100 पट अधिक शक्तिशाली असलेल्या ‘ट्रम्प-क्लास’ युद्धनौका उभारणार: ट्रम्प

0
युद्धनौका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी नवीन ‘ट्रम्प क्लास’ युद्धनौकांच्या योजनांची घोषणा केली, ज्यामुळे नौदल विस्ताराच्या उभारणीला सुरुवात झाली असून उत्पादन विलंब आणि खर्चातील वाढीवरून संरक्षण कंत्राटदारांवर अधिक कठोर देखरेख ठेवण्याचे संकेत मिळाले आहेत.

ट्रम्प म्हणाले की, नवीन युद्धनौका पूर्वी बांधलेल्या कोणत्याही जहाजापेक्षा मोठ्या, वेगवान आणि “100 पट अधिक शक्तिशाली” असतील. अमेरिकेचे नौदल वर्चस्व दृढ करण्याच्या उद्देशाने असलेल्या या नौका – ज्याला त्यांनी ‘सुवर्ण ताफा’ (गोल्डन फ्लीट) असे संबोधलज – विस्तारित ताफ्याचा केंद्रबिंदू असतील.

हा कार्यक्रम दोन जहाजांनी सुरू होईल आणि कालांतराने जहाजांची संख्या 20 ते 25 पर्यंत वाढेल अशी अपेक्षा असल्याचे ट्रम्प म्हणाले. या वर्गातील पहिल्या जहाजाचे नामकरण ‘यूएसएस डिफायंट’ असे केले जाईल.

‘घातक पृष्ठभागीय युद्धनौका’

ही घोषणा म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी फेडरल सरकारच्या एखाद्या पैलूला स्वतःच्या प्रतिमेनुसार नवीन रूप देण्याचे नवीनतम उदाहरण आहे. अमेरिकेच्या युद्धनौकांच्या दिसण्यावर यापूर्वी टीका केलेले ट्रम्प यावेळच्या युद्धनौकांच्या डिझाइनमध्ये आपण वैयक्तिकरित्या सहभागी होणार आहेत.

ते म्हणाले की, या युद्धनौकांचे वजन 30 हजार टनांपेक्षा जास्त असेल, ज्या सध्याच्या विनाशिकांपेक्षा मोठ्या असतील, आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्देशित ऊर्जा लेझरसह नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील.

“आम्ही 1994 पासून एकही युद्धनौका बांधलेली नाही. आमच्या पाणबुड्यांव्यतिरिक्त, ही अत्याधुनिक जहाजे सर्वात घातक पृष्ठभागीय युद्धनौका असतील,” असे ट्रम्प म्हणाले.

या घोषणेच्या वेळी फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित असलेले अमेरिकेचे नौदल सचिव जॉन फेलन म्हणाले की, पारंपरिक नौदल तोफांव्यतिरिक्त, नवीन युद्धनौका आण्विक-सज्ज, समुद्रातून प्रक्षेपित होणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील.

काही अमेरिकन अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, अलिकडच्या वर्षांत अमेरिकेला नवीन युद्धनौका बांधण्यात अपयश आल्याने आर्थिक आणि लष्करी प्रतिस्पर्धी चीनला त्याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. ट्रम्प यांनी या निर्णयामागे चीनचा प्रभाव नसल्याचे सांगत म्हटले की हा विस्तार “सर्वांनाच एक प्रत्युत्तर” आहे.

विलंब आणि खर्चातील वाढ

ट्रम्प म्हणाले की, नौदल विस्तारासोबतच संरक्षण कंत्राटदारांवर उत्पादन वाढवण्यासाठी आणि खर्च नियंत्रणात आणण्यासाठी नव्याने दबाव आणला जाईल. याशिवाय विलंब आणि खर्चातील वाढीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन, शेअर बायबॅक आणि लाभांश यामुळे उत्पादनाची उद्दिष्ट्ये पूर्ण होत नाहीत का, हे तपासण्यासाठी ट्रम्प पुढील आठवड्यात प्रमुख संरक्षण कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.

ट्रम्प म्हणाले, “आम्हाला असे नको आहे की कार्यकारी अधिकारी वर्षाला 50 दशलक्ष डॉलर्स कमवत आहेत, सर्वांना मोठा लाभांश देत आहेत आणि बायबॅक देखील करत आहेत, आणि त्याच वेळी F-35 आणि इतर विमानांचे उत्पादन रखडले आहे.”

रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दिलेल्या वृत्तानुसार, प्रशासन अशा संरक्षण कंत्राटदारांसाठी लाभांश, बायबॅक आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वेतनावर मर्यादा घालण्यासाठी एक कार्यकारी आदेश जारी करण्याचा विचार करत आहे, ज्यांचे प्रकल्प बजेटपेक्षा जास्त खर्चाचे आणि विलंबित आहेत.

ट्रम्प आणि पेंटागॉन संरक्षण उद्योगाच्या महागड्या, संथ आणि नव्या बदलांना विरोध करणाऱ्या कार्यपद्धतीबद्दल तक्रार करत असून युद्धसामग्रीचे उत्पादन अधिक वेगाने व्हावे यासाठी मोठे बदल करण्याचे आश्वासन देत आहेत.

नवीन युद्धनौकांव्यतिरिक्त, विस्तारित नौदलाच्या योजनेत इतर युद्धनौकांची संख्या वाढवण्याची देखील कल्पना आहे, ज्यात नौदलाने यापूर्वी जाहीर केलेल्या फ्रिगेटच्या नवीन, लहान वर्गातील नौकांचा समावेश आहे, असे ट्रम्प म्हणाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleHow Should India Deal With A Resurgent Pakistan?
Next articlePakistan Clinches Over $4 Billion Arms Deal with Libya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here