मेमधील भारत-पाकिस्तान संघर्षात पाच जेट विमान पडल्याचा ट्रम्प यांचा दावा

0
एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धजन्य संघर्षात पाच विमाने पाडण्यात आली होती असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला. मे महिन्यात संघर्ष विराम झाल्यानंतर उभय देशांमधील तणाव कमी झाला होता.

व्हाईट हाऊसमध्ये काही रिपब्लिकन अमेरिकन खासदारांसोबत सुरू असणाऱ्या रात्रीच्या जेवणाच्यावेळी ट्रम्प यांनी हे विधान केले, परंतु त्यांनी कोणत्या देशाची विमाने पडली याचा कोणताही स्पष्ट उल्लेख केला नाही.

“खरं तर, विमानांवर हवेतून गोळीबार केला जात होता. पाच, पाच, चार किंवा पाच, परंतु मला वाटते की प्रत्यक्षात पाच विमाने पाडण्यात आली होती,” असे ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल बोलताना सांगितले, परंतु यापेक्षा अधिक तपशीलवार माहिती त्यांनी दिली नाही.

पाकिस्तानने हवाई हल्ल्यात पाच भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला. भारताच्या सीडीएस यांनी  मे महिन्याच्या अखेरीस सांगितले होते की युद्धाच्या पहिल्या दिवशी हवाई नुकसान झाल्यानंतर भारताने रणनीती बदलली आणि तीन दिवसांनी युद्धबंदी जाहीर होण्यापूर्वी सुरू असलेल्या संघर्षात त्यांना पूर्णपणे फायदा झाला

भारताने असाही दावा केला की त्यांनी पाकिस्तानची “काही विमाने” पाडली. इस्लामाबादने विमानांचे कोणतेही नुकसान झाल्याचे नाकारले परंतु त्यांच्या हवाई तळांवर हल्ला झाल्याचे मान्य केले.

संघर्षविरामाचे श्रेय ट्रम्प यांनी घेतले

वॉशिंग्टनने दोन्ही बाजूंशी चर्चा केल्यानंतर 10 मे रोजी सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविरामाचे श्रेय ट्रम्प यांनी वारंवार घेतले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि व्यापार चर्चा अर्धवट सोडून देण्याच्या धमक्यांमुळे हे घडले या दाव्यांशी भारताने असहमती दर्शविली आहे.

भारताची भूमिका अशी आहे की नवी दिल्ली आणि इस्लामाबादने त्यांच्या समस्या थेट आणि तिसऱ्या पक्षाच्या सहभागाशिवाय सोडवल्या पाहिजेत.

आशियातील चीनच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी वॉशिंग्टनच्या प्रयत्नांमध्ये भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार बनत आहे, तर पाकिस्तान हा आधीपासूनच अमेरिकेचा मित्र आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये बहुतेक हिंदू पर्यटक होते. या हल्ल्यामुळे अण्वस्त्रधारी आशियाई शेजाऱ्यांमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेल्या शत्रुत्वात आणखी वाढ झाली आणि जोरदार संघर्ष सुरू झाला.

नवी दिल्लीने या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले. पाकिस्तानने मात्र ही जबाबदारी नाकारली आणि तटस्थ चौकशीची मागणी केली.

वॉशिंग्टनने हल्ल्याचा निषेध केला पण इस्लामाबादला थेट दोष दिला नाही.

7 मे रोजी, भारतीय विमानांनी सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांवर” बॉम्बहल्ले केले. यानंतर  दोन्ही देशांमध्ये लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि रणगाड्यांद्वारे हल्ले झाले आणि संघर्ष विराम होईपर्यंत दोन्हीकडचे डझनभर लोक मारले गेले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleBRO Builds New Lifeline to LAC: Alternate Road to DBO Set for 2026
Next articleDefence Acquisition Reforms: What Can We Expect?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here