बुधवारी प्रथमच, बी-2 बॉम्बफेकी विमानांनी येमेनमधील हौथी-नियंत्रित भागातील शस्त्रास्त्र साठवणुकीच्या ठिकाणांवर अचूक हल्ले केल्याचा अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दावा केला. पाच भूमिगत शस्त्रसाठा केंद्रांना यावेळी लक्ष्य करण्यात आले.
या केंद्रांमध्ये रेड सी आणि एडनच्या आखातातून अमेरिका तसेच इतर आंतरराष्ट्रीय लष्करी तुकड्या आणि नागरी जहाजांना लक्ष्य करण्यासाठी वापरली जाणारी प्रगत उपकरणे होती. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, “हुथी बंडखोरांकडून सुरू असणाऱ्या बेकायदेशीर कारवाईला आळा घालण्यासाठी तसेच त्यांची मारक क्षमता कमी करण्यासाठी हे हल्ले करण्यात आले.”
अमेरिका इस्रायल संबंध
बी-2 बॉम्बर्सची कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा थाड क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली तैनात करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य इस्रायलमध्ये दाखल व्हायला लागले आहे. यामुळे इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांविरुद्ध इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणा बळकट होईल.
या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेने येमेनमधील इराण पुरस्कृत हौथींशी संबंधित लक्ष्यांवर 15 हल्ले केले होते, जिथे रहिवाशांनी लष्करी चौक्या आणि विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती दिली होती.
येमेनमधील हौथी बंडखोरांनी नोव्हेंबरपासून रेड सी ओलांडणाऱ्या जहाजांवर सुमारे 100 हल्ले केले आहेत. गाझामधील इस्रायलच्या वर्षभर चाललेल्या युद्धात पॅलेस्टिनींसोबत आम्ही एकजुटीने काम करत असल्याचा दावा हौथींनी केला आहे. त्यांनी आतापर्यंत दोन जहाजे बुडवली असून, दोन जप्त केली आहेत तर किमान चार नाविकांना ठार केले आहे.
बी 2 बॉम्बर म्हणजे काय?
बी-2 हे कमी-निरीक्षण करता येण्याजोगे हेवी स्ट्रॅटेजिक बॉम्बर आहे जे हजार किमी-ताशी पेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्यासाठी आणि विमानविरोधी संरक्षण भेदण्यासाठी तयार केले गेले आहे. नॉर्थ्रोप ग्रुमन या विमान कंपनीने डिझाइन केलेले, त्यात दोन क्रू मेंबर्स असतात आणि ते पारंपरिक आणि थर्मोन्यूक्लियर बॉम्ब डिलिव्हर करू शकतात.
आतापर्यंत एकवीस विमाने 2 बिलियन डॉलर्सपेक्षा थोडा जास्त खर्च करून बांधली आली, ज्यापैकी 19 सध्या सेवेत आहेत.
(रॉयटर्स)