मॉस्कोमधील बॉम्बस्फोटात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एका संशयिताचा मृत्यू

0
बॉम्बस्फोटात

मॉस्कोमध्ये बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. दोन पोलीस अधिकारी संशयास्पद वर्तन करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यासाठी त्याच्याजवळ गेले असता, हा स्फोट झाला. ही घटना त्याच ठिकाणाजवळ घडली जिथे दोन दिवसांपूर्वी कार बॉम्बस्फोटात एका वरिष्ठ जनरलची हत्या करण्यात आली होती, आणि हा बॉम्ब युक्रेनियन गुप्तचर संस्थेने पेरल्याचा आरोप रशियाने केला होता.

जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान, रशियाच्या अनेक लष्करी व्यक्तींची आणि युक्रेनमधील युद्धाच्या उच्च-स्तरीय समर्थकांची हत्या करण्यात आली आहे. युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाने यातील अनेक हल्ल्यांसाठी आपण जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

हत्येमागे युक्रेनचा हात?

रशियाच्या ‘स्टेट इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटी’ने सांगितले की, जेव्हा दोन पोलीस अधिकारी संशयास्पद वर्तन करणाऱ्या त्या व्यक्तीजवळ गेले, तेव्हा एका स्फोटक उपकरणामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत संशयित व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगतिले, मात्र ती तिसरी व्यक्ती नेमकी कोण होती याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या हत्येशी संबंधित आणि बॉम्बच्या बेकायदेशीर तस्करीसंबंधी कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कमिटीने दिली.

रशियातील अनधिकृत टेलिग्राम न्यूज चॅनेल्सने सांगितले की, मृत पावलेल्यांपैकी एक जण बॉम्बस्फोट घडवणारा (बॉम्बर) होता आणि त्याने पोलीस अधिकारी जवळ येताच बॉम्बस्फोट घडवून आणला. परंतु, ‘रॉयटर्स’ स्वतंत्रपणे या तपशिलांची पुष्टी करू शकले नाही.

हा स्फोट त्या ठिकाणाच्या अगदीच जवळ झाला, जिथे रशियन जनरल स्टाफच्या आर्मी ऑपरेशनल ट्रेनिंग डायरेक्टोरेटचे प्रमुख- लेफ्टनंट जनरल फानिल सरवारोव्ह यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती.

रशियाने या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

युक्रेनकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

युद्धगुन्हेगार किंवा देशद्रोही म्हणून वर्णन केलेल्या व्यक्तींचा डेटाबेस पुरवणाऱ्या ‘मायरोट्वोरेट्स’ या अनधिकृत युक्रेनियन वेबसाइटने, जनरल सरवरोव्ह यांच्या मृत्यूची नोंद ‘संपवण्यात आले’ किंवा ‘खात्मा केला’ (Liquidated) अशी करून, आपल्या डेटाबेसमध्ये सुधारणा केली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleविमानातील तांत्रिक बिघाडामुळे लिबियन लष्कर प्रमुखांचा अपघाती मृत्यू: तुर्की
Next articleबांगलादेश: तारिक रहमान यांच्या परतीपूर्वी देशात सुरक्षेचा प्रश्न गंभीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here