अमेरिकेच्या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरोंना ताब्यात घेतले: ट्रम्प

0
maduro-US
U.S. military captured Venezuela President Nicolás Maduro during Operation Absolute Resolve

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले असून, त्यांना देशाबाहेर नेण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिली. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’द्वारे जाहीर केले की, फ्लोरिडा येथील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान मार-ए-लागो येथे, अमेरिकन प्रमाण वेळेनुसार सकाळी 11:00 वाजता (ब्रिटनच्या वेळेनुसार 16.00) एक पत्रकार परिषद घेतली जाईल.

1989 मध्ये लष्करी नेते मॅन्युएल नोरिएगा यांना पदच्युत करण्यासाठी पनामावर केलेल्या आक्रमणानंतर, अमेरिकेने आजवर लॅटिन अमेरिकेत इतका थेट हस्तक्षेप कधीही केला नव्हता.

कोणतीही पुष्टी नाही

“युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने, व्हेनेझुएला आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर यशस्वी हल्ला केला असून, मादुरो यांना त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेण्यात आले आहे, आणि त्यांना विमानाने देशाबाहेर नेण्यात आले आहे,” असे ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

मात्र, व्हेनेझुएला सरकारकडून याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

अमेरिकेने मादुरो यांच्यावर “नार्को-स्टेट” चालवल्याचा आणि निवडणुकीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर, 2013 मध्ये ह्यूगो चावेझ यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या मादुरो यांनी, वॉशिंग्टनला जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवायचे आहे, असा आरोप केला आहे. मादुरो यांना नेमके कसे पकडण्यात आले किंवा त्यांना नक्की कुठे नेण्यात आले आहे, याबद्दल ट्रम्प यांनी अन्य कोणतेही तपशील दिले नाहीत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडच्या आठवड्यात अमेरिकेने व्हेनेझुएलाजवळील दोन तेल टँकर्स जप्त केले, तसेच अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या 30 हून अधिक बोटींवर प्राणघातक हल्ले केले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी “ज्या डॉक परिसरातून बोटींमध्ये अंमली पदार्थ भरले जातात,” असे सांगितले, त्या ठिकाणांवरही हल्ला केला. अहवालात पुढे म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या टोळ्यांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे, जो मादुरो यांनी फेटाळून लावला आहे. नाताळच्या आदल्या संध्याकाळी, ट्रम्प यांनी त्यांचे नेमके उद्दिष्ट काय आहे हे सांगण्यास नकार दिला होता, परंतु असा इशारा दिला होता की: जर “मादुरो यांनी कठोर भूमिका घेतली, तर ही त्यांची अशाप्रकारे भूमिका घेण्याची शेवटची वेळ असेल.” बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने मादुरो यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला 5 कोटी डॉलर्सचे बक्षीस देखील जाहीर केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून, या प्रदेशातील मोठ्या लष्करी बांधणीसह या बक्षिसाचा अर्थ असा लावला जात होता, की त्यांच्याच देशातील एखाद्या व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध बंड करावे, यासाठी अशाप्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प आणि तेहरान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचे सावट
Next articleIndian Army Places Rs 293-Crore Emergency Order for PULS Rocket Systems

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here