युक्रेनला अधिक शस्त्रास्त्रे मंजूर केल्यानंतर ट्रम्प यांची पुतीनवर टीका

0

युक्रेनला अमेरिकेकडून अधिक संरक्षणात्मक शस्त्रास्त्रे पाठवण्यासाठी आपण मंजुरी दिल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. याशिवाय मॉस्कोवर अतिरिक्त निर्बंध घालण्याचा ते विचार करत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युक्रेनशी झालेल्या युद्धात वाढत्या मृतांच्या संख्येबद्दल त्यांनी आपली निराशादेखील व्यक्त केली आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून एका दिवसात युद्ध संपवण्याचे वचन देणारे ट्रम्प हे वचन पूर्ण करू शकले नाहीत आणि शांततेसाठी मध्यस्थी करण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये कॅबिनेट अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुतीन यांच्यावरचा आपला  संताप व्यक्त केला.

“मी पुतीनवर खूश नाही. मी तुम्हाला आत्ता एवढेच सांगू शकतो,”  असे ट्रम्प म्हणाले, त्यांनी रशियन आणि युक्रेनियन सैनिक हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडत असल्याचे नमूद केले.

“पुतीनने आमच्यावर बरीच चिखलफेक केली आहे … ते नेहमीच खूप चांगले असतात, परंतु ते निरर्थक ठरते,” असे ट्रम्प म्हणाले

युद्धामुळे रशियावर कडक निर्बंध लादणाऱ्या सिनेटमध्ये विधेयकाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर आपण विचार करत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

ते म्हणाले, “मी त्याकडे अतिशय बारकाईने पाहत आहे.”

दक्षिण कॅरोलिनाचे रिपब्लिकन सेनेटर लिंडसे ग्रॅहम आणि कनेक्टिकटचे डेमोक्रॅटिक सेनेटर रिचर्ड ब्लुमेंथल हे प्रमुख प्रायोजक असलेले हे विधेयक, मॉस्कोशी व्यापार करणाऱ्या इतर देशांनाही शिक्षा करेल आणि रशियन तेल, वायू, युरेनियम आणि इतर निर्यातीची खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के कर लादला जाईल.

ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी अमेरिका युक्रेनला अधिक शस्त्रे पाठवणार आहे, यात प्रामुख्याने बचावात्मक शस्त्रे असतील,” असे त्यांनी मंगळवारी सांगितले.

“आम्ही युक्रेनला काही बचावात्मक शस्त्रे पाठवत आहोत आणि मी त्याला मंजुरी दिली आहे,” ते म्हणाले.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी लष्करी साहित्याचा, प्रामुख्याने हवाई संरक्षणाचा, महत्त्वाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकेशी संपर्क वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

“हे अत्यंत महत्त्वाचे वितरण आहे ज्याचा अर्थ जीव वाचवणे आणि युक्रेनियन शहरे तसेच गावांचे संरक्षण करणे आहे. मला लवकरच या निर्णयाचे निकाल अपेक्षित आहेत. या आठवड्यात, आम्ही आमच्या लष्करी आणि राजकीय पथकांच्या बैठकीसाठी आवश्यक रणनीती तयार करत आहोत.”

झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांना वारंवार आवाहन केले आहे की त्यांनी मॉस्कोवर कठोर निर्बंध लादावेत जेणेकरून क्रेमलिनला युद्धबंदीला सहमती देण्यास भाग पाडता येईल. रशिया युक्रेन युद्धाला आता 40 महिने झाले आहेत.

युक्रेनला काही महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवण्याच्या पेंटागॉनच्या निर्णयामुळे गेल्या आठवड्यात कीवने इशारा दिला होता की यामुळे रशियाच्या वाढत्या हवाई हल्ल्यांपासून आणि युद्धभूमीवरील प्रगतीपासून बचाव करण्याची त्यांची क्षमता कमकुवत होईल.

संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या शेजारी बसलेल्या ट्रम्प यांना मंगळवारी विचारण्यात आले की हा पुरवठा थांबवण्याचा निर्णय कोणी दिला होता?

“मला माहित नाही. तुम्ही मला का सांगत नाही?” असे ट्रम्प यांनी उत्तर दिले.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपाकिस्तान सरकारच्या टीकाकारांवर बंदी घालण्याचा YouTube चा विचार
Next articleलुला यांच्याशी शाब्दिक युद्ध, ट्रम्प यांनी ब्राझीलवर लादला 50 टक्के टॅरिफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here