ट्रम्प यांनी ‘TikTok’ साठीची अंतिम मुदत चवथ्यांदा वाढवण्याचे दिले संकेत

0

ट्रम्प प्रशासनाने, चीनच्या ByteDance कंपनीला त्यांच्या अमेरिकेतील TikTok मालमत्ता विकण्यासाठी किंवा अ‍ॅप पूर्णत: बंद करण्यासाठी 17 सप्टेंबरची अंतिम मुदत दिली होती, जी आता पुन्हा एकदा वाढवली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने रॉयटर्सला दिली.

कायदेशीर ठरावानुसार, बाईटडान्स कंपनीला जानेवारी 2025 पर्यंत त्यांचे TikTok अ‍ॅप अमेरिकेला विकण्यासाठी किंवा  बंद करण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ही चौथी सवलत असेल.

“निर्णय चीनवर अवलंबून”

मागील महिन्यात, ट्रम्प यांनी सांगितले होते की: “TikTok विकत घेण्यासाठी काही अमेरिकन खरेदीदार तयार आहेत आणि ते ही मुदत आणखी वाढवून देऊ शकतात.” मात्र, रविवारी जेव्हा TikTok च्या भवितव्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ट्रम्प यांनी निश्चित उत्तर दिले नाही.

“सध्या TikTok च्या व्यवहारावर चर्चा सुरू आहे. आम्ही अ‍ॅप बंदही करू शकतो किंवा चालूही ठेवू शकतो, मला आताच निश्चीत काही सांगता येणार नाही, हा निर्णय चीनवर अवलंबून आहे,” असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

व्हाइट हाऊसने अपेक्षित मुदतवाढीबाबत तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ही मुदतवाढ दिली गेल्यास, TikTok वापरणाऱ्या 170 दशलक्ष अमेरिकन नागरिकांच्या अ‍ॅप वापराच्या पार्श्वभूमीवर, ते बंद कराण्याबाबत प्रशासन उत्सुक नसल्याचे असल्याचे संकेत देतील.

वॉशिंग्टनमधील अनेक धोरणकर्त्यांनी, गेल्या अनेक वर्षांपासून असा इशारा दिला आहे की, बीजिंग TikTok चा वापर अमेरिकन नागरिकांवर हेरगिरी, ब्लॅकमेल किंवा सेन्सॉरशिपसाठी करू शकते. तरीही ट्रम्प यांनी अ‍ॅप वाचवण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

TikTok चा महत्त्वाचा अल्गोरिदम कोणत्याही अमेरिकी खरेदीदाराशी शेअर करण्यासाठी बीजिंगची मंजुरी आवश्यक आहे, आणि त्यामुळे करार प्रक्रियेला विलंब होत आहे.

करार रखडला

काही महिन्यांपूर्वी याबाबतचा एक करार जवळपास अंतिम टप्प्यात पोहचला होता. या करारानुसार, TikTok ची अमेरिकेतील सर्व ऑपरेशन्स स्वतंत्र अमेरिका-आधारित कंपनीत रूपांतरित होतील, जिथे बहुसंख्य अमेरिकी गुंतवणूकदार मालक असतील. मात्र, ट्रम्प प्रशासनाने चीनी वस्तूंवर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफमुळे, बीजिंगने मंजुरी नाकारण्याचे संकेत दिले आणि हा करार रखडला.

अमेरिका–चीन व्यापार चर्चा

अमेरिकेचे खजिनामंत्री स्कॉट बेसेन्ट आणि व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर, यांनी रविवारी स्पेनमध्ये चिनी उपपंतप्रधान हे लिफेंग आणि चीनचे मुख्य व्यापार प्रतिनिधी ली चेंगगांग यांच्यासोबत व्यापारविषयक चर्चांचा प्रारंभ केला. याच बैठकीत TikTok बाबतही चर्चा होणार आहे, मात्र 17 सप्टेंबरपूर्वी कोणताही ठोस करार होण्याची शक्यता नाही, असे एका सूत्राने सांगितले.

TikTok चा विषय याआधी जिनिव्हा, लंडन आणि स्टॉकहोम येथे झालेल्या अमेरिका–चीन व्यापार चर्चांमध्ये अजेंडावर नव्हता. मात्र, यावेळी TikTok ला अधिकृत अजेंडावर स्थान देण्यात आले आहे, त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आणखी एक मुदतवाढ देण्यासाठी राजकीय पाठबळ मिळू शकते. तथापि, ही मुदतवाढ काँग्रेसमधील दोन्ही पक्षांतील सदस्यांना नाराज करू शकते, कारण त्यांनी TikTok विक्री बंधनकारक केली आहे.

ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी, त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केली आणि TikTok च्या अमेरिकी मालमत्तांबाबत लागू असलेल्या कायद्याची अंमलबजावणी टाळली. त्यांनी प्रथम एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत, नंतर मे ते जून पर्यंत आणि त्यानंतर तिसऱ्यांदा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleबांगलादेशात अवामी लिगनंतर ‘जमात’चा वाढता प्रभाव, भारताची कोंडी
Next articleराफेल करार पुढे सरकत असताना भारताने LCA सारखा विलंब का टाळावा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here