Israel-Iran Ceasefire: ट्रम्प यांनी केली ‘संपूर्ण युद्धविरामाची’ घोषणा

0
इस्रायल-इराणमध्ये अखेर 'युद्धविराम'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठी “संपूर्ण युद्धविराम” लागू होणार असल्याचे जाहीर केले. ही घोषणा दोन्ही बाजूंनी नव्या प्रतिशोधाच्या धमक्या दिल्यानंतर काही क्षणांतच करण्यात आली.

ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतानुसार, Israel-Iran मध्ये सध्या सुरू असलेल्या मोहिमा पूर्ण होण्यासाठी काही वेळ दिला जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने युद्धविराम सुरू होईल.

‘12 दिवसांचे युद्ध’

“सर्व काही अपेक्षेप्रमाणेच चालले आहे, या गृहितकावर मी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे त्यांच्या धैर्य, सहनशक्ती आणि बुद्धिमत्तेचे कौतुक करतो, की त्यांनी, ‘12 दिवसांचे युद्ध’ अखेर संपवले आहे,” असे ट्रम्प यांनी Truth Social या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले.

“इस्रायल आणि इराण यांच्यात संपूर्ण युद्धविरामासाठी पूर्ण सहमती झाली आहे, 12 तासांच्या युद्धविरामानंतर युद्ध अधिकृतरीत्या संपले असे मानले जाईल. इराण युद्धविरामाचा प्रारंभ करेल आणि 12 व्या तासाला इस्रायल युद्धविराम सुरू करेल. 24 तास पूर्ण होताच, ‘12 दिवसांचे युद्ध’ संपल्याचे जगभरातून औपचारिक घोषित केले जाईल,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

“एका देशाच्या युद्धविरामादरम्यान दुसरा देश ‘शांततापूर्वक आणि आदरपूर्वक’ वागेल,” अशी आशा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.

“हे युद्ध अनेक वर्षे चालू शकले असते आणि यात संपूर्ण मध्य पूर्व उद्ध्वस्त झाले असते, पण तसे झाले नाही आणि होणारही नाही. देव इस्रायलला आशीर्वाद देवो, देव इराणला आशीर्वाद देवो, देव मध्य पूर्वेला आशीर्वाद देवो, देव अमेरिका आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो!” असे ट्रम्प यांनी Truth Social वर लिहिले.

इराणच्या संयुक्त राष्ट्रातील मिशनकडून किंवा वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाकडून, रॉयटर्सच्या टिप्पणी संदर्भातील विनंत्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही.

इस्रायलने मोहिमेचा शेवट सूचित केला

घोषणेच्या काही तासांपूर्वी, इस्रायलमधील तीन अधिकाऱ्यांनी संकेत दिले होते की, ‘इस्रायल इराणमधील आपली मोहिम लवकरच संपवण्याच्या तयारीत आहे आणि त्यांनी ही माहिती अमेरिकेपर्यंत पोहोचवली आहे.’

रविवारी, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, “इस्रायल आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या खूप जवळ आहे.”

एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने Reuter ला सांगितले की, ‘तेहरानने अमेरिकेच्या प्रस्तावित युद्धविरामास मान्यता दिली आहे.’

याआधी सोमवारी, ट्रम्प यांनी अमेरिकन हवाई तळावर झालेल्या इराणच्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करत, इस्रायलला शांततेच्या दिशेने पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्याचे सुचवले होते. त्या हल्ल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही आणि इराणने आधीच हल्ल्याची सूचना दिल्यामुळे, ट्रम्प यांनी त्यांचे आभार मानले.

इराणचा प्रतिहल्ला

या हल्ल्याची पार्श्वभूमी अशी होती की, अमेरिकन बॉम्बर्सनी इराणच्या भूमिगत अणु केंद्रांवर 30,000 पाउंड वजनाचे बंकर-बस्टर बॉम्ब टाकले होते, जे इस्रायलच्या हवाई मोहिमेत सामील झाले होते. हा संघर्ष 12 दिवस सुरुच होता.

सोमवारी उशिरा, S&P 500 फ्युचर्समध्ये 0.4% नी वाढ झाली, याचा अर्थ व्यापाऱ्यांना मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात तेजीची अपेक्षा आहे.

मंगळवारी पहाटे, आशियाई बाजारात यूएस क्रूड फ्युचर्समध्ये आठवड्याभरातील निचांकी पातळीवरील घसरण झाली, कारण ट्रम्प यांनी युद्धविराम झाल्याचे जाहीर केले आणि प्रदेशातील पुरवठा बाधित होण्याच्या चिंता कमी झाल्या.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleDRDO–Bharat Forge Carbine Emerges as L1 Bidder in Indian Army’s Close-Quarter Battle Weapon Tender
Next articleDRDO-भारत फोर्ज निर्मित, CQB Carbine Weapon ला विशेष पसंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here