भारत – सिंगापूर यांचा सेमीकंडक्टर, डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर भर

0
भारत -
चर्चेपूर्वी सिंगापूरमधील संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी औपचारिक स्वागत केले. (सौजन्यः @MEAIndia व्हाया एक्स)

भारत सिंगापूर यांच्यातील नऊ वर्षे जुनी असणारी धोरणात्मक भागीदारी  नुकतीच सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीकडे वळली. याचा अर्थ काय? एका वरिष्ठ माजी मुत्सद्दीने स्ट्रॅटन्यूजग्लोबलला सांगितल्याप्रमाणे, याचा अर्थ दोन्ही देश यानंतर दीर्घकालीन मोठ्या संयुक्त प्रकल्पांसाठी वचनबद्ध आहेत.
त्या मापदंडानुसार, पंतप्रधान मोदींची सिंगापूर भेट आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे सेमीकंडक्टर्सवर लक्ष केंद्रित करून प्रगत उत्पादनाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि सहयोग वाढलेला दिसला.
“आम्हालाही भारतात अनेक सिंगापूर निर्माण करायचे आहेत,” असे मोदींनी वोंग यांना सांगितले, “कौशल्य, डिजिटलायझेशन, मोबिलिटी, प्रगत उत्पादन, सेमीकंडक्टर्स आणि एआय, आरोग्यसेवा, टिकाऊपणा आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी घेतला गेलेला पुढाकार महत्त्वाचा म्हणून ओळखला गेला आहे.”
आपल्या शब्दांना जागून मोदींनी एईएम सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाला भेट दिली, ज्यांचा भारतात प्रवेश करण्याचा विचार आहे. सिंगापूर सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशनने मोदी यांना तिथल्या इकोसिस्टीम आणि भारतासोबतच्या सहकार्य संधींबद्दल माहिती दिली.
सिंगापूर सेमीकंडक्टर चिप्सच्या जागतिक उत्पादनात 10 टक्के, जागतिक वेफर फॅब्रिकेशनमध्ये 5 टक्के आणि सेमीकंडक्टर उपकरणांच्या उत्पादनात 20 टक्के योगदान देते.
चीनमधील विविध गुंतवणुकीतून कमी होणारा परतावा आणि देशातील शाश्वत सेमीकंडक्टर इकोसिस्टमचा पाया रचण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे सिंगापूरला भारतात गुंतवणूक करण्यात अधिक स्वारस्य आहे. बाजाराच्या अंदाजानुसार भारताचा सेमीकंडक्टर्स संबंधित बाजारपेठेची उलाढालश चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत 64 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असेल.
मोदींच्या हस्ते चारच महिन्यांपूर्वी तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. भारत सरकार चिप स्पेसमध्ये परदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्रात अधिक सिंगापूर कंपन्या पुढे येतील आणि भारताला चिप्सचे जागतिक केंद्र बनवण्यास मदत करतील अशी आशा आहे.
सिंगापूरची सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि सीईआरटी – इंडिया डिजिटल सुरक्षेसाठी एकत्र काम करत असल्याने दोन्ही देश सायबर सुरक्षेतील सहकार्य वाढवत आहेत. हे सहकार्य 2015 सालापासून सुरू आहे.
डिजिटल प्रवाहात, विविध डिजिटल उपक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी एक संयुक्त कृती गट स्थापन केला जात आहे. मोदी यांच्या दौऱ्यात  स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य करारांमध्ये डेटा प्रवाह, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि व्यवसाय ते व्यवसाय (B2B) संबंध यांचा समावेश आहे.
यात 5जी आणि सुपरकॉप्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि एआयसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश असेल. यामुळे डिजिटल क्षेत्रातील कामगारांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांच्या आधीच्या कौशल्यात वाढ करणारे प्रशिक्षण प्रदान करणे शक्य होईल.
आरोग्यसेवेवरील सामंजस्य करारामुळे इतर गोष्टींबरोबरच सिंगापूरमधील भारतीय आरोग्यसेवा व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण तसेच पप्रशिक्षण यात हकार्य करण्यासही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleTaiwan Keeps Close Watch On China’s Invasion Drills Across The Straits
Next articleजगमीत सिंगच्या एनडीपीने पाठिंबा काढल्याने ट्रुडो सरकार अल्पमतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here