जनमत सर्वेक्षणानुसार स्विंग स्टेट्समध्ये ट्रम्प कमी फरकाने आघाडीवर

0
ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प सातही स्विंग स्टेट्समध्ये कमला हॅरिसपेक्षा कमी फरकाने आघाडीवर आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सर्व सातही स्विंग राज्यांमध्ये (नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया, एरिझोना, नेवाडा, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन आणि मिशिगन) डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यापेक्षा अतिशय कमी फरकाने पुढे आहेत, असे मतदानाच्या ताज्या आकडेवारीवरून सूचित होते.
ॲरिझोनामध्ये ट्रम्प यांना 52.3 टक्के तर हॅरिस यांना 45.8 टक्के, नेवाडामध्ये 51.2 टक्के विरुद्ध 46 टक्के आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये 50.5 टक्के विरुद्ध 47.1 टक्के कौल असल्याचे ॲटलासइंटेलला आढळले.
जॉर्जिया 51 टक्के विरुद्ध 47.6 टक्के, मिशिगनमध्ये 49.7 टक्के विरुद्ध 48.2 टक्के, पेनसिल्व्हेनियामध्ये 49.6 टक्के विरुद्ध 47.8 टक्के आणि विस्कॉन्सिनमध्ये 49.7 टक्के विरुद्ध 48.6 टक्के अशा फरकाने ट्रम्प आघाडीवर हहोते एकंदरीत, ट्रम्प 49 टक्के मते मिळवून आघाडी आहेत, तर हॅरिस 47.2 टक्क्यांनी पिछाडीवर आहेत.
ॲटलासइंटेलचे म्हणणे आहे की अनेक स्विंग राज्ये मतदानाच्या दोन-गुणांच्या त्रुटीच्या मर्यादेत आहेत. एजन्सीने असेही म्हटले आहे की 2020 च्या निवडणुकीदरम्यान त्याचे मतदानविषयक अंदाज सर्वात अचूक होते जेव्हा त्याने प्रत्येक स्विंग राज्यातील निकालाचा यशस्वी अंदाज वर्तवला होता.
परंतु एका नवीन सर्वेक्षणानुसार, कमला हॅरिस यांनी आयोवामध्ये ट्रम्प यांना मागे टाकले आहे, या राज्याने 2016 आणि 2020 मध्ये रिपब्लिकनला मतदान केले होते. या बदलाचे श्रेय महिला आणि वृद्ध मतदारांना दिले गेले आहे.
हॅरिस 47 ते 44 टक्क्यांनी पुढे होत्या. परंतु ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेने एक सर्वेक्षण देखील प्रसिद्ध केले ज्यात रिपब्लिकन उमेदवाराने 10 गुणांची आघाडी घेतल्याचे दिसून आले.
सात स्विंग राज्यांमध्ये 93 इलेक्टोरल कॉलेज व्होट्स आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये सर्वाधिक 19, त्यानंतर जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये प्रत्येकी 16 आणि मिशिगनमध्ये 15 आहेत.
या राज्यांमध्ये त्यांच्या अनपेक्षिततेव्यतिरिक्त, वैविध्यपूर्ण जनसांख्यिकीय पाया, आर्थिक हितसंबंध आणि सांस्कृतिक दृष्टीकोन आहेत, ज्याचा परिणाम मतदारांचे प्राधान्यक्रम एका निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीत बदलण्यात होतो.
काँग्रेसची दोन सभागृहे, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हवर कोणता पक्ष निवडून येणार हे देखील मतदार ठरवतील. 435 जागा असलेल्या सभागृहात सध्या रिपब्लिकन पक्षाचे अल्प बहुमत आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या 34 जागा असलेल्या सिनेटवर अल्पमतातील नियंत्रण आहे.
ज्यांच्याकडे संपूर्ण अमेरिकेचे लक्ष लागलेले आहे असे पाच प्रमुख जिल्हे म्हणजे नेब्रास्काचा दुसरा जिल्हा, ज्याचे प्रतिनिधित्व सध्या रिपब्लिकन करत आहे, न्यूयॉर्क जिथे रिपब्लिकनच्या ताब्यात असलेल्या पाच जागांना डेमोक्रॅट्सने आपले लक्ष्य केले आहे, उत्तर कॅरोलिनाचा पहिला आणि कॅलिफोर्नियाचा 45वा जिल्हा आणि आयोवाचा तिसरा जिल्हा.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here