युक्रेनच्या सशस्त्र दलांना 10 हजारांहून अधिक ड्रोन पुरवण्यात येतील, असे ब्रिटीश संरक्षण सचिव ग्रँट शॅप्स यांनी गुरुवारी कीवच्या भेटीदरम्यान जाहीर केले.
“जानेवारीमध्ये पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 200 दशलक्ष पाउंडच्या ड्रोन पॅकेजमध्ये आता लक्षणीय वाढ करून ते 325 दशलक्ष पाउंडचा एकूण निधीची देण्यात येणार आहे. यामध्ये 10 हजारांहून अधिक मानवरहित युद्ध सामुग्री वितरीत होणार आहे – ज्यात बहुतेक फस्ट पर्सन व्हू (एफपीव्ही) ड्रोन आहेत, 1000 एकतर्फी हल्ला करणारे ड्रोन आहेत ज्यांचे संशोधन आणि विकास ब्रिटनमध्येच करण्यात आले आहे, याशिवाय पाळत ठेवणारे आणि सागरी ड्रोन आहेत”, असे शॅप्स म्हणाले.
“जगातील आघाडीच्या संरक्षण उद्योगांच्या कारखान्यांपासून थेट युद्धभूमीवर उतरणाऱ्या अत्याधुनिक नवीन ड्रोनमुळे युक्रेनची शस्त्रसज्ज वाढवण्याचे आमचे वचन पूर्ण होणार आहे. ब्रिटनच्या या प्रयत्नांमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारांना सामील होण्यासाठी मी प्रोत्साहन देईन “, असे शॅप्स यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रशिया युक्रेन संघर्षात हे ड्रोन गेमचेंजर ठरले आहेत, त्यामुळे युक्रेनला भासणारी सैन्याची कमतरता भरून निघण्यास मदत झाली आहे. गेल्या महिन्यात, झेलेन्स्की यांनी एका नवीन “अनमॅन्ड सिस्टीम फोर्स’ची घोषणा केली, ज्यामुळे सगळे लष्करी ड्रोन एकाच कमांडखाली आले.
युक्रेनच्या सशस्त्र दलांनी त्यांच्याकडच्या विविध ड्रोनच्या – ज्यांच्यात खूपच स्वस्त प्रणालींचा वापर करण्यात आला आहे- अत्यंत प्रभावी वापरामुळे जगाचे लक्ष वेधून घेतले कारण त्यामुळे रशियन उपकरणे आणि वाहनांचे हजारो तुकडे करणे आणि त्यांना नुकसान पोहोचवणे शक्य झाले,” असे शॅप्स यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अत्यंत कुशल एफ. पी. व्ही. ड्रोन, जे ऑपरेटरला वास्तविक वेळेत ड्रोनच्या हालचालींवर बारीक नियंत्रण ठेवण्याची क्षमता देतात, त्यांचा वापर करून लक्ष्यांवर हल्ला केल्यामुळे रशियन हवाई दलाला यशस्वीरित्या बायपास केले गेले.
“हे ड्रोन रशियाला आक्रमणापासून रोखण्यासाठी युद्धभूमीवर अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहेत, यामुळे शत्रूच्या स्थानांना आणि लष्करी वाहनांना लक्ष्य करण्याची ताकद मिळते. युक्रेनच्या सैन्यानेही रशियाच्या नौदलाच्या केंद्रस्थानी हल्ला करण्यासाठी या ड्रोनचा प्रभावीपणे वापर केला आहे. या संपूर्ण पॅकेजपैकी 100 दशलक्ष पाउंडपेक्षा जास्त रक्कम सागरी क्षमतेवर खर्च केली जात असल्याने, युक्रेनला समुद्रातील आक्रमणही सुरू ठेवता येईल”, असेही ते म्हणाले.
रामानंद सेनगुप्ता