व्यापार तणाव असूनही ट्रम्प-शी भेट होण्याची अजूनही शक्यता

0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ऑक्टोबरच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सध्या हे दोन्ही देश टॅरिफ आणि निर्यात नियंत्रणांवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत, असे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी सांगितले.

मागील आठवड्यात गुरुवारी चीनने आपल्या दुर्मिळ खनिज निर्यात नियंत्रणांचा विस्तार करण्याची नाट्यमय घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. शुक्रवारी ट्रम्प यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली ज्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील बाजारपेठा आणि संबंध आणखी ताणले गेले.

‘आम्ही तणाव लक्षणीयरीत्या कमी केला’

बेसेंट म्हणाले की मागील आठवड्याच्या शेवटी दोन्ही देशांमध्ये लक्षणीय संवाद झाला असून भविष्यात आणखी बैठका अपेक्षित आहेत.

“आम्ही तणाव लक्षणीयरीत्या कमी केला आहे,” असे बेसेंट यांनी फॉक्स बिझनेस नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की 1 नोव्हेंबरपर्यंत हे शुल्क लागू होणार नाही. ते कोरियामध्ये पक्षाचे अध्यक्ष शी यांची भेट घेणार आहेत. मला वाटते की ती बैठक होण्याची शक्यता अजूनही आहे.”

ट्रम्प आणि शी यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस दक्षिण कोरियाने आयोजित केलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य मंचाच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेटण्याची योजना आखली होती.

चीन चर्चेसाठी तयार नाही?

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की त्यांनी अमेरिकेला त्यांचे दुर्मिळ खनिज नियंत्रण अधिक कडक करण्याची योजना आधीच कळवली होती आणि दोन्ही बाजू त्यासंदर्भात संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यासंदर्भात सोमवारी एक कार्यकारी पातळीवरील बैठकही पार पडली.

परंतु वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात इशारेवजा स्पष्टीकरण दिले आहे की “नवीन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची धमकी देताना अमेरिका चर्चेची मागणी करू शकत नाही.”

शेअर बाजारांमध्ये उमटली प्रतिक्रिया

बेसेंट यांनी दोन महासत्तांमधील व्यापार वाटाघाटी योग्य मार्गावर असल्याचे संकेत दिल्यानंतर मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर बाजारांमध्ये तात्पुरती तेजी दिसून आली, कारण सोमवारी वॉल स्ट्रीटचे मुख्य निर्देशांक 2.2 टक्क्यांपर्यंत वाढले होते,

शुक्रवारी ट्रम्प यांच्या धमकीमुळे गुंतवणूकदार आणि उच्च धोरणकर्ते आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेतील गुंतवणूक वाढीमुळे स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत असताना मोठी विक्री झाली. काही अधिकाऱ्यांना भीती आहे की या सगळ्याचा भविष्यात रोजगारावर परिणाम होऊ शकतो.

बेसेंट म्हणाले की या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक मेळाव्यांमध्ये अमेरिका-चीन कर्मचारी-स्तरीय बैठका होतील.

“100 टक्के टॅरिफ आकारण्याची गरज नाही,” असे सांगताना बेसेंट म्हणाले, “गेल्या आठवड्यात ही घोषणा झाली असली तरी संबंध चांगले आहेत. चर्चेच्या खिडक्या पुन्हा उघडल्या आहेत, त्यामुळे ही चर्चा कशी वळण घेते ते आपण पाहू.”

अमेरिकेची आक्रमक भूमिका

तरीही, बेसेंट यांनी चीनच्या या हालचालींना चिथावणीखोर संबोधले आहे. अमेरिकेने आक्रमकपणे मागे हटवले असे म्हटले.

अमेरिका मित्र राष्ट्रांच्या संपर्कात आहे आणि युरोपियन, भारत आणि आशियातील लोकशाहींकडून आम्हाला पाठिंबा अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

“चीन ही एक कमांड-अँड-कंट्रोल अर्थव्यवस्था आहे. मात्र ते आम्हाला कमांड किंवा नियंत्रण देणार नाहीत,” बेसेंट म्हणाले.

चीनने रविवारी वाढत्या व्यापार तणावासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आणि ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लादण्याच्या ताज्या धमकीला ढोंगी म्हटले. दुर्मिळ खनिज घटक आणि उपकरणांच्या निर्यातीवरील निर्बंधांचे त्यांनी समर्थन केले. तंत्रज्ञान उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या अशा घटकांमुळे बाजारपेठेत चीनचे वर्चस्व आहे.

चीनच्या नवीन नियमांनुसार, यादीतील काही दुर्मिळ खनिजे आणि संबंधित चुंबकांचे उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांना आता चिनी निर्यात लायसन्सची आवश्यकता असेल जर अंतिम उत्पादनात चिनी उपकरणे किंवा साहित्य असेल किंवा ते बनवले असेल. अशा व्यवहारात चिनी कंपन्या नसल्या तरीही हा नियम लागू होणार आहे.

मात्र अमेरिकाकडूनही चीनने अशा लायसन्स ची मागणी केली तर आम्ही त्याला नकार देऊ असे “मॉर्निंग्ज विथ मारिया” या कार्यक्रमात बेसेंट यांनी स्पष्ट केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleUN Peacekeeping at a Crossroads: Troop Contributing Nations Call for Reform Amid Funding Cuts and Complex Threats
Next articleIndia Reveals Inside Story of Operation Sindoor to UN Military Chiefs: Lt Gen Ghai Lifts the Veil on Precision Strikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here