DRDO-भारत फोर्ज निर्मित, CQB Carbine Weapon ला विशेष पसंती

0
'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाला चालना

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने डिझाईन केलेली आणि भारत फोर्जने उत्पादन केलेली, जवळच्या लढाईसाठीची (Close Quarter Battle – CQB) ‘स्वदेशी बनावटीची कार्बाइन’, ही भारतीय लष्कराच्या आधुनिक शस्त्रसाठा खरेदी कार्यक्रमात, सर्वात कमी दराची (L1) बोलीदार ठरली आहे.

सुमारे 5.56×45 मिमी नाटो कॅलिबरसाठी डिझाइन करण्यात आलेले हे शस्त्र, पुण्यातील DRDO च्या Armament Research and Development Establishment (ARDE) ने विकसित केले असून, भारत फोर्जच्या Kalyani Strategic Systems Ltd (KSSL) या संरक्षण विभागाने पुण्यातच त्याची निर्मिती केली आहे.

ही निवड, ‘आत्मनिर्भर भारत‘ उपक्रमामधील एक मोठा टप्पा असून, भारतातील स्वदेशी लघु शस्त्रनिर्मिती क्षेत्राला मोठा आधार मिळाल्याचे सूचित करते.

INSAS नंतरचा सर्वात मोठा स्वदेशी कार्बाइन करार

2022 मध्ये, संरक्षण मंत्रालयाने (MoD) “Buy (Indian)” उपक्रमाअंतर्गत 4,25,213 युनिट्स 5.56x45mm CQB कार्बाइन्स खरेदी करण्यासाठी Acceptance of Necessity (AoN) करार जारी केला होता. या कराराची अंदाजे किंमत ₹2,770 कोटी असून, ही INSAS रायफल (2000 च्या दशकात सादर झाल्यानंतर) नंतरचा सर्वात मोठा स्वदेशी लघु शस्त्र करार आहे.

“Buy (Indian)” वर्गीकरणानुसार, ही शस्त्र संपूर्णपणे भारतात डिझाइन, विकसित आणि तयार केलेली असायला हवीत, (किमान 50% स्वदेशी घटकांसह) किंवा जर ती बाहेरून तयार करवून घेत जात अससीत, तर त्यामध्ये 60% स्वदेशी सामग्री असणे आवश्यक आहे. DRDO–भारत फोर्ज निर्मित कार्बाइन ही पहिली अट पूर्ण करते, त्यामुळे ती स्वदेशी संशोधन आणि उत्पादन क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

ही नवी कार्बाइन, मुख्यतः शहरी युद्ध आणि दहशतवादविरोधी कारवाया यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ती हलकी, कॉम्पॅक्ट आणि जवळच्या अंतरावर लढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मुख्य वैशिष्ट्ये:
कॅलिबर: 5.56x45mm NATO, प्रभावी रेंज: किमान 200 मीटर, वजन: 3 किलोंपेक्षा कमी (मॅगझिन आणि अ‍ॅक्सेसरीशिवाय), बायोनेट ब्लेड लांबी: किमान 120 मिमी, अचूकता: 10 पैकी 9 गोळ्या 15×15 सेमी मध्ये येतात, सेवा कालावधी: 15 वर्षे किंवा 15,000 राउंड्सपर्यंत. ही कार्बाइन सध्या लष्करात वापरात असलेल्या 9 मिमी स्टर्लिंग कार्बाइन्स ची जागा घेईल, ज्या गेल्या दोन दशकांपासून वापरल्या जात आहेत आणि आता त्यांच्या कार्यक्षमतेत कमतरता जाणवत आहे.

स्पर्धात्मक निविदा आणि स्वदेशी प्रगती

या निविदा प्रक्रियेत, सात भारतीय कंपन्यांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये अदानी ग्रुप, जिंदाल डिफेन्स, ICOMM, कानपूरमधील स्मॉल आर्म्स फॅक्टरी, PLR सिस्टिम्स, BEL (भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.), आणि भारत फोर्ज यांचा समावेश होता.

भारत फोर्जने, ₹2,770 कोटींची स्पर्धात्मक बोली लावत PLR Systems (₹3,148 कोटी) आणि जिंदाल डिफेन्स (₹3,379 कोटी) यांना मागे टाकले. यामुळे त्यांच्या बाजारातील स्पर्धात्मक क्षमतेची पुष्टी होते.

या निवडीमुळे, भारत फोर्जचा देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रातील दबदबा वाढला आहे. FY26 मध्ये कंपनीला संरक्षण ऑर्डरमध्ये 15–20% वाढ होण्याची अपेक्षा आहे. KSS ही कंपनी सध्या मजबूत निर्यात कामगिरी करत असून आता लष्कराच्या मोठ्या प्रमाणावर गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे.

डिलिव्हरी वेळापत्रक आणि धोरणात्मक परिणाम

करार अंतिम झाल्यानंतर, शस्त्रांची पहिली बॅच 8 महिन्यांत वितरित होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण डिलिव्हरी 60 महिन्यांत (5 वर्षांत) पूर्ण केली जाणार आहे.

हा करार लष्कराच्या पायदळ शस्त्रास्त्रांच्या यादीतील एक महत्त्वाची कमतरता दूर करतो आणि उच्च-गुणवत्तेच्या संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राची वाढती परिपक्वता दर्शवितो.

DRDO ने, सोशल मीडिया पोस्टद्वारे या विकासाची अधिकृतरित्या नोंद घेतली:

हा टप्पा भारताच्या संरक्षण धोरणात – आयातदाराकडून संभाव्य निर्यातदाराकडे – एक महत्त्वाचा बदल दर्शवितो, ज्यात स्वदेशी नवोपक्रम, औद्योगिक भागीदारी आणि आत्मनिर्भरता केंद्रस्थानी आहेत.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleIsrael-Iran Ceasefire: ट्रम्प यांनी केली ‘संपूर्ण युद्धविरामाची’ घोषणा
Next articleUkraine: रशियाच्या ड्रोन हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here