अधिक तीव्र झाली आहेत. प्रचलित आदेशाचा अगदी दूरस्थपणे प्रतिकार करू शकणारी कोणतीही गोष्ट दाबून ठेवली जाते किंवा वेइबो प्रकरणाप्रमाणे सेन्सॉर केली जाते. अर्थात अनेक चिनी वेइबो वापरकर्ते इतके प्रगल्भ आहेत की ते ‘भुशातून गहू’ (वाईटातून चांगले) लगेच ओळखू शकतात आणि जिथे त्यांना काहीतरी सकारात्मक दिसते तिथे ते प्रशंसा करतात.
रेशम


Spread the love
Previous articleZen Technologies Raises Rs1,000 Crore Via QIP To Boost Growth
Next articleRajnath Singh’s Visit to US Navy Facility Sparks Plans for Similar Base In India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here