पाकिस्तानचे आर्थिक केंद्र कराचीला, पाऊस आणि पुराचा जोरदार फटका

0

बुधवारी, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने कराचीमधील व्यवसाय, शाळा आणि सार्वजनिक कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. पाकिस्तानचे आर्थिक केंद्र असलेल्या कराचीला, मुसळधार पावसाचा आणि पुराचा जोरदार तडाखा बसला असून, यामध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने पुढेही आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

मान्सूनने, गेल्या काही दिवसांत संपूर्ण पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी, पर्वतीय उत्तर-पश्चिम भागात आलेल्या फ्लॅश फ्लड्समुळे मृतांचा आकडा वाढून 385 झाला आहे. प्रशासनाने सांगितले की, किती तरी लोक अजूनही बेपत्ता आहेत.

कराचीमध्ये मंगळवारी, पावसाला सुरूवात झाली आणि काही भागांत गेल्या अनेक वर्षांतील विक्रमी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी आणि सर्वात मोठे शहर असून, इथे 2 कोटींहून अधिक लोक राहतात.

प्रांतीय सरकारचे प्रवक्ते अब्दुल वहीद हालेपोटो यांनी सांगितले की, ‘रस्ते अपघात, इमारती कोसळणे, विजेचा करंट लागणे आणि पाण्यात बुडल्यामुळे नागरिकांचे मृत्यू झाले.’

शहरातील सेवा विस्कळीत

‘पावसामुळे वीज, मोबाइल सेवा आणि विमान उड्डाणांवर परिणाम झाला,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलं की गाड्या रस्त्यांवर तरंगत होत्या आणि घरे पाण्यात बुडाली होती.

अनोषा (वय 30), क्रिएटिव्ह डिझायनर, हिने सांगितले री, “माझ्या आयुष्यात मी कधीच असा पाऊस पाहिला नव्हता. आमची गाडी रस्त्यावर अडकली, पाणी आत शिरले आणि मी घाबरले.”

अंजुम नझीर, प्रांतीय हवामान विभागाचे प्रवक्ते, यांनी सांगितले की, “एअरपोर्ट परिसरात 163.5 mm (6.4 इंच) इतकी 1979 नंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.”

कराचीत ईशान्येकडील भागात 178 mm पाऊस झाला, जो त्या हवामान केंद्राच्या पाच वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. “आम्ही आणखी जोरदार पावसाची अपेक्षा करत आहोत,” असे नझीर म्हणाले.

National Disaster Management Authority नुसार, आजपर्यंत 750 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू मॉन्सूनशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे.

वीज पुरवठ्यावर परिणाम

K-Electric च्या प्रवक्त्याने सांगितले की, “अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे कराचीत वीज पुरवठा खंडित झाला.”

“पाणी साचणे आणि ट्रॅफिक जाम यामुळे वीज बहाल करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडचणी आल्या, पण बहुतांश ठिकाणी वीज परत आली आहे, असे त्यांनी सांगितले.

शहराचे महापौर “मुर्तझा वहाब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बचावकार्य, पोलीस, स्वयंसेवक आणि सरकारी संस्था सहाय्य कार्यात गुंतलेल्या आहेत.”

“आम्ही रस्ते स्वच्छ करण्यासाठी आणि सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करत आहोत,” असे ते म्हणाले.

वहाब यांनी सांगितले की, पावसाच्या प्रमाणामुळे शहराचं पायाभूत अधोसंरचना पुरती अपुरी पडली. कराचीत फक्त 40 mm पाऊस हाताळण्याची क्षमताच आहे, त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास पूर येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतही मुसळधार पाऊस

भारताची आर्थिक राजधानी मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 21 ऑगस्टपर्यंत- 5 दिवसांत, काही भागांमध्ये 875.1 mm पावसाची नोंद झाली आहे, असे स्थानिक हवामान खात्याने सांगितले.

बुधवारी, सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे अनेक शाळा बंद होत्या आणि रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती.

दोन्ही देशांतील प्रशासनांनी, नागरिकांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे, कारण पुढील आणखी पावसाचा इशारा दिला गेला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleरण संवाद 2025: भारतीय लष्कराच्या सर्वांगीण परिवर्तनाला चालना देणारा मंच
Next articleभारताकडून ‘Agni 5’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here