नव्या हिंसाचारानंतर ‘गाझा युद्धविराम’ पुन्हा लागू करण्याचा अमेरिकेचा आग्रह

0

सोमवारी, अमेरिकेच्या राजदूतांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसंदर्भात ही भेट होती. आठवड्याभरापूर्वी झालेला हा नाजूक युद्धविराम करार, शनिवार-रविवारी झालेल्या नवीन हिंसाचारानंतर कोलमडण्याच्या स्थितीत आला होता.

रविवारी झालेल्या पॅलेस्टिनी हल्ल्यात, दोन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायने बॉम्बहल्ला केला ज्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायल आणि हमास यांनी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने घडून आलेल्या युद्धबंदी योजनेचे पुन्हा पालन केले.

तथापि, सोमवारी झालेल्या या हिंसाचारासह सतत घडत असलेल्या अशा घटनांमुळे, युद्धविरामाच्या पहिल्याच टप्प्याला धक्का बसला आहे आणि त्यामुळे अमेरिकेला दोन्ही बाजूंवर दबाव कायम ठेवता येईल का आणि संघर्ष संपवण्यासाठीची आपली गती टिकवता येईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

गाझामध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धानंतर, शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी दीर्घ काळापासून सुरू असलेल्या युद्धविराम प्रयत्नांमधील अडथळे या घडामोडीतून दिसून आले. हमासकडून शस्त्रबंदी, इस्रायली सैन्याची माघार आणि पॅलेस्टिनी प्रदेशाचे भविष्यातील प्रशासन यासारखे महत्त्वाचे प्रश्न अद्याप निकाली निघालेले नाहीत.

युद्धविरामाचा पुढील टप्पा

आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षात, परराष्ट्र धोरणातील महत्त्वाची कामगिरी बजावण्यासाठी हमास आणि इस्रायलवर दबाव टाकणाऱ्या, ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, ‘अमेरिकेने युद्धविराम टिकवण्यासाठी आजवर अनेक पावले उचलली आहेत.’

त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “हमासचा प्रश्न लवकर हाताळला जाईल”, पण यासाठी ‘इस्रायलला खोलात शिरून त्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितलेले नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. “हमासने युद्धविराम कराराचे उल्लंघन केले असले, तरी त्यांचे नेतृत्व ठाम नाही, त्यांच्यात आंतरिक बंड सुरू आहे,” असेही ट्रम्प म्हणाले.

 “जर हमासचे नेते हा संघर्ष थांबवण्यात अपयशी ठरले, तर गरज पडल्यास आम्ही त्यांचा नायनाट करू,” असा इशारा ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधून दिला. मात्र, यामध्ये अमेरिकन सैन्याचा सहभाग असले का, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 

सोमवारपासून आरंभलेल्या या भेटीत पुढे जाऊन, अमेरिकन दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर युद्धविराम मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यानंतर 20 टप्प्यांच्या ट्रम्प यांच्या योजनेच्या पुढील अधिक कठीण टप्प्यावर चर्चा सुरू करणार आहेत.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वॅन्स देखील मंगळवारी इस्रायलला भेट देणार आहेत. नेतान्याहू यांनी सांगितले की, ‘या भेटीत प्रादेशिक आव्हाने आणि विविध संधींवर चर्चा होईल.’

या प्रदेशात सध्या उच्चस्तरीय अमेरिकन राजनयिक हालचाली सुरू आहेत. सोमवारी, इजिप्तमध्ये हमाससोबत चर्चेची देखील त्यांची योजना आहे. गेल्या आठवड्यात, ट्रम्प यांनी या युद्धविराम कराराचे वर्णन “नव्या मध्यपूर्वेची ऐतिहासिक पहाट” असे केले होते, यावरून युद्धविरामाला त्यांनी दिलेले प्राधान्य स्पष्ट होते.

मृत्यूंमध्ये वाढ

सोमवारी, पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘इस्रायली टँक हल्ल्यात गाझामधील ‘पिवळ्या रेषे’जवळ (Yellow line) आणखी तीन लोक ठार झाले. ही रेषा म्हणजे, इस्रायलने मुख्य वस्तीच्या भागातून सैन्य माघारी घ्यायला सुरूवात केल्याचे प्रतीक आहे.’

इस्रायली सैन्याने सांगितले की, ‘त्या रेषेच्या पलीकडे गेलेल्या दहशतवाद्यांवर त्यांनी गोळीबार केला. ही रेषा सुमारे दर 200 मीटरवर कॉंक्रिट बॅरिअर्स आणि पिवळ्या रंगाच्या खांबांनी चिन्हांकित केली जात आहे.’

गाझा शहरातील रहिवाशांनी सांगितले की, ‘ही सीमारेषा स्पष्ट नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.’

“संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. आम्ही नकाशे पाहिले, पण रेषा नक्की कुठे आहेत हे समजत नाही,” असे तुफ्फाहचे रहिवाशी समीर (वयवर्षे 50) यांनी सांगितले.

विटकॉफ आणि कुशनर यांची इस्रायल भेट, ट्रम्प यांच्या गाझा युद्धविराम योजनेच्या पुढील टप्प्यावर चर्चा करण्यासाठी आधीच नियोजित करण्यात आली होती, रविवारी झालेल्या हिंसाचाराच्याही बऱ्याच पूर्वी.

अधिक बंधकांचे मृतदेह परत केले जाणार

जोपर्यंत आणखी बंधकांचे मृतदेह परत मिळत नाहीत, तोपर्यंत इस्रायल या चर्चेतील कोणतीही प्रगती सार्वजनिक करण्याची शक्यता कमी आहे.

‘सोमवारी, रेड क्रॉस गटाने हमासकडून आणखी एका बंधकाचा मृतदेह स्वीकारला आणि तो इस्रायली सैन्याच्या ताब्यात दिले,’ असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले.

इस्रायलला विश्वास आहे की, हमास तात्काळ आणखी पाच बंधकांचे मृतदेह परत देऊ शकतो. गाझामध्ये उरलेल्या 15 पैकी काहींची प्रेते उद्ध्वस्त झालेल्या भागात असल्याने, ती परत मिळवणे कठीण होऊ शकते.

इजिप्त, सोमवारी कैरो येथे हमासचे निर्वासित गाझा प्रमुख खलील अल-हय्या संघटनेसोबतचर्चासत्र आयोजित करणार आहे, असे या संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

चर्चेशी संबंधित असलेल्या एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गाझा प्रशासन चालवण्यासाठी हमासच्या प्रतिनिधीत्वाशिवाय एक स्वतंत्र तांत्रिक संस्था स्थापन करण्यावर यावेळी चर्चा होईल.’

हमास आणि त्याचे सहयोगी गट गाझाचे परकीय प्रशासन नाकारतात, ज्याची तरतूद ट्रम्प यांच्या योजनेत करण्यात आली आहे. तसेच त्यांनी शस्त्रसंपादनाचा त्याग करण्याचे आवाहनही नाकारले आहे, ज्यामुळे युद्धविराम कराराची अंमलबजावणी अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

रहिवाशांमध्ये भीतीचे सावट

इस्रायलने सांगितले की, ‘राफाहमधील (दक्षिण गाझा) निश्चित केलेल्या सीमारेषेच्या आत तैनात दोन सैनिकांचा पॅलेस्टिनी हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, त्यांनी संपूर्ण गाझाभर हल्ले केले.’

तर, हमासच्या सशस्त्र शाखेने सांगितले की, ‘त्यांना राफाहमधील कोणत्याही चकमकीची माहिती नाही आणि त्यांनी मार्चपासून तेथील गटांशी संपर्क साधलेला नाही.’

इस्रायलने केलेल्या करार उल्लंघनांची यादी हमासने प्रसिद्ध केली आहे, ज्यात 46 लोकांचा मृत्यू झाल्याचा आणि त्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा रोखल्याचा आरोप केला गेला आहे.

इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी इशारा दिला आहे, “इस्रायलच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातील हमास दहशतवाद्यांनी त्वरित निघून जावे, अन्यथा ‘येल्लो लाईन’ पलीकडे राहणाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कारवाई केली जाईल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleनाग MK-2 ने सज्ज झोरावर रणगाडे लवकरच भारतीय सैन्यात समाविष्ट होणार
Next articleIndian Navy Commanders’ Conference to Address Readiness and Indigenisation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here