जगमीत सिंगच्या एनडीपीने पाठिंबा काढल्याने ट्रुडो सरकार अल्पमतात

0
सरकार
जस्टीन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना बुधवारी अनपेक्षित धक्का बसला जेव्हा त्यांचे अल्पसंख्याक लिबरल सरकार सत्तेत राहण्यासाठी मदत करणाऱ्या एका छोट्या राजकीय पक्षाने आपला पाठिंबा मागे घेतला. यामुळे आता सरकार सत्तेत कायम ठेवण्यासाठी ट्रुडो यांना नव्या पक्षाशी युती करणे  भाग पडले आहे.

डाव्या विचारसरणीच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर लवकर निवडणुका घेण्याबाबतची चर्चा फेटाळून लावत, ट्रुडो यांनी सामाजिक कार्यक्रमांद्वारे सरकारचे कामकाज सुरू ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे वचन दिले.

मात्र आता सरकार अल्पमतात आल्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करवून घेणे आणि विश्वासदर्शक मते टिकवून ठेवणे यासाठी त्यांना इतर विरोधी आमदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.

“येणाऱ्या वर्षात निवडणुका येतील, आशा आहे की तोपर्यंत आम्ही कॅनडियन लोकांसाठी काम करत राहू”, न्यूफाउंडलँड आणि लॅब्राडोर येथे एका कार्यक्रमात ट्रुडो यांनी पत्रकारांना सांगितले. ते दौऱ्यावर असतानाच एनडीपीने पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

ते म्हणाले, “मला खरोखर आशा आहे की एनडीपी राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण कॅनडियन लोकांसाठी कसे काम करू शकतो यावर लक्ष केंद्रित करते, जसे आपण गेल्या काही वर्षांत केले आहे.”

एका व्हिडिओमध्ये, एनडीपीचे नेते जगमीत सिंग म्हणाले की, 2022 मध्ये या दोघांनी केलेला करार ते मोडत आहेत. याशिवाय विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा सामना ट्रुडो करू  शकलेले नाहीत असाही आरोप त्यांनी केला. ऑक्टोबर 2025च्या अखेरपर्यंत होणे आवश्यक असलेली आगामी निवडणूक कंझर्व्हेटिव्ह पक्ष सहजपणे जिंकेल असे जनमत चाचण्यांवरून सूचित झाले आहे.

“उदारमतवादी खूप कमकुवत आहेत, खूप स्वार्थी आहेत आणि लोकांसाठी लढण्यापेक्षा कॉर्पोरेट हितसंबंध त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. त्यात बदल होऊ शकत नाही. ते जनतेला आशा दाखवू शकत नाहीत,” असे सिंग म्हणाले.

2022च्या करारानुसार, सामाजिक खर्चाच्या बदल्यात एनडीपीने ट्रुडो यांना 2025च्या मध्यापर्यंत सत्तेत ठेवण्यास पाठिंबा देण्यावर सहमती दर्शवली होती. ट्रुडो यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा पदभार स्वीकारला. सध्याच्या जनमत चाचण्यांवरून असे सूचित होते की ते मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.

मतदारांमधील मरगळ न्यू डेमोक्रॅटिक पक्षात पसरल्याचे दिसते, ज्याने उदारमतवाद्यांना राष्ट्रीय दंत कार्यक्रमासारख्या उपाययोजना आणण्यास यशस्वीरित्या भाग पाडले असले तरी ते निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

सिंग गुरुवारीपर्यंत प्रसारमाध्यमांशी बोलणार नाहीत.

एनडीपीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ट्रुडो आणि उदारमतवाद्यांना विश्वासदर्शक मतांवर पाठिंबा द्यायचा की नाही याचा प्रत्येक मुद्द्यावर विचार करून मगच निर्णय घेतील. त्यात असेही सुचवले आहे की जर ट्रुडोचे भवितव्य अधांतरी राहिले तर एनडीपी त्यांना पाठिंबा देऊ शकेल.

या वर्षाच्या अखेरीस, सरकार अद्ययावत वित्तीय बजेट सादर करणार आहे आणि जर आमदारांनी त्याच्या विरोधात मतदान केले तर निवडणुका घ्याव्या लागतील.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleभारत – सिंगापूर यांचा सेमीकंडक्टर, डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर भर
Next articleDefence Minister Exhorts Commanders To Prepare For Unexpected And Remain War-Ready

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here