सीरियातील बंडखोरी हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून, Turkey समर्थित सीरियन विरोधी गटांनी – US समर्थित सीरियन कुर्दिश सैन्याकडून (SDF) आणखी एका शहराचा ताबा मिळवला आहे. हे शहर उत्तर सीरियातील मनबीज नावाचे शहर असल्याचे तुर्कीच्या सुरक्षा स्त्रोताने सांगितले आहे. बंडखोरांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांची हकालपट्टी घोषित केल्यानंतर त्यांनी मनबीजचा ताबा घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
सीरियन नॅशनल आर्मी (SNA) आणि इतर तुर्की-समर्थित गटांसोबत तीव्र लढाई नंतर, SDF ने काही शहरांकरता Manbij शहर आपल्या ताब्यात ठेवले होते. सुरुवातीला अलेप्पो शहर आणि त्यानंतक सीरियाची राजधानी असलेले दमास्कस शहर ताब्यात घेण्यात विरोधकांना यशा मिळाल्यानंतरही उत्तरेकडील संघर्ष सुरूच होता.
याबाबत रॉयटर्सने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये, तुर्कीच्या सीमेच्या दक्षिणेला आणि युफ्रेटिस नदीच्या पश्चिमेला सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या मानबिज शहरामध्ये विरोधी सैन्याचे लोक बंडखोरांचे स्वागत करत असल्याचे दिसते आहे. तुर्कीमधील सरकारी वृत्तसंस्था, अनादोलूने दिलेल्या वृत्तानुसार, कुर्दिश मिलिशियाने मागे सोडलेल्या संभाव्य भूसुरुंग आणि सापळ्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यां विरोधात यूएस युतीमध्ये SDF हा मुख्य सहयोगी आहे. तुर्कीचे म्हणणे आहे की, गेल्या 40 वर्षांपासून तुर्की राज्याशी लढा देणाऱ्या बेकायदेशीर कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) ने अतिरेक्यांशी जवळून संबंध असलेल्या दहशतवादी गटाचे नेतृत्व केले आहे.
दरम्यान, तुर्कस्तान-समर्थित विरोधी पक्षाच्या हंगामी सरकारचे प्रमुख अब्दुररहमान मुस्तफा यांनी SDF कडून मानबिज पुन्हा ताब्यात घेणाऱ्या सैन्याचे अभिनंदन केले आहे.
“आम्ही आमच्या वीर सैन्यासोबत अभिमानाने आणि सन्मानाने उभे आहोत आणि परकीय आक्रमणापासून आमच्या भूमीचे संरक्षण करणाऱ्या आणि तिचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही पूर्णत: पाठिंबा देतो,” असे मुस्तफा यांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
युनायटेड स्टेट्सने याआधी आश्वस्त केल्याप्रमाणे, ते पूर्व सीरियामध्ये जिथे सध्या SDF तैनात आहे तिथे आपली उपस्थिती कायम ठेवतील आणि इस्लामिक स्टेटची पुनर्बांधणी रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतील. ISIS अतिरेक्यांविरुद्ध बचाव म्हणून पूर्व सीरियामध्ये अमेरिकेचे 900 सैनिक असल्याचा अंदाज आहे.
US चे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन त्यांच्या निवेदनात म्हणाले की, ‘’अलिकडच्या दिवसांत सीरियामध्ये अमेरिकेने केलेले हल्ले हे ISISच्या दहशतवादी कारवायांवर केंद्रित होते. ज्यामुळे सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असद यांना पदच्युत केल्याचा फायदा घेत ISIS ला पुनर्बांधणी करण्यापासून रोखण्यास मदत होईल.’’
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)
अनुवाद: वेद बर्वे