तुर्की आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी “शक्य असतील ते सर्व प्रयत्न करेल”, अशी स्पष्ट भूमिका, परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांनी मांडली. ‘जर नवीन सिरियाई प्रशासन, ‘अंकारा’तील (तुर्कीची राजधानी) यूएस-संबंधित कुर्शिद गटांसोबतचे तणाव मिटवण्यात अयशस्वी ठरली, तर आम्हाला आमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही ठोस पावले उचलावी लागतील’, असे फिदान यांनी सांगितले.
तुर्कीने YPG, जो यूएस सहयोदी सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) चा नेतृत्व करणारा मिलिटंट गट आहे, त्याला कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) च्या मिलिटंट्सचा विस्तार मानला आहे. हा गट गेल्या 40 वर्षांपासून जे तुर्की विरुद्ध बंडखोरी करत आहे.
या गटांना अंकारा, वॉशिंग्टन आणि युरोपीय युनियनने दहशतवादी मानले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी, सीरियातून बशर अल-असदचा पाडाव झाल्यापासून, या दोघांमधले शत्रुत्व वाढले आहे. तुर्की आणि सीरियन गटांनी 9 डिसेंबर रोजी, SDFकडून मनबीज शहर ताब्यात घेण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला होता.
अल- असदच्या पतनामुळे, कुर्द गटांना काहीसे मागे जावे लागले आहे. कारण गेल्या 13 वर्षांच्या काळात मिळवलेले राजकीय लाभ टिकवण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत.
फ्रान्स 24 ला दिलेल्या मुलाखतीत फिदान म्हणाले की, ‘अंकाराने सिरियाच्या क्षेत्रीय एकता, सार्वभौमिकता आणि अखंडतेच्या अनुषंगाने, समस्येचे निराकरण करण्यासाठी दिलेला प्राधान्यक्रम, दमास्कसमधील नवीन प्रशासनासाठी पसंतीचा पर्याय होता.’
दरम्यान तुर्कीचे परराष्ट्रमंत्री फिदान यांनी सांगितले की, ”YPG ला ताबडतोब बरखास्त करणे खूप आवश्यक आहे आणि जर असे झाले नाही, तर आम्हाला आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी काही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.”
यामध्ये लष्करी कारवाईच्या समावेशाविषयी बोलताना ते म्हणाले की, “शक्य असतील ते सर्व प्रयत्न तुर्की लष्कर करेल”
अंकारासोबतच्या वाटाघाटीवर तोडगा काढण्याच्या शक्यतेबद्दल, SDF कमांडर मजलूम अब्दी यांच्या टिप्पणी बाबत विचारले असता, फिदान म्हणाले की, ”SDF गटाने दमास्कससोबत एक ठोस तोडगा काढायला हवा, कारण आता तिथे ‘नवीन वास्तविकता’ तयार झाली आहे.”
“आम्ही स्वतःवर कोणत्याही प्रकारचे लष्करी संकट ओढावून घेऊ इच्छित नाही. ना आता ना भविष्यात”, असेही फिदान यावेळी म्हणाले.
अंकारा सिरियाच्या सहयोगी गटांसह, उत्तर सिरियामध्ये YPG च्या नेतृत्वाखालील, SDF विरोधात अनेक सीमापार हल्ले केले आहेत. सोबतच त्यांना NATO सहयोगी वॉशिंग्टनकडून लढायांसाठी दिले जाणारे समर्थन थांबवण्याची वारंवार मागणी देखील करत आहे.
यू.एस.-समर्थित SDF ने 2014-2017 मध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी गटाचा पराभव करण्यात मोठी भूमिका बजावली होती, ज्यासाठी यू.एस.च्या हवाई दलाची मदतही घेतली होती.
SDF अजूनही तुरुंगाच्या छावण्यांमध्ये आपल्या सैनिकांचे रक्षण करते आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी इशारा दिला आहे, की ‘इस्लामी गट या काळात पुन्हा आपल्या क्षमता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल.’
यावर बोलताना फिदान म्हणाले, की ‘सीरियातील यूएसच्या सैन्यात अलीकडे होत असलेली वाढ, हा त्यांना “योग्य निर्णय” वाटत नाही. ‘इस्लामिक स्टेट विरुद्धची लढाई हे SDF ला दिलेला पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी एक “निमित्त” आहे’, असेही ते म्हणाले.
“ISIS विरुद्धच्या लढाईत एकच काम आहे, ते म्हणजे त्यांच्या कैद्यांना तुरुंगात ठेवणे”, असेही ते यावेळी म्हणाले.
पुढे फिदान यांनी सांगितले की, ‘हयात तहरीर अल-शाम, या इस्लामिक गटाने, राजधानी दमास्कसमध्ये अल-असदला पदच्युत करण्यासाठी प्रवेश केला होता. याआधी त्यांनी इस्लामिक स्टेट आणि अल-कायदाविरुद्धच्या लढाईत, अंकाराला “उत्कृष्ट सहाय्य” केले होते. ज्यामध्ये गुप्तहेराद्वारे माहितीची देवाणघेवाण केली गेली’.
‘तुर्की सीरियामध्ये रशियन लोकांसह कोणत्याही परदेशी तळांच्या बाजूने नाही, परंतु निवडीचा हा निर्णय सीरियन लोकांवर अवलंबून आहे’, असेही फिदान यांनी यावेळी सांगितले.
(रॉयटर्स)