ट्रम्प यांचा ‘डॅमेज कंट्रोल’ पवित्रा, म्हणाले- “मोदींसोबत मैत्री कायम राहील”

0
ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, 13 फेब्रुवारी 2025 रोजी वॉशिंग्टन, डी.सी. येथील व्हाईट हाऊसमध्ये, संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होत असताना हस्तांदोलन करताना. सौजन्य: रॉयटर्स/केविन लामार्क (फाइल फोटो)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “संयुक्त राष्ट्रांनी भारताला चीनकडे गमावले आहे” असे म्हणताच, काही तासांतच आपली भूमिका सौम्य केली आणि भारतासोबतचे संबंध “विशेष” असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे त्यांचे वैयक्तिक नाते आजही दृढ आहे.”

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर, पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली आणि ट्रम्प यांचे आभार मानले आणि लिहिले की, “अमेरिकेच्या अध्यक्षांनी द्विपक्षीय संबंधांबाबत व्यक्त केलेल्या भावना मी मनापासून मान्य करतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा देतो.”

रशियाकडून खरेदीमुळे नाराजी, पण मैत्रीत बाधा नाही

जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, भारत अमेरिका सोडून चीनकडे वळला आहे याला जबाबदार कोण? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “माझ्या मते, भारत प्रत्यक्षात दूर गेला नाही. मला निराशा फक्त याची आहे की, भारताने रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. मी त्यांना माझी नाराजी स्पष्टपणे सांगितली आहे. आम्ही भारतावर 50% टॅरिफ, एक अत्यंत मोठा कर लावला आहे.”

तरीही ट्रम्प यांनी, वारंवार पंतप्रधान मोदींसोबतच्या मैत्रीचे कौतुक केले. “माझे मोदींसोबत अतिशय चांगले संबंध आहेत. ते अप्रतिम नेते आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भेट दिली होती,” असे ट्रम्प म्हणाले.

‘मोदी एक महान पंतप्रधान’

द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व अधोरेखित करताना, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-अमेरिका संबंधांना “अत्यंत विशेष” असे संबोधले. “काही धोरणांवर मतभेद असले तरीही, मोदींसोबतचे वैयक्तिक नाते अबाधित राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जेव्हा पत्रकारांनी विचारले की, “तुम्ही भारतासोबतचे संबंध पुन:प्रस्थापित करण्यासाठी तयार आहात का”, तेव्हा ट्रम्प म्हणाले की, “हो, नक्कीच. मी मोदींचा कायम मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. हे समीकरण कधीही बदलणार नाही. मी सध्या जे काही घडत आहे, त्याच्याशी सहमत नाही, पण भारत आणि अमेरिकेमधील नाते अनोखे आहे. काळजी करण्याची गरज नाही. अशा गोष्टी अधूनमधून होतच असतात.”

ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांबरोबर सुरू असलेल्या व्यापार चर्चेबाबत समाधान व्यक्त केले. “चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहेत. इतर देशांशीसोबतही आमची चांगली प्रगती सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांनी शेअर केला मोदी, पुतिन, शी यांचा फोटो

ट्रम्प यांच्या या सौम्य प्रतिक्रियांआधी त्यांनी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा टियांजिनमध्ये एकत्र उपस्थित असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

या फोटोनंतर ट्रंप यांनी टिप्पणी करताना अमेरिकेने भारत आणि रशिया दोघांनाही “अंधाऱ्या चीनकडे गमावले आहे”, असे म्हटले. त्यांच्या या प्रतिक्रिया त्या वेळी आल्या, जेव्हा मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत टियांजिनमध्ये एकत्र पाहिले गेले.

ही परिषद, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आयोजित केली होती आणि त्यात मोदी आणि पुतिन यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते. या तिघांमध्ये दिसलेली एकजूट- आंतरराष्ट्रीय पातळीवर “एक निर्णायक क्षण” आणि “नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय” असल्याचे म्हटले गेले,  विशेषतः वॉशिंग्टनने सुरू केलेल्या व्यापार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी, भारत रशिया आणि चीनच्या जवळ जात असल्याचा आरोप केल्यानंतरही, भारत सरकारने त्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले.

जेव्हा या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांना विचारले गेले, तेव्हा त्यांनी फक्त एवढेच उत्तर दिले: “या पोस्टवर सध्या माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया नाही.”

अलीकडच्या काळात भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाने, भारतावर लावलेले कठोर शुल्क यामुळे संबंध काही वर्षांतील सर्वात निचांकी स्तरावर पोहोचले आहेत.

यामध्ये 50% शुल्क, ज्यात 25% बेस टॅरिफ आणि 25% अधिभार यांचा समावेश होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर हे टॅरिफ लावण्यात आले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे दोन जोरदार धक्के; आधीच 2,200 जणांचा मृत्यू
Next articleIndia at SCO 2025: Balancing Between US, Russia & China

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here